मृत्युपत्र.

Adv.Saurabh Rajput
0




 माहिती मृत्यूपत्रा  विषयी


मित्रांनो आपण माहिती बघणार आहोत मृत्यूपत्रा विषयी. 

चला तर मग बघूयात माहिती मृत्यूपत्रा विषयी. 


मलमत्तेचे हस्तांतरण हे Transfer Of Property Act  नुसार दोन जीवंत व्यक्तींमध्ये होत असते. मृत्यू नंतर देखील हस्तांतरण हे दोन प्रकारे होत असते. जसे मृत्यूपत्रा नुसार हस्तांतरण किवा मृत्यूपत्र तयार केलेले नसेल तर कायदेशीर तरतुदी नुसार हस्तांतरण. 


व्यक्तिला त्याच्या मालकीच्या व हिश्याच्या मालमत्तेची विल्हेवाट तो जीवंत असतानाच लावावयाची असेल तर तो मृत्युपत्र तयार करून ठेऊ शकतो. मृत्यूपत्रा ची अमलबजावणी ही मृत्यूपत्र करून ठेवणार याच्या मृत्युनंतर होत असते. मृत्यूपत्र  हयातीत असताना करून  ठेवले नाही तर मग मृत्यूनंतर कायदा उपस्थित होतो आणि त्या प्रमाणे मिळकतीची विल्हेवाट लावली जाते. 


मृत्यूपत्र हे व्यक्तीच्या मृत्यू नंतर अमलात येते. भारतीय वारसा कायदा 1985, चे कलम 2 (ब) नुसार जीवंत व्यक्ति हा त्याच्या हयातीत किती ही वेळा  मृत्यू पत्र तयार करू शकतो. परंतु त्याच्या मृत्यू नंतर जे त्याचे शेवटचे मृत्यूपत्र असेल ते कायद्या नुसार ग्राहाय समजले जाते. मृत्यूपत्र करणार व्यक्ति हा त्याच्या हयातीत कितीही  वेळा देखील त्यात दुरूस्ती करू शकतो.  त्याला इंग्रजीत कोडिसील असे म्हणतात. मात्र असे केलेले शेवटचे कोडिसील  कायद्या नुसार ग्राह्य समजले जाते.


मृत्यूपत्र हे हिदू, मुस्लिम जो काही मृत्यूपत्र करणार्‍याचा धर्म असेल त्यांच्या धर्मा च्या कायद्या नुसार केले जाते. 


हिंदू व्यक्तीसाठी हिंदू वारसा कायदा 1956 चे कलम 30 मधील तरतुदी नुसार मृत्यूपत्र होणे गरजेचे आहे. भारतीय वारसा कायदा 1956 चे कलम 63 व पुरावा कायदा  (अधिनियम) 1872 चे  कलम 68 व 71 प्रमाणे मृत्यूपत्र शाबीत करावे लागते. 


मृत्यूपत्र करण्यासाठी कोणतेही मुद्रांक शुल्क लागत नाही परंतु नोंदणी फी साधारण 200 रुपये लागते. ती आपण ऑनलाइन काढू शकतो.  हिदू कायद्या नुसार मृत्यूपत्र हे लिखित असणे गरजेचे आहे. मृत्यूपत्र हे नोंदणी केलेले नसेल तरी चालते. परतू  नंतर काही वाद उपस्थित झाला तर सक्षम न्यायालयाकडून ते शाबीत करावे लागू शकते. परंतु नंतर काही वाद उपस्थित होऊ नये म्हणून नोंदणी केलेले चांगले राहते. 


मृत्यूपत्र करणार व्यक्ति हा मृत्यूपत्र करते वेळी सज्ञान असावा, तो चांगल्या मानसिक व शारीरिक स्थितित असावा. मृत्यूपत्र नोंदणी करते वेळी शारीरिक व मानसिक स्थिति चांगली असल्या बाबत डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट लागते. हे  सर्टिफिकेट शक्यतो सरकारी डॉक्टरांचे असले तर चांगले असू शकते कारण बर्‍याच वेळा नोंदणी  करणार  अधिकारी हे आपल्याला सरकारी डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र आणावायस संगत असतात. 


मृत्यूपत्रा बाबत काही वाद उपस्थित झाला किवा मृत्यूपत्र हे जास्त मिळकतीचे, जास्त प्रॉपर्टि चे असेल तर त्यासाठी न्यायालया कडून Probate Certificate घ्यावे लागते.


  देश सेवा करणारे जे सैनिक आहेत त्यांना मृत्यूपत्र करणे कमी काही सवलत देखील कायद्या मध्ये दिली गेलेली आहे. जसे युद्धात असलेले सैनिक त्यांच्या तोंडी जबाबा नुसार मृत्यूपत्र करू शकतात. अश्या वेळेस साक्षीदार सैनीकाच्या वतीने मारूत्यपत्रावर सही करू शकतात.  मृत्युपत्रात सज्ञान किवा अज्ञान कोणालाही मिळत देऊ शकतो. 


मृत्युपत्र नोंदणी


अ. मृत्युपत्र नोंदणी करण्यासाठी मृत्युपत्रकर्ताकडून करावयाची कार्यवाही-


1. मृत्युपत्राचा दस्त तयार करणे.


2. मृत्युपत्रावर दोन साक्षीदारासमोर सही/सहया/अंगठे करणे.


3. ज्या दुय्यम निबंधकाचे कार्यक्षेत्रात वास्तव्य करीत असेल किंवा ज्या कार्यक्षेत्रात मृत्युपत्रावर सही केली असेल किंवा त्यास जे दुय्यम निबंधक कार्यालय सोयीस्कर असेल, अशा दुय्यम निबंधक कार्यालयात मृत्युपत्र नोंदणीस सादर करणे.


4. दुय्यम निबंधकासमोर मृत्युपत्रावर केलेल्या निष्पादनाचा कबुलीजबाब देणे.


5. त्यांना असलेल्या दोन ओळखदार यांना त्यांची ओळख पटविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थीत करणे.


6. रुपये 200/- इतकी नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क प्रती पान रुपये 20/- प्रमाणे ऑनलाइन काढलेली फी दस्ता सोबत दुय्यम निबंधकाकडे सादर म्हणजेच जमा करणे.


7. दस्तामध्ये स्वतःचे व दोन ओळखदारांच्या ओळखपत्रांची प्रती लावणे.


ब. मृत्युपत्र नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधकाकडून करावयाची कार्यवाही-


1. वरीलप्रमाणे कागदपत्रे असल्याची खातरजमा केल्यानंतर दस्त नोदंणीस दाखल करुन घेणे.


2. रुपये 200/- नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क प्रती पान रुपये 20/- प्रमाणे जमा करून घेणे.


3. मृत्युपत्रकर्ता यांचा कबुलीजबाब नोंदविणे.


4. मृत्युपत्रकर्ता यांना ओळखत असलेल्या दोन ओळखदाराची ओळख घेणे.


5. दस्त नोंदणी पूर्ण करून स्क्रिनिंग करुन घेणे.


6. मूळ दस्त, नोंदणी झाल्या नंतर मृत्युपत्रकर्ता यांना देणे.


                    

मृत्युपत्र कायदेशीर ठरण्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

 भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान आणि ज्याची मानसिक स्थिती सुदृढ आहे अश्या व्यक्तीस स्वतः च्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भात मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजेच WILL करता येते. तर वडिलोपार्जित मालमत्तेमधील आपला अविभक्त हिस्सा देखील मृत्युपत्राने देता येतो. मृत्युपत्राचा अंमल मात्र ते करणाऱ्याच्या मृत्युनंतर होतो, म्हणजेच मृत्युपत्र करणारा बोलायचा थांबला कि त्याचे मृत्युपत्र बोलायला लागते असे म्हणतात.  


मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि कमीतकमी दोन सज्ञान साक्षीदारांनी, एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही. मात्र दोन्ही साक्षीदारांनी एकाचवेळी सही केलीच पाहिजे असे नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हेहि माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्युपत्र सिध्द करण्यासाठी दोन पैकी एका साक्षीदाराची साक्ष घेणे अनिवार्य आहे.


मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अश्या आशयाचे डॉक्टरचे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे केव्हाही चांगलेच .  



मृत्यूपत्राची नोंदणी अनिवार्य नाही.


मृत्यूपत्रास कोणतीही स्टॅम्प ड्युटी लागत नाही, मृत्युपत्राची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणेही कायद्याने बंधनकारक नाही. याबाबतीत आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. मृत्यूपत्राची वैधता हि ते नोंदणीकृत आहे किंवा नाही यावर ठरत नाही. उदा. मृत्यूपत्राची नोंदणी केली नसेल तर ते अवैध आहे हा मोठा गैरसमज आहे आणि अनोंदणीकृत मृत्युपत्र असेल तर विविध परवानग्या मागताना लोकांची उगाचच अडवणूक केली जाते आणि मग सरसकट प्रोबेट आणण्याची सक्ती केली जाते, ज्याला वेळ आणि खर्च जास्त येतो. अशा अडवणुकिविरुद्ध विरुद्ध कोर्टात जाणे म्हणजे वेळ आणि पैसे खर्च होणार. त्यापॆक्षा प्रॅक्टिकली आम्ही लोकांना मृत्युपत्र रजिस्टर करायला सांगतो एकतर त्याचा खर्च इतर दस्तांच्या तुलनेने कमी येतो आणि जेणेकरून पुढचा त्रास वाचतो. नोंदणी कायदा, १९०८ प्रमाणे इतर कुठलेही दस्त हे अंमलात (execute )आणल्यानंतर ४ महिन्यापर्यंत नोंदवावे लागतात, मात्र मृत्युपत्र हे कधीही नोंदवता येते. त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ते नोंदवता येते.


 मृत्युपत्र हे सर्वात शेवटचेच ग्राह्य धरले जाते :


मृत्यूपत्र हा असा दस्त आहे कि तो कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. असे वरील दस्तांच्या बाबतीत होत नाही. बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूपत्रामध्ये योग्य ते बदल करावे लागू शकतात . तसेच संपूर्ण मृत्युपत्र न बदलता पुरवणी-मृत्युपत्र (codicil ) देखील करता येते आणि त्यास मृत्युपत्राच्याच सर्व कायदेशीर तरतुदी लागू होतात. वरील कायदेशीर तरतुदी लक्षात घेता अभ्यास करता आपल्या लक्षात येईल कि शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जात असल्याने आणि मृत्युपत्राची नोंदणी करणे अनिवार्य नसल्याने शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. परंतु कोणताही कायदा लागू होतो कि नाही हे त्या केसच्या फॅक्टसवर अवलंबून असते आणि आपल्या केसमध्ये तर दोघेही आपलेच मृत्युपत्र वैध आहे असा वाद निर्माण झाल्याचे दिसत असल्याने कोणते मृत्युपत्र वैध धरायचे हे सक्षम कोर्टच ठरवू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads