आपण माहिती बघणार आहोत DHC (Document Handling Charges) चलन कसे काढावे या बाबत.
आपण जेव्हा दुय्यम निबंधक, नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणी साठी सादर करतो जसे खरेदीखत, हक्कसोड, मृत्यूपत्र, मुखत्यार पत्र (पॉवर ऑफ एटर्नी), घोषणा पत्र, त्यासाठी आपल्याला DHC (Document Handling Charges) चलन ऑनलाइन काढून त्या दस्ता सोबत जोडावे लागते. दस्त नोंदणी साठी (Document Handling Charges) यासाठी हे चलन असते. 20 रुपये एका पानासाठी या प्रमाणे आपल्याला हे चलन दस्त नोंदणी करण्या च्या अगोदर दस्ताच्या पानांची संख्या याप्रमाणे काढावे लागते आणि दस्ता सोबत जोडावे लागते.
चला तर मग आपण माहिती बघूयात की हे DHC (Document Handling Charges) चलन कसे काढावे ते.
सर्वात आधी आपण महाराष्ट्र शासनाच्या
https://igrmaharashtra.gov.in/
हे संकेतस्थळ उघडावे. त्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाइट ओपन होईल.
यावर दस्त हाताळणी या ऑप्शन वर क्लिक करावे. त्यानंतर पुढील प्रमाणे पेज सुरू होईल.
त्यानंतर एक नंबर चे ऑप्शन आहे Document Handling Charges for Registraion I Sarita या ऑप्शन वर क्लिक करून ओके करावे. त्यानंतर पुढील पान येईल.
त्यावर I Read यावर ओके करून Proceed वर क्लिक करावे. त्यानंतर पुढील पेज सुरू होईल.
या मध्ये without PDE वर Ok करावे नंतर पुढील Page open होइल.
यामध्ये आपल्या Document प्रमाणे माहिती भरावी आणि Submit यावर ओके करावे. त्यानंतर पुढील पान येईल.
यावर आपल्या चलन बाबत माहिती येईल ती बरोबर आहे हे तपासून बघावे आणि I Agree Terms and conditions वर ok करावे. मग पुढील ऑनलाइन पेमेंट चे पान चालू होईल.
त्यानंतरOnline payment चे ऑप्शन येईल त्यावर ओके करून UPI द्वारे किंवा डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन पेमेंट करावे.
यानंतर एक page generate होइल आणि आपोआप चलन डाऊनलोड होइल. ते चलन download करावे. चलन download झाले नाही किंवा परत चलन डाऊनलोड करायचे असेल तर DHC ची webside चालू करून पुढील सर्च PNR यावर ओके करावे.
तदनंतर पुढील ठिकाणी चलन चा PNRN नंबर जो मोबाइल वर मेसेज मध्ये आलेला आसेल तो पुढील ठिकाणी टाकावा.
आपण चलन माहिती भरायला जेव्हा प्रथम सुरवात करतो तेव्हा सुरवातीला देखील तो नंबर दिसतो तेव्हा तो लिहून ठेवावा.
या प्रकारे चलन डाऊनलोड होऊन जाईल व ते चलन दस्त नोंदणी करताना दस्ता सोबत जोडावे / सादर करावे.