जन्म आणि मृत्यु नोंदणी अधिनियम
जन्म आणि मृत्यु नोंदणी अधिनियम, 1969 (The Registration of Births and Deaths Act, 1969)
चला
तर मग माहिती बघुयात -
जेव्हा
केव्हा कोणाचा जन्म किंवा मृत्यु होतो तेव्हा त्याची नोंदणी करणे कायद्याने गरजचे
आहे. कारण सर्व कायदेशिर कामे करतांना या दाखल्यांची गरज संबंधीत व्यकितीला पडत
असते. जसे मुलांचे नांव शाळेत टाकणे, विदेशात जाण्याच्या कामी पास्पोर्ट
व व्हीसा काढण्यासाठी, नोकरी कामी, काही कार्यालयीन कामकाज असेल.
वीमा वगैरेचे, पेश्नचे काम असेल. मयत व्यक्तिच्या पश्चात वारसांची नांवे
लावणे. मयताचे बँकेत शिल्लक असलेले पैसे बँकेतून काढणे कामी. किंवा इतर काहीही
कायदेशिर कामे असतील. त्यासाठी जन्म अथवा मृत्यु दाखल्याची गरज संबंधीत व्यक्तीला
पडत असते. सदर जन्म किंवा मृत्युची नोंदणी ही वेळेत होणे महत्वाचे आहे. अन्यथा
आपल्याला न्यायालयात जावून सदर नोंदणीचे काम करावे लागते.
सदर
नोदंणी करण्यास एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा उशिर झाला तर या कायद्यानुसार
संबंधित नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत यांना नोंद करण्याचा अधिकार नाही. त्यासाठी
अधिकार क्षेत्र असलेल्या सक्षम न्यायालयाकडून अर्ज दाखल करुन ऑर्डर आणावी लागते व
त्यानंतर संबंधीत कार्यालयात जन्म किंवा मृत्युची नोंद ही होत असते.
जन्माची नोंद ही ज्या व्यक्तिचा जन्म जेथे झालेला आहे उदा. नगरपालिका
क्षेत्रात झालेला असेलत तर संबंधीत नगरपालिकेत ती नोंद होत असते. अथवा ग्रामपंचायत
क्षेत्रात झालेला असेल तर संबंधीत ग्रामपंचायतीला ती नोंद करण्याचा अधिकार असतो.
तसेचमृत्युची नोंद ही त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार कोठे झाला, डॉक्टरांनी दिलेला मृत्युचा दाखला, त्याचे रहिवासाचे ठिकाण यावरुन होत असते.
जर एखाद्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्युची नोंद अनावधाने केली गेली नसेल व एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवून गेला असेल तर काय करावे ? चला तर मग बघुया.
सदर नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम नोंद संबंधीत कार्यालयात झाली आहे का ते त्या कार्यालयात जावून खात्री करुन घेणे. संबंधीत कार्यालय हे त्या वर्षाचे त्यांचे जन्म / मृत्यु नोंदणीच्या रजिष्टरची पडताळणी करते. त्यासाठी अर्ज द्यावा लगतो. मग नोंदणी आढळून आली नाही तर संबंधीत कार्यालय हे नोंद अनउपलब्धतेचा दाखला देते व त्यावर त्या कार्यालयातील संबंधीत अधिका-याचा सही व शिक्का असतो. त्यांनतर आपल्याला वकिलांना भेटावे लागते. त्यानंतर वकिल सांगतील त्याप्रमाणे आपल्याला त्यांना खालील कागदपत्रांची पूर्तता करुन दयावी लागते. जसे जो कोणी अर्ज करीत आहे त्या अर्जदाराचे किंवा स्वतः व्यक्ती असेल किंवा त्याचे आई वडील, भाऊ वगैरे जो कोणी अर्ज करणर असेल त्या अर्जदाराचे आधार कार्ड, ज्याच्या जन्म / मृत्यु दाखल्याची नोंद करावयाची आहे त्याचे आधार कार्ड. रेशकार्ड असेल तर ते कारण त्यावरुन आला रहिवासाचा पुरावा होत असतो. त्यानंतर जन्म दवाखान्यात झाला असेल तर त्याबाबतचे डॉक्टरांचे सर्टीफीकेट. नंतर मृत्यु तारखेच्या नोंदणीसाठी स्मशानभुमीचा दाखला, डॉक्टरांनी मयत घोषीत केल्या बाबतचे सर्टीफीकेट, संबंधीत कार्यालयाचा नोंद उलब्ध नसल्याबाबतचा दाखला. इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतात. या कागदपत्रांवर आपण जेथून कागदपत्रे घेतलेली आहेत त्यांचे निट सही शिक्के, संबंधीतांचे निट नावे, स्पेलीग आहेत ना ते पडताळून पाहणे कारण आपण या गोष्टी निट पाहत नाहीत भविष्यात अडचणी निर्माण होवून संबंधीत प्रक्रियेसाठी विलंब होत असतो. किंवा चुकीच्या नांवाची किंवा स्पेलींग मिस्टेक वगैरे झाली तर आपल्याला अडचण येवून व सदर चुक दुरुस्तीसाठी अपला जास्त वेळ जावू शकते. त्यामुळे कोणतेही कायदेशिर काम करतांना या गोष्टी निट बघून खात्री करुन घेणे गरजेचे असते. त्यांनतर सदर वकिल हे न्यायालयात जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969- कलम 13 (3) अन्वये अर्ज दाखल करतात. ते पुढील प्रमाणे :-
Section 13 (3) In the Registration of Births and Deaths act,
(3) Any birth or death which has not been registered within one year of its occurrence, shall be registered only on an order made by a Magistrate of the first class or a Presidency Magistrate after verifying the correctness of the birth or death and on payment of the prescribed fee.
(3) ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्युची, तो घडल्यानंतर एक वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी, जन्म किंवा मृत्यु तपशिल बरोबर असल्याची खातरजमा करुन पाहील्यानंतर प्रथम वर्ग दंड अधिकारी किंवा इलाखा शहर दंडाधिकारी याने दिलेल्या आदेशा वरुन आणि विहीत फी भरण्यात आल्यानंतरच करण्यात येईल.
(हे अधिकार आता मा. तहसिलदार साहेब यांना देयत आलेले आहेत.)
आता पाहुया पुढील अर्जाबाबतची माहीती.
त्या अर्जात सर्व काही नमुद असते जसे न्यायालयाचे नांव, अर्ज नंबर, अर्जदाराचे नांव, पत्ता, जन्मा चे / मृत्युचे ठिकाण, तारीख, नोंद करण्यास विलंब / उशिर का झाला त्याचे कारण, जसे ब-याच वेळा अर्जदाराचे आई वडिल हे अशिक्षित असल्याने त्यांना माहीत नसते, अनावधानाने नोंदणी करण्याचे राहून जाते किंवा इतर जे काही कारण असेल ते. या सर्व गोष्टी नमुद असतात. त्याच बरोबर अर्जास कारण वगैरे, कोर्ट अधिकार क्षेत्र या गोष्टी अर्जात नमुद असतात. सदर अर्जात संबंधीत जन्म / मृत्यु नोंदणी अधिका-याला पार्टी केले जाते. त्यानंतर सदर अर्जावर अर्जदाराची सही झाली व अर्जाला सर्व कागदपत्रे लावले गेले. त्यानंतर वकिल सदर अर्ज ई-फायलिंग करतात व तद्नंतर न्यालयात दाखल करतात. त्यानंतर सदर अर्ज दाखल झाला की न्यायालयातून त्याला नंबर मिळतो. त्यानंतर न्यायालयाची पहीली तारीख मिळते. सदर अर्ज दाखल झाल्या बाबत त्याचा नंबर या बाबत ची माहीती ही आपण संबंधीत न्यायायाच्या वेबसाईटवर किंवा मोबाई ॲप व्दारे मिळवू शकतो. त्यानंतर पुढील तारीख ही एक ते तिड महिन्या नंतरची मिळकत असते कारण आपल्याला अर्ज दाखल झाल्यानंतर न्यायालयाकडून पेपर मध्ये जाहीर (नोटीस) देण्यासाठी न्यायालयाचे पत्र घ्यावे लागते. (संबंधीत न्यायाधिशांकडून म्हणजे एका न्यायालयात बरेच न्यायाधिश असून शकतात अपली केस ज्या न्यायाधिशांकडे दाखल आहे त्यांच्या कोर्टाच्या संबंधीत क्लार्क कडून) सदर पत्र घेतल्यानंतर सदर जाहीर नोटीस ही वर्तमानपत्रत प्रसिध्द करावी लागते. (शक्यतो वर्तमानपत्र हे प्रसिध्द व जिल्ह्याचे असलेले चांगले) त्या जाहीर नोटीसी मध्ये नमुद केलेले असते की, अर्जदाराचे नांव, पत्ता, ज्या व्यक्तीची नोंद करणे आहे जन्म / मृत्युची त्यांचे नांव पत्ता, जन्म / मृत्यु ची दिनांक, न्यायालयात अर्ज दाखल केल्याचा नंबर, दिनांक व कोणाची काही हरकत असल्यास पुढील तारखेस न्यायालयात उपस्थित राहावे व आपला खुलासा लेखी न्यायालयात कळवावा. या बाबत सदर जाहीर नोटीसीत माहीत असते. त्यानंतर पुढील तारखेस न्यायालयात उपस्थित राहून अर्जदाराचे पुराव्याचे शपथपत्र दाखल करावे लागते. न्यायालयात कागदपत्रे दाखल करण्यासाठी परवानगी अर्ज पेपर नोटीस. (सदर पुराव्याच्या शपथपत्रात नमुद असते की, सदर पेपर नोटीसीस कोणाचीही काही एक लेखी अथवा तोंडी हकत आलेली नाही. सदर नोटीस पुराव्याच्या कामी वाचण्यात येवून त्यास निशाणी देण्यात यावी.) त्यासोबत पुरावा बंद पुरसीस द्यावी लागते. त्यात नमुद अस अर्जदाराला दिलेल्या लेखी अथवा तोंडी पुराव्या व्यतिरिक्त अन्य कोणताही पुरावा देणे नाही. त्यानंतर न्यायालयात वकिल आपला युक्तीवाद करतात. अपला पक्षकार म्हणजे जो कोणी अर्जदार असे त्याला न्यायालय प्रश्न विचारते. त्यानंतर कोर्टाने / न्यायालयाने सर्व प्रश्न विचारले. दाखल केलेले कागदपत्रे कोर्टाने बघीतले व न्यालयालयाची खात्री झाली सदर जन्म अथ्वावा मृत्युची नोंद करणे बाकी आहे. मग मे. न्यायालय सदर अर्ज (डिस्पोज) निकाली काढते म्हणेज कोर्टाला वाटेल त्याप्रमाणे मंजूर / नामंजूर करुन ओर्डर करते. न्यायालयाला वाटले तर न्यालयात अर्जदाराकडू अजून कागदपत्रे मागवू शकते. किंवा परत पुढची तारीख सुध्दा देवू शकते. अर्ज निकाली निघाल्यानंतर सदर ऑर्डर न्यायालय हे त्यांच्या वेबसाई व मोबाईल अॅपला अपलोड करत असते. तेथे अपल्याला सदर ऑर्डर ही ऑनलाईन उपलब्ध होत असते. व वकिलांनी सदर निकालाच्या आर्डरची नक्कल मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला की, मग सदर ऑर्डरची न्यायालयाच्या सही शिक्क्याची प्रत मिळत असते. मग सदर न्यायालयाची ऑर्डर संबंधीत जन्म /मृत्यु जेथे नोंदणी करावयाची आहे त्या कार्यालयाला दिली व कार्यालयाची विहीत फी भरली की सदर जन्म अथवा मृत्युची नोंदणी संबंधीत कार्यालयाच्या उशिरा जन्म मृत्यु नोंदणी रजिस्टरला होवून आपल्याला जन्म किंवा मृत्युचा जो काही दाखला आहे तो देण्यात येतो.
(मित्रांनो मी तुम्हाला सांगीतलेल्या सदर प्रकियेत वेगवेगळया न्यायालयाच्या पध्दतीनुसार थोडाफार बदल राहु शकते. परंतु मुळ प्रक्रिया मी तुम्हांस सागीतलेली आहे. या माहीतीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व तुमचे कायदेशिर ज्ञान वाढण्यास मदत होईल.)