ऑनलाइन वारस नोंद कशी करावी ?
मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत ऑनलाइन वारस नोंद व इतर फेरफार नोंदी साठी ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा.
महसूल खात्याचे बरेच कामे आता ऑनलाइन सुरू झालेले आहेत. महसूल खात्याने नागरिकांना बर्याच सुविधा आता ऑनलाइन सुरू करून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा नागरिकांना फायदा होत आहे. वारस नोंदणी करणे, फेरफार नोंद करणे यासाठी आता महसूल विभागाच्या वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो.
शासनाच्या इतर ऑनलाइन उपलब्ध सेवांची माहिती देखील मी इतर ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेली आहे. ती माहिती देखील आपण या ब्लॉग (वेबसाइट) वर बघू शकतात.
इतर ब्लॉग पोस्ट :-
ऑनलाइन डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी कशा काढाव्यात ?
दस्त नोंदणी कमी ऑनलाइन डेटा एंट्री कशी करतात
![]() | ||||||||||||
वारस नोंद व इतर फेरफार नोंद ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी महसूल विभागाची नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन ही पुढील वेबसाइट सुरू करून घ्यावी. आपण गूगल मध्ये IGR महाराष्ट्र जरी सर्च केले तरी आपल्याला ही वेबसाइट मिळून जाईल. https://igrmaharashtra.gov.in/
त्यानंतर 7/12 Mutations यावर Ok करावे व पुढील प्रमाणे पेज सुरू होईल. बाजूला तुम्हाला विविध Options दिसतील. त्यामधून तुम्ही अर्जाची नवीन नोंदणी करू शकतात. पूर्वी सादर केलेले अर्ज जर अपूर्ण राहिलेले असतील तर अर्जाची दुरूस्ती किवा अर्जात बदल असेल तर तो करू शकतात. आता आपण नवीन अर्ज यावर Ok करावे व दिलेली माहिती जसे जिल्हा, तालुका व गाव ही माहिती भरून घ्यावी. मिळकत जिथे असेल ती माहिती भरावी. त्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे Options दिसतील. येथे अर्जदारची माहिती भरावी. अर्जदार हा जो व्यक्ती मयत झालेला आहे त्याचा मुलगा, मुलगी, पत्नी किवा घरातील व्यक्ती असू शकतो. इंग्रजी मध्ये माहिती टाइप केल्यावर व स्पेस दिल्यावर आपोआप माहिती मराठी मध्ये देखील टाइप होऊन जाईल. या प्रमाणे माहिती इंग्रजी व मराठी मध्ये भरून घ्यावी आणि पुढे जा यावर ok करावे. उतार्या वरुन इथे खाते संख्या भरून घ्यावी. खाते संख्या ही 7/12 उतर्यावर असते. त्यानंतर सेव्ह यावर ok करावे. मग भरलेली माहीत सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर त्या मयत व्यक्तीचे नाव येईल ते निवडून त्यावर ok करून निवडावे. त्यानंतर समाविष्ट करा यावर ok करून घ्यावे. मग मृत्युची तारीख टाकून घ्यावी. त्यानंतर टाकलेल्या खाते नंबर नुसार किवा सर्व्हे नंबर मध्ये मयत व्यक्तीची अजून काही शेतजमीन असेल तर तिचा देखील सर्वे नंबर इथे दिसेल. अजून सर्वे नंबर असतील तर ते निवडून घ्यावे. त्यानंतर सिलेक्ट यावर ok करून समाविष्ट करा यावर ok करावे. त्यानंतर वरील माहिती भरल्यानंतर पुढे जा यावर क्लिक करावे. त्यानंतर पुढील पेज सुरू होईल. इथे वरती आपल्याला कागदपत्रे अपलोड करावे लागतील. मयताचा मृत्यू दाखल इथे टाकावा. मृत्यू दाखला मूळ व सही शिक्क्या चा असावा. त्यानंतर अर्जदाराचे तयार केलेले प्रतिज्ञापत्र अपलोड करावे. त्यानंनातर OTP पाठवा यावर ok करावे व मोबाइल वर आलेला OTP टाकून verify करून घावे. त्यानंतर Preview या बटणावर ok करावे. त्यानंतर भरलेल्या अर्जाचा Preview दिसेल. या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची किवा अर्ज सेव्ह करून घ्यावा. अजून आपला अर्ज हा सबमीट नाही झालेला आहे. ही फक्त preview प्रिंट आहे. त्यानंतर आपण पुन्हा मुख्य पेज वर येऊन जयचे आहे. preview च्या बाजूला माहिती साठवा हे बटन आहे त्यावर ok करून आपल्याला माहिती साठवून घ्यायची आहे व ok या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर आपला अर्ज हा सेव्ह होऊन सबमीट होऊन जाईल. व शेवटी अर्ज भरल्याची प्रिंट काढून घ्यावी व ती निट जपून ठेवावी. मग आपण भरलेला ऑनलाइन अर्ज हा तलाठी कार्यालयत ऑनलाइन सबमीट होऊन जाईल. तदनंतर संबंधित तलाठी यांच्याकडून अर्ज व कागदपत्रे निट बघितले व तपासले जातात. सुमारे 21 दिवसांपर्यंत मायातचे नाव कमी होऊन वारसांचे नाव लागून जाईल. जर अर्जात काही त्रुटी असतील तर ऑनलाइन डेस्क वर अर्ज परत केला जात असतो. त्याची पुन्हा पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमीट करावा लागतो. इतर ब्लॉग पोस्ट :-
इतर महसूल ब्लॉग पोस्ट :- महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..
इतर ब्लॉग पोस्ट :- डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ? स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे. नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा. ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती. जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे. शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ? फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.
इतर ब्लॉग पोस्ट :- जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार
|