मामलतदार कोर्ट अॅक्ट
मित्रनो आपन माहीती बघणार आहोत मामलतदार कोर्ट अॅक्ट 1906 चे कलम 5 (2)
एखादया व्यक्तिीने जर बेकायेषिपणे तुमचा शेतात जाण्या येण्याचा रस्ता मोडला असेल किंवा रस्त्यात येजा करण्यासाठी अडथळा निर्माण केला असेल किंवा ये जा करण्यासाठी त्रास देत असेल तर तुम्ही त्या व्यक्ती विरूध्द मा. मामलतदार साहेब म्हणजेच तहसिलदार साहेबांकडे मोडलेला रस्ता पूर्वरत करण्यासाठी व कायमचा मनाई हुकुम मिळण्यासाठी अर्ज या कायदयांन्वये दाखल करू शकता.
मामलतदार कोर्ट अॅक्ट 1906 चे कलम 5 (2) संगते की, पोट कलम 1 मध्ये निर्देषीत केलेल्या कोणताही व्यत्यय निर्माण करण्यात आला असेल किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असेल जसे शेतात जाण्याचा, चराईचा, झाडे, पिके, तलाव, मासेमारीचा जलप्रवाहाचा, वापराचा वहीवाट रस्ता, विहीरीच्या पाईपलाईना रस्ता कोणी अडवला असेल. त्यात व्यत्यय आणला असेल किंवा बंद केला असेल तर तुम्ही त्या व्यक्ती विरूध्द मा. मामलतदार साहेब म्हणजेच तहसिलदार साहेबांकडे मोडलेला व अडथळा आणलेला रस्ता पूर्वरत करण्यासाठी व कायमचा मनाई हुकुम मिळण्यासाठी या कायदयाच्या कलम 5 (2) प्रमाणे अर्ज दाखल करावा लागतो. या कायदयाचे कलम 5 (2) मामलतदार साहेब यांच्याकडून मनाई हुकुम मिळविण्यासाठी तसेच रस्ता पूर्वरत करण्यासाठी आहे.
अर्ज कसा करावा यासाठी या कायदयाच्या कलम 7 मध्ये दिलेले आहे की, अर्जामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात. अर्जदाराचे / वादीचे नांव, पत्ता, व्यवसाय, तसेच प्रतिवादीचे / सामनेवालाचे नांव, पत्ता, व्यवसाय, जेथे अडथळा निर्माण झालेला आहे त्या जागेचे वर्णन. त्या जागेचा दर्षक नकाषा काढून व्यत्यअ असलेली जागा दर्षविणे. व्यत्यय आलेल्या जागेचे ठिकाण व त्याचा प्रकार. एक मेकास लागू असलेल्या ठिकाणांचे वर्णन. की ज्या मुळे व्यत्यय असलेली जागा लक्षात येईल. या गोष्टी अर्जामध्ये नमुद करावयाला लागतात. तसेच या मध्ये वादास कारण कधी घडले ब्वनेम व् ि।बजपवद हे दाखल करणे महत्वाचे आहे. कारण या कायदया मधील कलम 5 (३) जे आहे ते सांगते की, दाव्यास कारण घडल्यापासून जो दावा सहा महिन्यांच्या आत दाखल केलेला नसेल असा कोणताही दावा मामलतदार कोर्ट दाखल करून घेणार नाही. म्हणजेच अर्जास कारण घडल्यापासून सहा महिन्यांच्या आत मामलदार साहेब म्हणजेच तहसिलदार साहेबांकडे दावा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच वाद होण्यास कारणीभुत परिस्थीती म्हणजे रस्ता का मोडलेला आहे या देखील गोष्टी अर्जात नमुद असणे महत्वाचे आहे.
असा अर्ज तयार केल्यानंतर आपल्याला या अर्जासोबत अॅफिडेव्हीट जोडावे लागते. सदर अफिडेव्हीटआपले वकिल हे सिव्हील कोर्टातून देखल तयार करून घेवू शकात. त्यानंतर वकिलपत्र, पत्तापुरसीस, दाखल दस्तऐवज यादी. व त्या यादीसोबत यादीप्रमाणे दस्तऐज जोडावे लागतात व त्या अर्जावर, अफिडेव्हीटवर व वकिलपत्रावर वकिल त्यावर अर्जदाराची सही घेतात. अर्जाला व वकिलपत्राला 10 रूपयाचे टिकीट लावले जाते. त्यासोबत कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड, मिळकतीचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून मिळकतीचा चालु डिजिटल उतारा, मिळकतीची हक्का सबंधात ऑनलाइन डिजिटल नोंद, वाद जाग दर्षक नकाषा इत्यादी कागदत्रे सोबत जोडून वकिल साहेब सदर अर्ज मामलदार साहेब यांचे न्यायालयात / कार्यालयात आवक जावक विभागात दाखल करतात व अर्जाची पाहोच घेतात. त्यानंतर सदर अर्जास नंबर लागतो. व सामनेवाला यांना नोटीस काढली जाते व त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावले जोते. तद्नंतर साहेबंाना जेव्हा वाटेल तेव्हा ते सदर जागेवर जावून आहे त्या स्थितीतचा पंचनामा करतात. पंचनामा केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की वस्तुस्थिती काय आहे. रस्ता खरच मोडला आहे का ? तेथे खरच रस्ता आहे का ? या गोष्टी साहेब पाहत असतात. या सर्व गोष्टी पंचनाम्यात नमुद होत असतात. मग हा पंचनामा अर्जाच्या / केसच्या फाईल ला लाला जातो. व सामनेवाला यांचे म्हणणे ऐकले जाते व दोन्ही पक्षांतर्फे युक्तीवाद होतो. यासाठी वेळो वेळी तारखा पडत असतात. दोन्ही पक्षकांचा युक्तीवाद ऐकला व दोन्ही पक्षांचा दाखल पुरावा बघीतला की मामलतदार साहेब म्हणजेच तहसिलदार साहेब त्यावर योग्य तो न्याय निर्णय करत असतात.