जी मिळकत आपण खरेदी करणार आहोत तिच्या बाबत आधी आपण मिळकतीचे चालु व जुने उतारे कागदपत्रे, मालक, महसुल नोंदी वगैरे तसेच घर किंवा सदनिका मिळकत असेल तर बांधकाम नकाशा, परवानगी, Apartment घोषणापत्र (Deed of Declaration), टॅक्स पावती तसेच संबंधीत इतर कागदपत्रे निट बघून व तपासून घेणे.
(सरेदीखत / सेल डिड ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट नुसार होत असते.)
मिळकती बाबत बरीच माहीती जूने उतारे महसुल नोंदी या आपल्याला ऑनलाईन डिजीटल देखील मिळून जातात. तेथून देखील आपण बघून खात्री करू शतो व प्रिंट काढून घेवून शकतो.
आपल्याला याबाबत जास्त माहीती नसल्यास किंवा वेळ नसल्यास आपण सदर मिळकत विकत घेण्या अगोदर वकिलांकडून टायटल सर्टीफीकेट काढून घेवू शकतो. त्यामुळे आपली फसवणूक होण्याची शक्यता कमी असते व आपल्याला मिळकतीच्या पूर्व इतिहासा बाबत माहीती मिळकते व मिळकतीचे खरे मालक कोण आहेत किंवा मिळकतीवर बोज वगैरे तर नाही ना याची देखील खा़त्री होत असते. मिळकत खरेदी आपण वकिलां मार्फत किंवा माहीतगारा मार्फत केल्याने देखील फसवणूक होण्याची शक्यता कामी असते.
त्यामुळे ब-याच बॅंका देखील मिळकतीवर कर्ज देण्यापूर्व वकिला मार्फत मिळकतीचा सर्च रिपोर्ट मागवत असतात.
त्यानंतर संबंधीत अपार्टमेंट / प्लॉट / घर मिळकत जी काही मिळकत खरेदी करावयाची असेल तिचे आपल्याला सरकारी मुल्यांकन काढावे लागेल. ते मुल्यांकन काढून घेणे. मुल्यांकन आपण उता-यावरून तसेच दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयातून देखील काढू शकतो. त्यानंतर सदर मिळकतीच्या खरेदीची आपसातील किंम्मत ठरवली जाते. खरेदीची किंम्मत किंवा सरकारी बाजारभाव किम्मत यात जी रक्कम जास्त असेल त्या रक्कमेवर आपल्यास स्टॅंम्प डुटी व रजिस्ट्रेशन फी भरावी लागते.
खरेदीखत नोंदविण्याकरीता आपल्याला ड्राफ्ट तयार करावा लागतो. त्यांनातर ऑनलाइन किंवा ऑफलाइन बॅंकेत स्टॅंम्प डुटी, ऑनलाइन नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी ) आणि डॉक्युमेंट हॅंन्डलंग चार्जेंस (DHC) चलन भरावे लागते. त्यानंतर ऑनलाईन डेटा एन्ट्री करावी लागते.
आता आपण काय काय कागदपत्रे लागतात ते पाहुयात. आपल्याला नवीन चालुचा 7/12 उतारा, मिळकत सिटी सर्व्हे हद्दीत असलेत तर तो उतारा, बिंल्डींग कंप्लीशन सर्टीफीकेट, लेआउट नकाशा, कमेंन्समेंट सर्टीफिकेट, मागील झालेल्या दस्तांची इंन्डेंक्स दृ प्प् नक्कल. अपार्टमेंट असलेत तर त्याचे घोषणापत्र, मुखत्यार असेल तर त्या बाबत कागदपत्रे, जमिनीची एन.ए. (Non Agricultural) ची ऑर्डर, मिळकतीच्या परवानगी बाबतचे कागदपत्रे. तसेच नंतर भरणा कसा केला चेक व्दारे, ऑनलाईन, डी.डी. व्दारे त्याचा तपशिल. लिहून देणार व लिहून घेणार पक्षकार यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, तसेच साक्षीदार व ओळख देणार यांचे आधार कार्ड व फोटो.
खरेदी खताचा ड्राफ्ट / दस्त तयार करतांना आपल्याला सुरवातीला प्रथम आपसात ठरलेली किंम्मत, सरकारी बाजार भाव, स्टॅम्प डयुटी, रजि. फी. इ. नमुद करावे लागते. त्यानंतर लिहून घेणार लिहून देणार यांची माहीती जसे वय, पत्ता, राहणार, आधार नंबर, पॅन नंबर, इत्यादी संपूर्ण तपशिल नमुद करावा लगतो.
त्यानंतर आपल्याला मिळकतीचे संपूर्ण वर्णन लिहावे लागते. बिल्डींगचे नांव, चतुःसिमा, मिळकतीच्या मालका विषयी व तो त्या मिळकती पैकी विक्री देत असलेल्या मिळकतीचे वर्णन लिहावे लागते.
त्यानंतर मालकाला ती मिळकत कशी मिळाली त्याचे अधिकार मिळकतीच्या पूर्व मालका विषयी म्हणजे मिळकतीचा पूर्व इतिहास याबाबत माहीती लिहावी लागते. तसेच मिळकतीच्या परवानगी बाबत म्हणजे बांधकामा विषयी, मंजूर नकाशा, लेआउट, एन.एन., डिक्लरेशन वेगैरे माहीती नमुद करावी लागते. तसेच सदर मिळकतीवर काही बोजा वगैरे नाही ना त्या बाबत काय ठरलेले आहे त्याची नोंद करावी लागते. तसेच सदर मिळकत खरेदी देणार यांनी कोणालाही गहाण, दान, बक्षीस, वगैरे दिलेली नाही या बाबत माहीती लिहावी लागते.
त्यानंतर आपसात ठरलेल्या मोबदल्याची रक्कम. मोबदला रक्कम कधी किती , कशी दिली त्याचा संपूर्ण तपशिल. मिळकतीचा ताबा कधी कसा, मोजून मापून दिला त्याबात काही तक्रार नाही ही माहीती लिहावी लागते.
त्यानंतर दोन साक्षीदार, दोन ओळख देणार, तारीख ठिकाण वार इत्यादी दस्ताच्या शेवटी नमुद करावे लागते.
इत्यादी तर महत्वाची माहीती प्रत्येक दस्तात नमुद असतेच परंतु परिस्थीती व दस्तानुसार तसेच आपसात ठरल्या प्रमाणे तुमचे वकिल आवश्यकत ती माहीती लिहू शकतात.
वरील दिलेली सर्व माहीती दस्तात नमुद करणे गरजेचे व आवश्यक आहे. त्यानंतर सदर दस्तावर लिहून घेणार, लिहून देणार, साक्षीदार, ओळख देणार, टंकलेखन दस्तूर यांच्या सहया व अंगठयाचे ठसे घ्यावे लगतात व त्यांचे फोटो लावावे लगतात.
त्यानंतर सदर दस्ता सोबत कागदपत्रे लावावे लागताता जसे लिहून घेणार, देणार यांचे ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, साक्षीदार, ओळख देणार यांचे ओळपत्र जसे आधार कार्ड, नंतर मिळकतीचे कागदपत्रे उतारा, एन.ए.ऑर्डर, घोषणापत्र, परवानगी बाबत कागदपत्रे तसेच अनुषंगीक काही कागदपत्रे असतील तर ते जोडावे लगतात. जसे आपण भागीदारी फर्म कडून मिळकत घेत असू तर त्या बाबत भागीदारी बाबत दस्तऐवज व इतर मिळकतीच्या अनुषंगीक काही कागदपत्रे असतील तर जे सोबत जोडावे लागतात.
त्यानंतर सदर दस्ताची प्रत्यक्ष नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात करावी लागते. त्यावेळी सर्व पक्षकार लिहून देणार, लिहून देणार, साक्षीदार, ओळख देणार यांना प्रत्यक्ष कार्यालयात हजर व्हावे लागते. त्यावेळी दुय्यम निबंधक साहेब हे सदर दस्त तपासतात काही त्रुटी किंवा चुक असेल तर ते सांगतात नाहीतर दस्त व कागदपत्रे बरोबर असल्यास सदर दस्त नोंदणीची प्रक्रिया करतात.
आपण डेटा एन्ट्री केलेला कागद आपल्याला वाचायला देतात की, पक्षकारांचे नांव, मिळकत वर्णन वगैरे बरोबर आहे ना व त्यावर पक्षकाराला तपासून सही करायला लवतात. नंतर सर्व पक्षकार, साक्षीदार यांचे बायोमॅट्रीक अंगठे, फोटो घेतले जातात. त्यानंतर सदर दस्ताच्या पावतीवर सहया घेतल्या जातात, सदर दस्त आनलाईन स्कॅन केला जातो. त्याला नंबरींग केले जाते व त्यावर शिक्के मारले जातात. सदर दस्तावर सहेबांची सही होते. मग आपल्या दस्ताची नोंदणी पूर्ण होते. त्यानंतर आपल्याला पावती देतात. व नंतर काही वेळाने दस्त तयार झाला की, आपल्याला पावती दिल्यावर दस्त दिला जातो व दस्त घेतल्या बाबत आपल्याला रजिस्टरला सही करावी लागते. याप्रकारे खरेदीच्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते.