दिवाणी प्रक्रिया संहीता

Adv.Saurabh Rajput
0


    

दिवाणी प्रक्रिया संहीता 


    भारता मध्ये पूर्वी म्हणजेच 18 व्या शतका पर्यंत दिवाणी किंवा फौजदारी खटले हे धर्मशास्त्रांप्रमाणे चालत असत. 18 व्या शतकात ब्रिटीशांचा अंमल सुरू झाला व त्यांनी त्यांच्याकडील न्याय पध्दती आपल्या भारत देशात सुरू केली. तद्नंतर त्यात वेळो वेळी बदल झालेला आहे. 


दिवाणी प्रक्रिया संहीतीचे माहीती सर्वांना असावी करण त्यामुळे आपल्याला कायद्या विषयी माहीती  प्राप्त होत असते. चाला तर मग बघुयात दिवाणी प्रक्रिया संहीते विषयी माहीती. 


दिवाणी प्रक्रिया संहीती म्हणजेच Civil Procedure Code या मध्ये फौजदारी गुन्हे सोडून इतर सर्व वाद दिवाणी न्यायालयात चालविले जातात. दिवाणी प्रक्रिया संहीते मध्ये दिवाणी वाद कसे चालविले जातील. कोणत्या कोर्टाला कोणकोणते अधिकार आहेत. याची सर्व कार्यपध्दती दिलेली आहे. दिवाणी दावे वेगवेगळया न्यायालयात चालविले जातात. जसे दिवाणी न्यायालय, सहकार न्यायालय, महसुल न्यायालय, कामगार न्यायालय, लोकन्यायालय. 


दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय यात फरकत आहे. फौजदारी न्यायालयाचे कामकाज फौजदारी प्रक्रिया संहीता Code of Criminal Procedure प्रमाणे चालते. फौजदारी गुन्हे हे व्यक्ती व समाजा विरूध्द असतात. दिवाणी वाद हे शक्यतो स्थावर मिळकती जसे शेत जमीन, घर मिळकत, करार वगैरे विषयी असतात. दिवाणी वाद आपल्याला वैक्तिक वकील लावून लढवावे लागतात तर फौजदारी वाद हे सरकार पक्षातर्फे लढविले जातात. फौजदारी वादा मध्ये आरोपी विरूध्दचा गुन्हा सिध्द करण्याची जबाबदारी ही फिर्यादीवर असते. त्याला इंग्रजी मध्ये Burden of Proof  असे म्हणतात. आोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला असता तरी तो न्यायालया समोर नाकबुल करू शकतो. 


दिवाणी दाव्यात जो केस दाखल करतो त्याला वादी असे म्हटले जाते व ज्याच्या विरूध्द केस दाखल केली जाते तो प्रतिवादी असतो. दिवाणी दाव्यात वादीने प्रतिवादी विरूध्द दावा दाखल केल्यावर प्रतिवादीला नोटीस जाते मग वादी हजर झाला नाही तर कोर्टा तर्फे वादीचे कागदपत्रे, पुरावा पाहून एकतर्फे आदेश होवू शकतो. प्रतिवादीला नोटीस आल्यानंतर त्याचे म्हणणे कोर्टात मांडवे लागते. मग पुरावा दाखल होतो. कोर्टा व्दारे वाद मुददे काढले जातात. वकिलांचा युक्तीवाद होतो. मग न्याय निर्णय होत असतो. याची सर्व प्रकिया ही दिवाणी प्रक्रिया संहितेत दिलेली आहे.  


 प्रतिवादीला वादीचे म्हणणे खोडून टाकण्यासाठी पुरावा दाखल करावा लगतो. अन्यथा वादीकडे जे कायदेशिर दस्त आहेत ते न्यायालय ग्राहय मानते. त्यानुसार हुकुमनामा होतो व वादीने केलेली मागणी सिध्द होवू शकते. 


दिवाणी न्यायालयत पुढील कायदयांखाली कामे चालतात, 


मामत्ता हस्तांतरण कायदा, (Transfer of Property Act)

भाडे नियंत्रण कायदा, करार कायदया विषयी सर्व कामे, वैक्तिक धर्माचे कायदे, वारसा कायदा, वहीवाट संबंधी कायदा, सावकारी कायदा व त्यानुसार करार, विवाह व दत्तक या विषयी, शसकिय ंिकंवा शासकिंय नोकरी संबंधी चे वाद / प्रश्न. 


दिवाणी प्रक्रिया संहीता या कायदया मधील पहीला भाग कलमे म्हणजे ती तत्व सांगणारी आहेत. म्हणजे या भागाला मुळ कायदा सबस्टेंटीव्ह लॉ असे म्हटले जाते. व दुसरा भाग पहील्या भागातील तत्वांची अंमलबजावणी कोणत्या पध्दतीने करावयाची आहे या विषयीचा म्हणजे रितीविषयीचा / प्रोसिजरल कायदा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads