जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि 8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये कसे काढावेत ?

Adv.Saurabh Rajput
0

जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि  8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये  कसे काढावेत ? 


    आज आपण माहिती पाहणार आहोत, जुन्या महसूल नोंदी आणि जुने मिळकत 7/12 उतारे आणि 8अ उतारे विनाशुल्क म्हणेच (फ्री) मध्ये  कसे बघावेत ? या बाबत....


  पूर्वीला सर्व कामे हे ऑफलाइन होत असत. त्यामुळे सरकारी कामे, महसूल खात्याची कामे देखील Offline होत असत. त्यामुळे लोकांना देखील बर्‍याच कामासाठी महसूल कार्यालयात, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायात, तहसील कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय, पंचायत समिती या ठिकाणी या कामासाठी जाऊन चकरा माराव्या लागत. परंतु आता बरेच कामे / शासकीय सेवा या शासनाने ऑनलाइन करून दिलेल्या असल्यामुळे  लोकांना याचा खूप फायदा होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार सुद्धा कमी होण्यास मदत झालेली आहे. 

तुम्ही शेतकरी असाल, वकील असाल, तसेच महसूल कर्मचारी, शासनाचे कर्मचारी, बँक कर्मचारी  असाल किवा सामान्य नागरिक असाल  तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जुन्या महसूल नोंदी आणि जुने मिळकतीचे 7/12 उतारे आपण ऑनलाइन काढल्यामुळे आपला खूप सारा वेळ वाचतो आणि आपल्याला  हवी असलेली महसूल माहिती क्षणात ऑनलाइन मिळू शकते आणि आपले काम हे खूप लवकर आणि Smart पद्धतीने होत असते. वकिलांना देखील कोणताही कायदेशीर दस्त तयार करतांना किवा न्यायालयाच्या कमी महसूल नोदींची गरज पडल्यास  ऑनलाइन नोंदी उपलब्ध असल्याने  त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो आणि त्यांचे काम लवकर होऊ शकते. 

आपण आपले महसूल संबधित शासकीय काम, खरेदी विक्री, हक्कासोड, मृत्यूपत्र, मिळकतीचा सर्च घेणे,  बँकेस मिळकत गहन, तरण देणे. मिळकती वरचा   बोजा कमी करणे, न्यायालया चे काम करण्या साठी तसेच इतर माहिती, जुना व्यवहार, फेरफार यांची माहिती होण्या साठी जुन्या महसूल नोंदी आणि जुने मिळकत 7/12 उतारे बघणे गरजेचे असते. त्यामुळे आपली फसवणूक सुद्धा होत नाही. आपल्याला मिळकतीचा मालक कोण आहे ? तो मालक कसा झाला, त्याला ती मिळकत कशी मिळाली, तसेच मिळकतीचा Search (शोध) घेताना सुद्धा ही माहिती महत्वाची असते. जमिनी किवा प्लॉट मिळकतीचा  आपल्याला कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे. त्या संबंधी आपण जुन्या महसूल नोंदी बघितल्या तर आपल्याला त्या जमिनीचा मूळ मालक कोण, त्यात वेळो वेळी काय बदल झाला याची माहिती समण्यास मदत होते.   

जेव्हा आपण ही माहिती फ्री मधून घेत असतो तेव्हा सदर माहिती ही आपण फक्त आपल्या वैयक्तिक कामासाठी माहिती वापरू शकतो. 
आपल्या जर सदर माहिती चा उपयोग शासकीय कामा साठी करावयाचा असेल तर आपल्याला ऑनलाइन शासकीय फी भरून डिजिटल सही चा दस्त काढावा लागतो. 

(महसूल नोंदी आणि जुने 7/12 उतारे  फ्री आणि पेड दोन्ही  प्रकारचे आपण ऑनलाइन बघू शकतो. ही सेवा शासनाने आपणास उपलब्ध करून दिलेली आहे. पेड सेवा यासाठी डिजिटल 7/12 उतारा यासाठी 15 रुपये प्रतेकी व नोंद काढण्यासाठी देखील 15 रुपये प्रत्येक नोंदी साठी या प्रमाणे पैसे लागतात.) 
(या पोस्ट मध्ये फ्री महसूल नोंदी आणि जुने 7/12 उतारे ऑनलाइन कसे काढावेत या बद्दल माहिती दिलेली आहे. पेड डिजिटल 7/12 उतारा आणि महसूल नोंद काशी काढावी यासाठी  दुसरी पोस्ट तयार केलेली आहे.) 

जेव्हा ऑनलाईन नोंद किंवा जुने अभिलेख उतारे उपलब्ध नसतील तर आपल्याला एक अर्ज करून त्यावर 5 रुपयाचे तिकीट लाऊन तो अर्ज तलाठी यांचेकडे द्यावा लागतो. काही नोंदी जुन्या असतील तर तहसील कार्यालयात रेकॉर्ड रूम किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूमला जिथे रेकॉर्ड उपलब्ध असतात तिथे अर्ज द्यावा लागतो. शक्यतो ऑनलाईन नोंदी भेटून जातात. परंतु नोंद जास्त जुनी असेल तर किंवा ऑनलाईन उपलब्ध नसेल तर अर्ज देऊन काढावी लागते.

चला तर मग बघूयात ऑनलाइन फ्री महसूल नोंदी व जुने 7/12 उतारे कसे काढवेत... ? 

सर्वात आधी आपण 


 हे संकेतस्थळ आपल्या मोबाइल किवा संगणका मध्ये उघडावे. 
किवा 
गूगल सर्च मध्ये
 bhulekh.mahabhumi किवा online 7/12
असे देखील सर्च केले तरी आपल्याला सदर सांकेतिकस्थळ सापडून जाईल. 

जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि  8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये  कसे काढावेत ?

त्यानंतर आपली चावडी (Digital Notice Board) यावर क्लिक करावे. त्यानंतर पुढील पेज सुरू होईल. 

जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि  8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये  कसे काढावेत ?

त्यानंतर वरील पेज मध्ये माहिती भरावी आणि आपली चावडी पहा यावर ओके करावे. त्यानंतर पुढील पेज सुरू होईल. 

जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि  8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये  कसे काढावेत ?

त्यानंतर जुने अभिलेक या पर्यायावर ओके करावे. त्यानंनातर आपण पुढील पेज वर याल. 

जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि  8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये  कसे काढावेत ?

आपण जर पहिल्यांदा या वेबसाइड वर आले असाल तर आपल्याला सर्वात आधी न्यू यूजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर ओके करून नवीन खाते तयार करून घ्यावे लागेल. नवीन रजिस्ट्रेशन झाल्यावर आपला आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवावा कारण पुढे आपल्याला परत त्याची गरज पडत असते. 
त्यानंतर आपण आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे. 

जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि  8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये  कसे काढावेत ?

लॉगिन झाल्यानंतर वरील पेज दिसेल त्या मध्ये माहिती भरून घ्यावी. डॉक्युमेंट / दस्तएवज निवडा या ठिकाणी आपल्याला जे हवे असेल ते ऑप्शन निवडावे जसे की, Old Mution, Satbara, आणि 8A

जुन्या महसूल नोंदी व जुने मिळकत 7/12 उतारे आणि  8अ उतारे विनाशुल्क (फ्री) मध्ये  कसे काढावेत ?

त्यानंतर आपल्याला हवी असलेली जुनी महसूल नोंद, जुने 7/12 उतारे, 8अ  उतारे आपल्याला भेटून जातील, ते आपण डाऊनलोड करून घेऊ शकतो. 

जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेला व जमीन कशी हस्तांतरित होत गेली याची माहिती असावी लागते. त्यामुळे ही माहिती महत्वाची आहे. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात देखील उपलब्ध असते.  


Click Above To See Blog Post 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads