ई कोर्ट App / E Court App
मित्रांनो मी तुम्हाला आज माहिती देणार आहे E Court App बाबत. चला तर मग बघूयात माहिती.
मित्रांनो आपली जर न्यायालयात काही केस चालू असेल किवा आपल्या काही कामासाठी आपल्याला केस संदर्भात काही माहीत हवी असेल किवा एखाद्या केस संदर्भात ऑर्डर पाहिजेल असेल, कोणावर काही केस दाखल झालेली आहे का ? केस मधील वकील कोण आहे ? याची माहिती हवी असेल तर आपण मोबाइल मध्ये E Court application डाऊनलोड करून माहिती मिळू शकते. आपल्याला या app मूळे आपल्या केस ची पुढील तारीख काय आहे. ? केस मध्ये वेळो वेळी काय आदेश झालेत.? आपली केस कोणत्या स्टेज ला आह ? आपल्या केस मध्ये वकिलांनी काय काम केले, केस मधील रोजनमा ही सर्व माहिती आपल्याला या app मूळे समजते. तसेच केस संदर्भात न्यायल्यातील daily बोर्ड देखील बघू शकतात. तसेच केस संदर्भातील orders देखील या app वर वेळो वेळी upload केल्या जातात. त्या आपण डाऊनलोड करून शकतो.
तर बघूयात की हे application कोणते आहे व ते कसे वापरावे.
हे application download करण्यासाठी सर्वात आधी आपण आपल्या मोबाइल मधील play store open करावे. आणि E Court App असे search करावे. सदर app हे तालुका स्तरावरील JMFC व जिल्हा व सत्र न्यायालयाच्या केस च्या माहिती साठी आहे.
(तसेच हीच माहिती आपण संबधित न्यायालयांच्या website वर जाऊन देखील काढू शकतो.)
app आपण Pay Store वरन download करून घ्यावे.
त्यानंतर पुढील प्रमाणे app open होईल.
त्यानंतर सदर app मध्ये तालुका, जिल्हा व आपल्याला हवे असलेले न्यायालय सिलेक्ट करून घ्यावे.
त्यानंतर सदर app वर आपल्याला सर्व options दिसतील.
या app वर जे काही Options दिलेले आहेत त्यांचा वापर करून व कोर्ट सिलेक्ट करून, केस नंबर टाकून, नाव, वर्ष टाकून किवा वकिल यांच्या नावाने, केस ज्याच्या नावाने आहे त्याच्या नावाने यापैकी कोणतीही जी माहिती आपल्याकडे आहे ती टाकून सदर केस बाबत माहिती आपण शोधू शकतात.
सदर केस आपल्याला सापडल्या नंतर त्यात आपल्याला पुढील तारीख काय आहे, त्यामध्ये काय काय कामकाज झालेले आहे. त्यामधील order आपल्याला भेटून जातील.
तसेच डेली बोर्ड यावर ok करून आपण न्यायालयातील केसचा daily बोर्ड देखील बघू शकतो.
![]() |
Click Here To Install App From Play Store App |
इतर ब्लॉग पोस्ट :-
ई कोर्ट App वरील काही शब्द व त्यांचे अर्थ
महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी.
![]() |
Click Above To See Blog Post |