न्यायालयात दिवाणी दावा दाखल करतांना व करण्यापूर्वी... काय करावे ?

Adv.Saurabh Rajput
0



न्यायालयात दिवाणी दावा दाखल करतांना व करण्यापूर्वी... काय करावे ? 


मित्रांनो आज मी माहिती देणार आहे न्यायालयात दिवाणी केस कशी दाखला करावी. आपण नवीन जूनियर वकील असाल तर आपल्याला ही माहिती कामात येईल तसेच आपण पक्षकार जरी असाल तरी सदर माहिती तुम्हाला कामात येऊ शकते. कारण यामुळे आपल्याला समजू शकेल की आपले वकील कश्या प्रकारे काम करता व ते बरोबर काम तर करता आहेत ना ?  

सर्वात आधी आपल्याला न्यायालयात केस दाखल करण्याच्या आधी पक्षकारा कडून  केस संदर्भात, तसेच पक्षकारला येत असलेल्या अडचणीची सर्व माहिती घ्यावी. सर्व गोष्टी निट लक्षपूर्वक येकुण घेऊन समजून घ्याव्यात. सर्व कागदपत्रे निट बघावेत. त्यानंतर वादाचा मुख्य मुद्दा काय आहे हे बघावे. त्यानंतर आपल्या पक्षकारला काय न्याय पाहिजेल आहे हे बघावे. त्यासाठी आपण काय - काय करू शकतो, आपल्याकडे त्या संदर्भात कोणकोणते मार्ग आहेत हे बघावे. 

त्यानंतर सदर केस मुदती मध्ये आहे ना हे बघावे, म्हणजे सदर केस दाखल करण्यास मुदतीच्या कायद्याची बाधा व अडचण तर येत नाही न हे बघावे. 

सदरचा वाद काय आहे. आपल्याला कोणत्या कोणत्या कायद्या चा उपयोग होईल हे बघावे. सदर केस दाखल करण्यास न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते हे बघावे. म्हणजे आपल्याला तो दावा त्या कोर्टात दाखल करावा लागेल. 

त्यानंतर आपल्याला कोणत्या न्यायाधिकरनात केस दाखल करावी लागणार आहे हे आपल्या केस नुसार निश्चित करून घ्यावे. उदा. महसूल, तहसीदार, मंडल अधिकारी, प्रांत अधिकारी, जिल्हादिकरी, न्यायालय  वागेरे, कामगार न्यायलाय, ग्राहक न्यायालय वगैरे.  

    त्यांनातर आपण आपल्या पक्षकारा सोबत चर्चा करून  बघावे की सदर वाद न्यायालया च्या बाहेर  मिटतो का, काही दूसरा मार्ग आहे का. कारण त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचू शकतो. आणि आपले देखील मुख्य काम हेच आहे की पक्षकाराला न्याय मिळून देणे. आणि तुम्ही देखील पक्षकारचे काम नीट पद्धतीने केले तरी पक्षकार तुम्हाला fee देईलच. 

पक्षकारची न्यायल्यात जाण्याची तयारी आहे ना ? केस ला किती वेळ लागू शकतो, केस मध्ये काय काय होऊ शकते. केस ची फी ह्या बाबींची पहिलेच पक्षकारा सोबत निट चर्चा करून घ्यावी कारण आपल्याला त्यामुळे पुढे काही अडचण येत नाही व आपण आपले काम निट करण्यास आपण मोकळे होऊन जातो. 


त्यानंतर आपण हे बघणे की दावा दाखल करण्या पूर्वी योग्य ती पूर्तता झालेली आहे का ? व आपल्या पक्षकाराने ती पूर्तता केलेली आहे का ? म्हणजे दावा दाखल करण्या पूर्वी संबंधित खाते म्हणजे ज्याच्याशी वाद सबंधित असेल त्या त्या संबंधीत कार्यालयत  वगैरे गरज असल्यास अर्ज दिला आहे का ? न्यायालयात जाण्या आधी पण त्याच्याने वाद मिटू शकतो किवा आपल्याला तो पुरावा देखील न्यायालयत कामात येऊ शकतो. (शक्यतो पक्षकार हे देखील सर्व मार्ग करून न्याय मिळत नाही म्हणूच वकिला कडे आलेले असतात.) 

उदा. महसूल खात्याच्या निगडीत वाद असेल तर तेथे अर्ज वागेरे करण्याची गरज आहे का हे पाहून घेणे. कारण तिथून आपले काम होऊ शकते. या गोष्टी बघून घेणे. 

डायरेक्ट न्यायालयात जाण्या आधी या पूर्तता बघून घेणे कारण त्यामुळे सुद्धा आपला वाद मिटू शकतो. व आपल्याला न्यायालय पण विचारेल तुम्ही डायरेक्ट न्यायालयात का आलात आधी त्या पूर्तता कारला हव्या होत्या. 

उदा. मृत्युपत्रा संबंधित वाद असेल तर पहिले तलाठी, मंडल अधिकारी, मग तहसीदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी या संबंधित न्यायाधिकरणत जाऊन तक्रार करणे, केस दाखल करणे, त्यानंतर आपण न्यायलायत पण जाऊ शकतो. कारण इकडून आपले काम होऊन गेले तर आपल्याला वरच्या न्यायालयत जाण्याची गारज देखील पडू शक्त नाही. तसेच खोटे व बनावट खरेदी विक्री, नोंदी संदर्भात वाद असेल तर संबंधित नोंदणी अधिकारी यांच्याकडे कोर्टात केस दाखल करण्या पूर्वी तक्रार अर्ज करून देणे कारण त्यामुळे ते देखील केस दाखला करून देऊ शतात व आपल्याला देखील न्यायालया कमी पुरावा होऊन जातो.   या गोष्टी देखील बघून घेणे महत्वाचे आहे. 


त्यानंतर आपल्याला सदर केस दाखल करण्या पूर्वी समोरच्या पक्षाला  नोटीस  पाठवावी लागेल. सदर नोटीस निट काळजीपूर्वक तयार करावी कारण आपण जे मुद्दे नोटीस मध्ये टाकणार आहोत तेच मुद्दे आपल्या केस मध्ये दाव्यात येत असतात. केस मध्ये आपल्याला नोटीस च्या बाहेर म्हणजे नोटीस मध्ये जी कथणे केलेली आहे त्या बाहेर जाण्यास अडचण येऊ शकते. नोटीस मध्ये  आपल्याकडून काही चूक झाली तर त्याचा फायदा समोरच्या पक्षाला होऊ शकतो त्यामुळे नोटीस निट तयार करावी. नोटीस ही आपल्या केस चा पाया आहे म्हणून ती देखील निट होणे गरजेचे आहे. तिथूनच आपल्या केस ची सुरुवात आहे म्हणून ती निट काळजीपूर्वक व लक्ष देऊन  करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या केस चा पाया भक्कम होईल. 

नोटीस ही एक धनूष्यबाणा सारखी आसते एकदा पाठवली म्हणजे गेली त्यामुळे ती निट काळजीपूर्वत तयार करावी. एकदा गेली म्हणजे आपण जास्त काही करू शक्त नाही) 
 (काही प्रॉब्लेम वागेरे आपला तर आपण पुरवणी नोटीस, दुरूस्ती नोटीस वागेरे पण पाठवू शकतो परंतु प्रथम जी नोटीस पाठवली जाते तीच मेन नोटीस असते म्हणून तीच नोटीस काळजीपूर्वक तयार करून पाठवणे गरजेचे व महत्वाचे आहे.)

चूक झाली तर आपले bad impression पडते व अडचण निर्माण होत असते. त्यामुळे निट काळजीपूर्वक व लक्षपूर्वक  काम करणे गरजेचे असते.  जे वकील हुशार आहेत. ज्याची चांगली प्रॅक्टिस आहे त्यांच्याकडून अश्या चुका होत नाहीत. त्यांचे काम निट असते. नवीन वकील यांच्याकडून अश्या चुका होऊ शकतात त्यामुळे मी ही माहिती जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे. आपल्याला देखील चांगले व  मोठे वकील बनायचे असेल तर ह्या गोष्टी त्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. 

जर आपल्याला जास्त काही माहीत नसेल तर नोटीस मध्ये फक्त मुद्दयाच्या मुख्य गोष्टी व आपली मागणी काय आहे तेच कथन करावे. कारण असे म्हटले जाते की, काय बोलावे या पेक्षा काय बोलू नये हे देखील महत्वाचे असते. त्यामुळे आपण काही चुकीचे नमूद करून दिले तर त्यामुळे दावा / केस दाखल केल्यावर आपल्याला अडचण येऊ शकते. कारण असे होऊ शकते की आपणच एखादी विधान आपल्या विरोधात करून देऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी बघून घेणे महत्वाचे आहे.  त्यामुळे नोटीस असो किवा बोलणे कमी पण महत्वाचे व मुद्दयाचे बोलणे गरजेचे असते. आपण जास्त बोललो तर आपल्याकडून चुकी होऊ शकते व आपण जे गरजे नाही आहे ते पण बोलून टाकतो. त्यामुळे ही काळजी घ्यावी.  

तसेच आपला वाद हा सरकार विरोधात असेल तरी देखील आपल्याला आधी नोटीस पाठवणे गरजेचे आहे. नोटीसीचा हा फायदा होत असतो की, आपण केस / दावा दाखल करणार आहोत याची समोरच्या पक्षाला माहिती होते व आपला वाद न्यायालयात जायच्या आधी देखील मिटून जाऊन शकतो. 

त्यांनातर वाद हा नोटीस दिल्याने मिटून जाऊ शकतो, किवा  समोरच्या पक्षकारचे नोटीस उत्तर येऊ शकते, त्यामुळे त्याचे काय म्हणणे आहे ते समजते. किवा ते नोटीस घेण्यास ते नकार देखील देऊ शकतात अश्या अनेक गोष्टी होऊ शकतात. पण तो आपल्यासाठी पुरावा होत असतो. 

त्यांनातर मुदती मध्ये समोरचा पक्ष नोटीसी प्रमाणे नाही वागला किवा पूर्तता झाली तर मात्र मग आपल्याला न्यायालयत दावा दाखल करावा लागेल.

 जर आपले पक्षकार यांना सर्वांना न्यायालयात एकाच वेळी येणे शक्य नसेल तर दावा दाखल करणे कमी व त्याचे कामकाज चालवणे कमी माहीतगार एका च्या नावाने आधी अधिकारपत्र / मुखत्यारपत्र तयार करून घेणे. 

त्यानंतर आपल्या दाव्यात / केस मध्ये सामनेवाले प्रतिवादी कोण कोण आहेत हे बघून घेणे, नंतर कोणी सामील प्रतिवादी करण्याची गरज आहे का ते पाहून घेणे. सामील प्रतिवती म्हणजे त्यांचाकडे आपली काही मागणी नसते फक्त त्यांना दाव्याची माहिती व्हावी व दाव्याशी  त्यांचा संबंध असतो त्यामुळे त्यांना सामील प्रतिवादी करावे लागते. 
त्यानंतर नोटीसी प्रमाणे आपला दावा तयार करावा. त्याला सर्व कागदपत्रे, न्यायालयाकडून प्रमाणित केलेले कागदपत्रे, लावले. त्यात मुख्य दावा,वकीलपत्र , दाखल दस्त यादी प्रमाणे दस्त, पत्ता पुरसिस, प्रतिण्यापत्र करून व जे काही आवशक व गरजेचे दस्त आहे  ते लावून आपला दाव्याचा सेट तयार  करावा. त्यासोबत प्रतिवादी साठी प्रती जोडाव्यात लागतात.  

सदर दाव्या सोबत आवशकता असल्यास तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज दाखल करावा लागतो. योग्य ती आकारणी करून  stamp duty ऑनलाइन  भरून घ्यावी व दाव्यासोबत सादर करावी लागते. 

सर्व दस्तावर निट सह्या घ्याव्यात. त्यानंतर आपला दावा E Filling करून घेऊन. न्यायालयात दाखल करून घ्यावा. 


(दावा कोर्टात कश्या प्रकारे चालतो याची मी दुसरी पोस्ट तयार केलेली आहे. त्यातून तुम्ही माहिती घेऊ शकतात की दिवाणी दावा कोर्टात कसा चालतो.)

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads