मनाई हुकूम व स्टेटस को (Status quo) आदेश म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0

 

मनाई हुकूम व स्टेटस को (Status quo) आदेश म्हणजे काय ?

पहिले आपण पाहू मनाई हुकूम म्हणजे काय ?

 मनाई हुकूमाचे दोन प्रकार आहेत. 

1) तात्पुरता मनाई हुकूम आदेश 

(Temporary Injunction)


2) कायमचा मनाई हुकूम  आदेश 

 (Perpetual / Permanent Injunction) 



1) तात्पुरता मनाई हुकूम आदेश  : -

Application for Stay : - 


आपण आता माहिती बघणार आहोत तात्पुरता मनाई हुकूम आदेशा बाबत. 


तात्पुरता मनाई हुकूमचा अर्ज यालाच निशाणी -5 चा अर्ज असे देखील म्हणतात कारण हा अर्ज दाव्या सोबत निशाणी क्रमांक 5 ला असतो. 


निशाणी क्रमांक म्हणजे काय ?

Click Here To See Post 


निशाणी  क्रमांक म्हणजे :- 


    कोर्टा मध्ये अनेक दावे, केसेस, अर्ज दाखल होत असतात आणि या केसेस मध्ये वादी प्रतिवादी हे अनेक कागदपत्रे दाखल करत असतात. जेव्हा कोर्टा द्वारे कोणतेही कागदपत्रे हे केस मध्ये दाखल करून घेतले जातात तेव्हा कोर्ट हे त्या प्रत्येक दस्ताला निशाणी क्रमांक देते. कोर्टा कडून दस्त दाखल करून घेतल्या नंतर जो दस्ताला नंबर दिला जातो त्यालाच निशाणी क्रमांक असे म्हातात. दस्त हा  दाखल करून घेण्यात आला तरच त्याला निशाणी क्रमांक देण्यात येतो. 


 कागदपत्रांना, दस्तेएवज यांना निशाणी क्रमांक लावल्याने कोणता दस्त कोणत्या नंबर ला आहे हे बघणे सोपे होऊन जाते. त्यामुळे कोर्ट कर्मचारी, वकील, न्यायाधीश यांना केस चे रोजचे कामकाज करणे देखील सोपे होऊन जाते. कोर्टात दाखल होणारे दावे, अर्ज, केस हे दाखल करतांना देखील काही कागदपत्रांचे निशाणी क्रमांक निश्चित असतात म्हणजे त्या क्रमाणेच दस्त जोडावे लागतात. त्यामुळे सर्वत्र कोर्टाच्या कामात समानता देखील असते. 

 दावा दाखल करत असताना निशाणी क्रमांक 1 ला दावा असतो. निशाणी क्रमांक 2 ला वकीलपत्र येते. या प्रमाणे नंबर ने कागदपत्रे दाखल होत असतात. 


वादी दावा दाखल करतो तेव्हा तात्पुरता मनाई हुकूमचा अर्ज हा निशाणी क्रमांक 5 ला असतो. त्यामुळे त्याला निशाणी क्रमांक 5 चा अर्ज असे देखील म्हणतात. 


तात्पुरता मनाई हुकूम यासाठीच राहतो की दावा दाखल झाल्यानंतर त्याचा अंतिम निकाल लागण्यास बराच कालावधी लागणार असतो त्यामुळे अंतिम निकाल लागे पावेतो वादी याचे वाद मिळकती विषयीचे काही नुकसान होऊ नये. यासाठी कोर्टा कडून तात्पुरता मनाई हुकूम घ्यावा लागतो. 


वादी दावा दाखल करतांना दाव्या सोबत हा अर्ज दाखल करत असतो. तात्पुरता मनाई हुकूमाचा अर्ज हा एक अंतरिम अर्ज असतो. तुरतातूर्त मनाई हुकूम हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो म्हणजे फक्त दाव्याचा निकाल लागे पावेतो म्हणून त्याला अंतरिम अर्ज असे म्हणतात. 


जर वादी ने दाव्यासोबत तात्पुरता मनाई हुकूमचा अर्ज दिला नाही तर या तात्पुरत्या मनाई हुकूमच्या आदेशाचा प्रश्नच येत नाही. परंतु वादी याला असे वाटत असेल की प्रतिवादी हा दाव्याचा निकाल लागे पावेतो वादाची मिळकत हस्तांतरण करून टाकेल, त्यात काही भांदकाम करून टाकेल व वादी याचे कधी ही भरून न येणारे नुकसान होऊ शकते त्यावेस वादी हा तात्पुरता मनाई हुकूमचा अर्ज दाव्यासोबत दाखल करू शकतो. कोर्टाला वाटले नुकसान होऊ शकते व पुरावे बघून सुद्धा कोर्ट दाव्याचा अंतिम निकाल लगेपावेतो तुरतातूर्त मनाई हुकूमचा आदेश पारित करू शकते.


तात्पुरता मनाई हुकूमचा आदेश कधी व केव्हा घेतात ?  


जेव्हा वादी कोर्टात दावा दाखल करणार असतो असतो.  वादी ज्या मिळकती विषयी दावा दाखल करणार आहे.त्यावेळी जरी दावा दाखल होणार आहे. किवा दावा दाखल केला आहे.  दाव्याचा अंतिम निकाल लागण्या पूर्वी  त्या मिळकती विषयी  वादी चे  नुकसान होऊ शकते जसे ती मिळकत प्रतिवादी च्या ताब्यात किवा कबज्यात असेल तर प्रतिवादी ती मिळकत बेकायदेशीर विक्री किवा हस्तांतर करू  शकतो. त्यात काही बदल करू शकतो. आणि त्यामुळे दाव्यात गुंतागुंत वाढू शकते व वादी चे कधी ही भरून न येणारे नुकसान होऊ शकते.  दाव्याचा अंतिम निकाल लागे पावेतो त्यात प्रतिवादी काही बेकायदेशीर बादल किवा हस्तांतरण  करू शकतो. त्यामुळे दावा दाखल करते वेळी च तात्पुरता मनाई हुकूमचा आदेश कोर्टा कडून घ्यावा लागतो. 


 वादी कोर्टात दावा दाखल करते वेळीच  दाव्या सोबत सुरवातीलच वादीला तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज दाखल करावा लागतो.  तुरतातूर्त मनाई हुकूम (Temporary  Injunction) म्हणजे दाव्याचा अंतिम निकाल लागे पावेतो त्या दाव्यातील वाद मिळकती विषयी  कोर्ट  तुरतातूर्त मनाई हुकूमा चा आदेश देऊ शकते. म्हणजे जो पावेतो कोर्टात दावा चालू आहे तो पावेतो त्या मिळकती वर तात्पुरता मनाई हुकूम येऊन जातो. कोर्टाने वादीचा तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज मंजूर केला तर जो पर्यन्त दाव्याचा अंतिम निकाल लागत नाही तो पर्यन्त प्रतिवादी याला ती मिळकत विक्री करता येत नाही. हस्तांतरण करता येत नाही किवा त्यात काही बदल वागेरे करता येत नाही.


तात्पुरता मनाई हुकूम मिळवण्या साठी वादी याला  कोर्टाला हे दाखवून  द्यावे लागते की जर तात्पुरता मनाई हुकूम मिळाला नाही तर वादी चे कधीही न भरून येणारे नुकसान होऊ शकते. वादीला  न्याया पासून वंचित राहावे लागू शकते. तसेच वादीकडे प्रथमदर्शनी केस व पुरावे वादी च्या बाजूने आहे. असे कोर्टाला दिसून आले तर कोर्ट लगेच वादी याचा तात्पुरता मनाई हुकूम अर्ज मंजूर करून टाकते. कोर्ट वादीच्या तुरतातूर्त मनाई हुमूकच्या  अर्जावर प्रतिवादीचा खुलासा मागू शकते मग अर्ज मंजूर किवा नामंजूर होऊ शकतो. 


तसेच तुरतातूर्त मनाई चा आदेश पारित करत असताना कोर्ट हे बघते की Balance Of Convenience आणि Prima Facie Case  कोणाकडून आहे.  हा अर्ज मंजूर करतांना कोर्ट जास्त खोलवर पुरावे नाही बघत. त्यासाठी हे वरील मुद्दे बघून कोर्ट हा अर्ज मंजूर किवा नामंजूर करू शकते. 


जर बेकायदेशी बांधकाम या विषयी दावा असेल तर वादी हा प्रतिवादी याने दाव्याचा अंतिम निकाल लागे पावेतो कोणत्याही प्रकारचे बांधकाम वाद मिळकटीत करू नये असा तुरतातूर्त मनाई हुमकुम घेऊ शकतो. व दाव्याचा अंतिम निकाल वादी कडून लागला तर  कायमचा मनाई हुकूम कोर्टा कडून मिळू शकतो. 


दाव्या सोबत निशाणी क्रमांक 5 ला तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज दाखल करावा लागतो. व सोबत शपथपत्र दाखल करावे लागते. 


तुरतातूर्त मनाई चा आदेश हा ठराविक कालावधी साठी दिलेला असतो. हा कालावधी दाव्याचा अंतिम निकम लागे पावेतो असू शकतो. प्रतिवादी चे म्हणणे येई पावेतो असू शकतो. किवा प्रतिवादी कोर्टात हजर होई पावेतो असू शकतो. हा कालावधी कोर्टा द्वारे ठरवला जातो. 


कोर्टाने एखाद्या व्यक्तीस आदेश केला आणि त्या व्यक्तीने तो आदेश मानला नाही किवा त्याची अमलबजावणी केली नाही तर त्या व्यक्तीने कोर्टाचा अवमान केला (Contempt Of Court) असे म्हणतात. त्यासाठी त्या व्यक्ति विरूद्ध कायदेशीर करवयई देखील करता येते. 



2) कायमचा मनाई हुकूम  आदेश :-


कायम चा मनाई हुकूम हा दाव्याचा शेवटी दिला जातो. जेव्हा केस चा निकाल वादी च्या बाजूने लागला तर कोर्ट वादी चा कायचा मनाई हुकूमचा अर्ज मंजूर करते.


जेव्हा वादी ने दाखल केलेल्या दाव्यात शेवटी हे सिद्ध झाले की वादी ने दाखल केलेल्या दाव्यात प्रतिवादी याला काहीच हक्क व अधिकार नाहीत. दाव्याचा निकाल वादी च्या बाजूने लागला तर अशा वेळेस कोर्ट प्रतिवादी विरुद्ध कायचा मनाई हुकूमचा आदेश पारित करते. त्याला कायमचा मनाई हुकूम असे म्हणते. कायमचा मनाई हुकूम हा दाव्याचे शेवटी दिला जातो. त्याला (Perpetual Injunction) कायमचा मनाई हुकूम असे म्हणतात. 


Status-quo : - (जैसे थे) आदेश -


आता आपण पाहू यात की Status-quo  आदेश म्हणजे काय ? 


स्टेटस को म्हणजे ज्यावेळी कोर्ट वादी व प्रतिवादी यांना दोघांना दावा मिळकती ची जैसे थे परिस्थिती ठेवण्या बाबत आदेश करतात त्यास स्टेटस को असे म्हणतात. 


स्टेटस को म्हणजे जैसे थे परिस्थिती आहे तशीच ठेवणे. 


जर वादी ने कोर्टात तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज दाखल केलेला असेल. त्यानंतर प्रतिवादी कोर्टात हजर होऊन त्या अर्जास खुलासा देण्यास मुदत मागितली असेल तर अश्या वेळेस देखील कोर्ट प्रतिवादी ने पुढील तारखे पावेतो म्हणणे देई पावेतो करतो जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा (स्टेटस को) चे आदेश देऊ शकते. 


हा आदेश वादी व प्रतिवादी किवा दोन्हींच्या विरुद्ध असू शकतो.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads