फ्री मध्ये मिळकतीचा सर्च कसा घ्यावा / मिळकतीची इंडेक्स 2 सूची ची नक्कल कशी काढावी.
मित्रांनो आज मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देणार आहे. एखादी मिळकतीचा उदा. प्लॉट, घर, शेत, सदनिका / फ्लॅट वगैरे मिळकतीचा फ्री सर्च कसा घ्यावा.
एखादी मिळकती विषयी काही नोंदणीकृत व्यवहार झालेला असेल जसे खरेदी - विक्री, बँकेस गाहण, बक्षीसपत्र, हक्कसोड, बँक बोजा कमी करणे वगैरे, किवा आपल्याला मिळकतीचा जुना व्यवहार बघयचा असेल तर आपण ऑनलाइन त्या झालेल्या व्यवहारची इंडेक्स 2 सूची (Index II) नक्कल ऑनलाइन कोठूनही काढू शकतो व झालेल्या व्यवहारा बाबत आपण माहिती बघू शकतो. इंडेक्स 2 सूची नक्कल काढणे कमी आपल्याला नोंदणी कार्यालयत जाण्याची गरज नाही.
इंडेक्स 2 सूची नक्कल काढल्याने आपण मिळकतीच्या जुन्या झालेल्या व्यवहारची माहिती बघू शकतो. ज्या व्यवहारा संदर्भात आपण इंडेक्स 2 नक्कल काढू त्याची आपल्याला माहिती मिळेल. त्यामुळे आपल्याला मिळकतीच्या झालेल्या जुन्या व्यवहाराबा बाबत माहिती मिळेल.
आपल्याला एखादी मिळकत विकत घ्यावयाची असेल, किवा एखादी मिळकती च्या झालेल्या व्यवहारा संदर्भात माहिती हवी असेल तर आपल्याला इंडेक्स 2 नक्कल बघून समजून जाईल. तसेच आपण वकील असाल आपल्याला एखादी मिळकतीचा सर्च घ्यावयाचा असेल, केस दाखल करण्यासंदर्भात, कोर्ट कामा साठी माहिती पाहिजे असेल, बँकेच्या कमी माहिती हवी असेल तर आपल्याला ऑनलाइन इंडेक्स 2 सूची (Index II) नक्कल बघून माहिती मिळून जाईल.
चला तर मग बघूयात ऑनलाइन इंडेक्स 2 सूची फ्री मध्ये काशी काढतात.
सर्वात आधी आपण महाराष्ट्र शासन यांच्या IGR Maharashtra ही पुढील वेबसाइट चालू करावी. आपण Google मध्ये IGR Maharashtra असेल देखील सर्च केले तरी देखील तुम्हाला ही वेबसाइट सापडून जाईल.
त्यानंतर पुढील प्रमाणे IGR Maharashtra नोंदणी व मुद्रांक विभाग याची वेबसाइट सुरू होईल.
त्यानंतर ई-शोध या ऑप्शन वर ok करावे.
त्यानंतर पुढील प्रमाणे पेज सुरू होईल.
त्यांनातर आपल्याला ज्या मिळकती संदर्भात माहिती हवी त्याची माहिती भरून घ्यावी जसे जिल्हा, तालुका, गाव, मिळकत नंबर ई. व सर्च या वर ok करावे.
त्यानंतर वरील प्रमाणे आपल्याला index दिसतील त्यामधून आपली कोणती इंडेक्स आहे ती नाव बघून शोधून घ्यावी आणि Index या ऑप्शन वर ok करावे.
इतर ब्लॉग पोस्ट :-
डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?
स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.
नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.
ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.
![]() |
Click Here To View Post |
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.
शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?
फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.
![]() |
Click Here To View Post |