मिळकतीचा सर्च रिपोर्ट म्हणजे काय व तो कसा घ्यावा ? (Property Search Repot) म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0


मिळकतीचा सर्च रिपोर्ट म्हणजे काय व तो कसा घ्यावा ?


(Property Search Report) म्हणजे काय ? 


आपण माहीती बघणार आहोत स्थावर मिळकतीचा म्हणजेच प्लाॅट, घर, सदनिका, शेत मिळकत यांचा सर्च रिपोर्ट म्हणजे काय ? व सर्च कसा घेतात.?


  जेव्हा आपण बॅंकेकडून अथवा फायनांन्स कंपनीकडून गृह कर्ज घेत असतो किंवा इतर कोणते कर्ज घेत असतो तेव्हा आपल्याला बॅंकेकडे आपली मिळकत तारण ठेवून आपण कर्ज घेत असतो अशा वेळेस बॅंक आपल्याला त्या मिळकतीचा सर्च रिपोर्ट वकिलांकडून काढून आणण्यास सांगते. 


अशा वेळेस बॅंक सर्च रिपोर्ट पाहून कर्ज मंजूर करत असते. सर्च रिपोर्ट यालाच Titile Certificate  असे देखील म्हणतात. तसेच कोणाला एखादी प्लाॅट, सदनिका, शेत मिळकत विकत घ्यावयाची असेल तर तेव्हा देखील त्या मिळकतीचा सर्च रिपोर्ट काढला जातो. मिळकतीचा सर्च यासाठी घेतला जातो की, जी व्यक्ती मिळकत विकत घेणार आहे किंवा मिळकत बॅंकेस तारण देणार आहे त्या मिळकतीचा सर्च घेतल्याने हे समजते की, सदर मिळकतीचा मालक कोण आहे, त्यांना ती मिळकत विकण्याचा, हस्तांतरण करण्याचा, गहाण देण्याचा अधिकार आहे ना ? खरा मालक कोण आहे. ? त्या वर काही कर्ज बोजे वगैरे बाकी तर नाही ना ? सदर मिळकत संपादन वगैरे तर नाही ना ? त्या मिळकती मध्ये काही झोन वगैरे तर नाहीत ना ? ती मिळकत त्या मालकाला कशी प्राप्त झालेली आहे ? मिळकतीचा सर्च घेतल्या मुळे फसवणुक होण्याची शक्यता नसते. सर्च घेतल्याने समजते की, त्या मिळकतीचे टायटल क्लेअर व मार्केटेबल आहे.  


ज्यावेळी आपल्याला स्थावर मिळकत खरेदी करावयाची असते जसे प्लाॅट, घर, सदनिका, शेती, किंवा कर्ज घेवून, मिळकत बॅंकेकडे तारण ठेवून ती मिळकत खरेदी करावयाची असते त्या वेळी बॅंक त्या मिळकतीचा सर्च रिपोर्ट काढून तो जमा करावयास सांगत असते. गृह कर्ज घेऊन घर बांधकाम करण्या अगोदर बँक प्लॉट मिळकतीचा सर्च  काढवयास सांगते. सर्च रिर्पाट पाहून त्यावर काही पूर्वीचा बोजा वगैरे असेल, किंवा काही अडचण असेल तर बॅंक कर्ज नामंजूर करते. 


बॅंक यासाठी मिळतीचा सर्च काढावयास सांगते की, बॅंकेची फसवणुक होवू नये. मिळकतीचे खरे मालक कोण आहे. त्यावर आधीच काही कर्ज, बोजे, जप्ती, संपादन, वगैरे तर नाही ना. यासाठी सर्च रिपोर्ट काढावा लागतो. सर्च रिपोर्ट काढण्यासाठी बॅंकेने व फायनांन्स कंपन्यांनी त्यांच्या वकिलांची नियुक्ती पॅनलवर केलेली असते. त्यांच्याकडून योग्य ती फी भरून आपण मिळकतीचा सर्च रिपोर्ट काढू शकतो. तसेच आपल्याला आपल्या वैक्तिक कामासाठी सर्च रिपोर्ट काढावयाचा असेल तर अपण तो कोणत्याही सर्च घेणारे वकील यांचेकडून काढून शकतो. 


आपण देखील मिळकत खरेदी करण्या पूर्वी वकिलांकडून मिळकतीचा सर्च रिपोर्ट काढून घेता तर आपली फसवणुक टळू शकते. आपली फसवणुक होत नाही. आज काल स्थावर मिळकतींच्या किंमती खुप वाढलेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही स्थावर मिळकत आपण विकत घेण्यापूर्वी सर्च रिपोर्ट काढलेले कधीही चांगलेच असते. 


सर्च याचाच अर्थ आहे की, शोध घेणे, सर्च रिपोर्ट म्हणजेच त्या मिळकतीचा संपूर्ण सर्च घेतला जाते. जसे की, ती मिळकत पूर्वी कोणाची होती. एन,ए. झालेली आहे का ? झाली असेल तर कधी व कशी झाली ? ती मिळकत पहील्या मालका पासून शेवटच्या मालका पर्यंत कशी आली. यापूर्वी त्या मिळकतीवर कर्ज घेतले होते का ? आणि घेतले असेल तर ते परत फेड कधी व कसे केले ? मिळकतीचा प्रकार कसा आहे. मिळकतीवर काही आरक्षण म्हणजेच झोन वगैरे तर नाही ना. मिळकतीवर काही कसेस, दावे वगैरे तर प्रलंबीत नाही ना ? मिळकत हस्तांतर करण्यास, गहाण देण्यास पात्र आहे का ? ही सर्व माहीती सर्च मध्ये घेतली जाते. सर्च रिपोर्ट म्हणजेच एक प्रकारची साकळी चैन (Title Chain) असते जसे पहील्या मालका पासून शेवटच्या मालका पर्यंत मिळकत अशी  कशी हस्तांतरीत झालेली आहे. यालाच टायटल चेन सर्टीफिकेट असे देखील म्हणतात. सर्च घेतल्याने मिळकतीचा पूर्व इतिहास कळतो. 


मिळकतीचा सर्च घेण्यासाठी आपल्याला त्या मिळकतीचे जूने उतारे, उताऱ्या वरील जुन्या नोंदी, जूने खरेदीखत, जुने फेरफार म्हणजे Mutation Entry  किंवा जे काही पूर्वीचे हस्तांतरणाचे दस्त असेल ते तसेच महसुल खात्याच्या जुन्या नोंदी, जूने उतारे वगैरे व मिळकतीचे इतर जे काही कागदपत्रे असतील ते लागत असतात. त्या सर्वांचा अभ्यास केला जातो. अपण मालक असू तर मिळकतीचा आपण टॅक्स भरत असल्याची पावती. जशी परिस्थिती असेल त्या प्रमाणे कागदपत्रे लागत असतात. जसे घर मिळकतीसाठी सर्च असेल तर घराची बांधकाम परवानगी, कमेंसमेंट सर्टीटिकेट, कंप्लीशन सर्टीफीकेट म्हणजेच पूर्णत्वाचा दाखला. मंजूर नकाशा, मिळकत सदनिका असेल तर तिचे घोषणापत्र. अथवा वकिल सांगतील त्याप्रमाणे कागदपत्रे लागू शकतात. आपल्याकडे जे काही कागदपत्रे त्या मिळकती संदर्भात असतील ते सर्व कागदपत्रे  शक्यतो देणे त्यामुळे सर्च घेण्यास काही अडचण येत नाही व लवकर सर्च घेण्यास मदत होते.


सदर मिळकतीचे जूने उतारे तसेच जून्या नोंदी आपण महसूल खात्यातून किंवा त्यांच्या ओनलाईन संकेस्थळावरून काढू शकतो त्यामुळे आपल्याला त्या मिळकतीचा पूर्व इतिहास समजतो. 


(ऑनलाईन उतारे, महसूल नोंदी वगैरे कशा काढाव्यात त्याबाबत माहिती दुसऱ्या पोस्ट मध्ये दिलेली आहे.)


सर्च रिपोट हा मागील किती पण वर्षाचा असू शकतो जसे उदा. मागील 30, 15 16 वर्षाचा असा असू शकतो. 


सर्च रिपोर्ट काढतांना सर्व कागदपत्रांची छाणनी केली जाते व हे बघीतले जाते की शेवटच्या मालका पर्यंत ती मिळकत कशी हस्तांतरीत झाली. त्यावर काही कर्ज, बोजे वगैरे तर प्रलंबीत नाही नाही. पूर्वी कर्ज घेतलेले असेल तर त्याची परत फेड कशी केली वगैरे सर्व त्या मिळकतीसंबंधातील पूर्वीचा इतिहास बघीतला जातो. 


पूर्वीला हे कामे ऑनलाईन होत नव्हती. त्यामुळे तेव्हा सर्च घेणे कामी वकिलांना दुय्यम निंबधक खरेदी विक्री कार्यालय तसेच संबंधीत कार्यालयात जावे लागत व तेथे आवश्यक ती फी भरून सर्च काढावा लागत असे. सर्च घेतल्याची व त्या कामी पैसे भरल्याची पावती ही सर्च रिपोर्ट सोबत जोडली जाते व ती पावती त्याचाच एक भाग असते. 


आज चे जग हे सर्व ऑनलाईन झालले आहे. त्यामुळे आज बहुतांशी कामे हे आईनलाईन होत असतात. त्यामुळे मिळकतीचा सर्च देखील वकिलांकडून हेऑनलाईन घेतला जात असतो. मिळकतीचा ऑनलाईन सर्च घेण्याकामी सर्व उतारे, जून्या नोंदी वगैरे योग्य ती फी ऑनलाईन भरून काढावी लागते. तसेच आय.जी.आर. महाराष्ट्र या शासनाच्या संकेस्थळाला जावून लाॅगीन करून मागील जितक्या वर्षाचा सर्च रिपोर्ट असेल त्याप्रमाणे ऑनलाईन फी भरून मिळकतीचा सर्च घेता येतो. जर ऑनलाईन काही माहीती उपलब्ध्द नसेल तर संबंधीत कार्यालयात जावून ती माहीती घ्यावी लागते. 


तसेच जर मिळकत ही इंन्डस्ट्रीयल असेल तर संबंधीत कार्यालयात जावून त्या मिळकतीचा सर्च घ्यावा लागतो. 


सर्च रिपोर्ट मध्ये मालकाचे नांवे, सहमालक असेल तर त्याचे नांव, त्यांचे वय, संपूर्ण पत्ता, मिळकतीचे वर्णन, त्याच्या चतःसिमा, त्या मिळकतीचा पूर्व इतिहास, टायटल चेन चे संपूर्ण वर्णन, म्हणजेच त्या मिळकतीचा सखोल इतिहास लिहीलेला असतो. म्हणजेच पहिल्या मालका पासून शेवटच्या मालका पर्यंत ती मिळकत कशी कशी हस्तांतरण झालेली आहे हे बघीतले जाते. 


    आता आपण एक माहिती बघू की, मिळकतीचा सर्च हा किती वर्षाचा घेतला जात असतो. 

    मिळकतीचा सर्च हा मागील 13 वर्षाचा किवा मागील 30 वर्षा चा घेतला जात असतो. 13 वर्षाचा घ्यायचा की 30 वर्षाचा घ्यायचा ही कर्जाची रक्कम व बँकेची पॉलिसी यावर अवलंबून असते.

      30 वर्षाचा सर्च या साठी घेतला जात असतो की, मुदतीच्या कायद्या प्रमाणे 30 years of time fixed for redeeming the mortgage. तसेच fixed time for filing suit for redemption of mortgage as 30 years

    तसेच 12 वर्षाचा सर्च यासाठी घेतला जात असतो की,  मिळकतीवर कोणाचे Adverse possession  तर  नाही ना ? 

     Adverse possession is a legal concept that allows a person to acquire ownership of a property without legal title, if they meet certain conditions. This is done by occupying the property for a set period of time, without the permission of the legal owner.

          In terms of adverse possession, the period is defined to be 12 years. According to the Indian legal system, if a property owner fails to make a claim towards their property for 12 years, and the same tenant continues to occupy the property for 12 years, the ownership rights to the property is transferred to the tenant.


    तसेच सर्च घेताना ही देखील बघितले जात असते की, सदर मिळकती मध्ये कोणा लहान अज्ञान व्यक्ती चा तर हिस्सा नाही नाही ना ? 


(मित्रांनो मी ब्लॉग मध्ये Paid आणि फ्री ऑनलाइन सर्च कसा घेतात. ऑनलाइन जुने उतारे, जुन्या महसूल नोंदी, चालू मिळकतीचे उतारे, नोंदनिकृत दस्त कसे काढतात या बाबत प्रतेक स्वतंत्र ब्लॉग पोस्ट बनवलेली आहे आपल्याला या सर्व गोष्टी मिळकतीचा सर्च घेण्यासाठी कामात येऊ शकतात.) 

इतर ब्लॉग पोस्ट :-


मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

    थोडक्यात सर्च रीपोर्ट म्हणजे तुम्ही ज्या घरासाठी, फ्लॅट साठी, कर्ज घेत आहात किवा विकत घेत आहात ती जागा कोणाच्या मालकीची आहे. तिचे सर्व कायदेशीर व्यवहार पूर्ण आहेत ना ? जागा पहिलेच गहाण, तारण तर नाही ना दिलेली ? बिल्डर ने कायदेशीर प्रक्रिया तर पूर्ण केलेली आहे ना ? या सर्व गोष्टी तपासल्या जातात. 


तसेच जमिनीचे, प्लॉटचे, किवा फ्लॅट चे जी काही मिळकत आहे तिचे सर्व कागदपत्रे चेक केले जातात जसे टॅक्स भरणा पावती, पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate). Commencement Certificate, विविध शासकीय परवानिगी,कागदपत्रे, जुन्या नोंदी, जुने व चालू उतारे, पूर्वीचे खररेदी विक्री चे कागदपत्रे  इ. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.


Click Here To View Post

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads