वहान नोंदणी व मालका विषयी माहिती ऑनलाइन.

Adv.Saurabh Rajput
0

 

  

वहान नोंदणी व मालक 


वाहन नोंदणी व मालका विषयी माहीती बघा मोबाईल फोन व्दारे


नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माहीती देणार आहे मोबाईल फोन व्दारे एखादया वाहन मालका विषयी माहीती कशी बघावी. 


  सध्या वाहनांची संख्या खुप वाढलेली आहे तसेच अनेक लोक हे वाहन चालवित असतांना नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवतात व नियम मोडत असतात त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण  देखील वाढलेलेल आहे. अनेक वेळेस अपघात झाल्यानंतर समोरील व्यक्ती हा मदत न करता पळून जात असतो. परंतु अपघात झाल्यानंतर समोरील व्यक्तीला मदत करणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी सरकार ने देखील वेळोवेळी अपघात झाल्यावर पळून न जाता मदत करण्याचे अव्हाहण केले आहे. तसेच अपघात झाल्यानंतर लोकांनी देखील अपघात ग्रस्थांची मदत करून अपघातस कारणीभुत असलेल्या व्यक्तीला मारहाण न करता कायदा हातात न घेता पोलिसांना बोलायला हवे. कारण बरेच वेळेस अपघात झाल्यावर अपघातास कारणीभुत असलेल्या व्यक्ती भितीने देखील अपघातग्रस्थांना मदत न करता पळून जात असतात. 


  बरेचदा अपघात झाल्यास समोरचा व्यक्ती पळून गेल्याने नुकसान हाते. आणि टक्कर देणारा व्यक्ती सहज निसटून जातो. पण आता तुम्हाला एक माहीती देणार आहे त्यामुळे तुम्हांस वाहन मालक शोधण्यास मदत होणार आहे. त्यासाठी तुम्हांस सदर वाहनाचा क्रमांक लिहून ठेवणे किंवा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सहज तुम्ही माहीती मिळवू शकतात व पोलिसांना देखील कळवू शकतात व तक्रार करू शकतात. 

 

 वाहन क्रमांका व्दारे वहान मालकाची माहीती मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर वहान (Vahan) या सरकारी संकेतस्थळाला / वेबसाईटला   भेट दया किंवा आपल्या मोबाईल फोन च्या प्ले स्टेअर मध्ये जोवून आर.टी.ओ. व्हेईल इंफोरमेशन अप्लिकेशन डाउलोकड करा व यात वाहनाचा नंबर टाकल्यावर तुम्हाला वाहन मालकाचे नांव सोबतच चेसिस नंबर, इंजिन नंबर व वाहनाचा प्रकार, विमा इत्यादी माहीती समजेल.


  तसेच  तुम्हाला जुने वाहन विकत घायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने माहिती मिळवू शकतात.


बरेच वेळा या द्वारे first owner मुळ मालकाचे नाव येते. वाहन विक्री केल्यावर नवीन मालकाचे नाव आर.सी. बुक ला  लागल्यावर नवीन नाव update होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

 

 या प्रकारे तुम्ही वाहन मालकाची माहिती तुम्ही त्वरित बघू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads