ऑनलाइन डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी कशा काढाव्यात ?
ऑनलाइन डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी काढण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या संगणकावर किवा मोबाइल वर पुढील वेबसाइट
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
हे सकेतिक स्थळ (webside) सुरू करावे. अथवा गूगल सर्च मध्ये ऑनलाइन डिजिटल 7/12 असे जारी टाइप केले तरी आपल्याला ही वेबसाइट सापडून जाईल. आपण ही वेबसाइट सुरू केल्यावर पुढील प्रमाणे पेज सुरू होईल.
आपण नवीनच ही वेबसाइट सुरू केली असेल तर तुम्हाला सर्वात आधी New User Registration यावर ok करून व आपला मोबाइल नंबर आणि ईमेल चा वापर करून नवीन Login Id Create करून घ्यावे लागेल.
त्यानंतर आपला नवीन तयार केलेला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरुन सदर वेबसाइट वर लॉगिन करावे. त्यानंतर पुढील प्रमाणे आपण सादर वेबसाइट वर लॉगिन होऊन जाल.
आपल्याला एक उतारा किवा एक महसूल नोंद काढण्यासाठी 15 रुपये या प्रमाणे ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. त्यासाठी आपण सर्वात आधी वर रीचार्ज यावर ओके करून आपल्या खात्याते रीचार्ज करून घ्यावे. आपण रीचार्ज यावर ओके केल्यावर पुढील प्रमाणे पेमेंट चे पेज सुरू होईल.
त्यानंतर सादर वेबसाइट च्या वरच्या साइड ला होम पेज वर पुढील प्रमाणे options आहेत.
यावर आपण आपल्याला जे काही हवे असेल जसे की, डिजिटल 7/12 उतारा, डिजिटल महसूल नोंद, डिजिटल 8अ चा उतारा यावर ok करावे आणि आणि आपण आपल्याला हव्या असलेल्या नोंदी ची किवा 7/12 उतार्याची माहिती भरली की आपला 7/12 उतारा, महसूल नोंद जे काही असेल ते डाऊनलोड होऊन जाईल.
----फ्री 7/12 उतारा काढण्यासाठी----
तसेच आपल्याला बिनाशुल्क फ्री मध्ये 7/12 उतारा डाऊनलोड करावयाचा असेल तर पुढील वेबसाइट सुरू करावी.
त्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर वागेरे माहिती भरली का आपला फ्री चा उतारा डाऊनलोड होऊन जाईल. फ्री सेवा ही फक्त आपल्या माहिती साठी आहे.
तुम्हाला शासनाच्या काही कामा साठी उतारा लागत आसेल तर तुम्हाला पेड ची सेवा वापरुन वरील दिलेल्या वेबसाइट वरून 7/12 उतारा डाऊनलोड करावा लागेल.
वरील दिलेल्या माहिती व्यतिरिक्त आपण 7/12 उतारा व नोंदी या मोबाइल मध्ये app डाऊनलोड करून देखील काढू शकतात.
मोबाइल app द्वारे उतारा व महसूल नोंदी काढण्यासाठी आपण मोबाइल मध्ये प्ले स्टोअर मधून 7/12 उतारा हे app डाऊनलोड करून करून घ्यावे. सादर aap आपण आपल्या मोबाइल मध्ये play store मधून डाऊनलोड करून घ्यावे.
हे app download केल्यावर यात देखील आपले लॉगिन आयडी वापरुन लॉगिन करून घ्यावे. आणि आपल्याला जे डॉक्युमेंट पाहिजेल आहे त्याची माहिती भरून घ्यावी.
याप्रकारे तुम्ही ऑनलाइन 7/12 उतारा तसेच महसूल नोंदी डाऊनलोड करू शकतात.