आपण आपल्या परिचित व्यक्तिला आर्थिक पैश्यांची गरज असल्यास आपण त्याला चांगल्या मनाने हात उसनवार रक्कम देऊन मदत करत असतो. परंतु जेव्हा समोरील व्यक्ती सांगितलेल्या मुदतीत उसनवार घेतलेली रक्कम परत देत नाही किवा रक्कम परत देण्यास नकार देत असतो अशा वेळेस आपली फसवणूक देखील होऊ शकते. त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की उसनवार दिलेली रक्कम कायदेशीर मार्गाने कशी वसूल करावी. पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे ? हे प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे मी आज माहिती देणार आहे की, उसनवार रक्कम देतांना काय करावे व काय काळजी घ्यावी ? तसेच उसनवार रक्कम परत मिळत नसेल तर काय करावे ? ही माहिती तुम्हाला असल्यास तुमची फसवणूक देखील टळू शकते व तुम्ही तुमची उसनवार दिलेली रक्कम परत न मिळाल्यास कायदेशीर मार्गाने वसूल करून घेऊ शकतात.
ही माहिती तुम्हाला नसल्यास उसनवार दिलेली रक्कम वसूल करण्यास अडचण निर्माण होऊ शकते व कायद्याची मदत देखील घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते किवा उशीर लागू शकतो. त्यामुळे ही माहिती तुम्हाला माहीत असेल तर ती तुमच्या कामात येईल.
आपण जेव्हा कोणाला उसनवार रक्कम देतो तेव्हा उसनवार पावती करून घेणे महत्वाचे आहे. जर आपण उसनवार देत असलेली रक्कम एकदम किरकोळ असेल तर उसनवार पावती केली नाही तरी चालते कारण आपली किरकोळ रक्कम वसूल झाली नाही किवा परत मिळाली नाही तर आपले जास्त काही नुकसान होत नाही, व आपल्याला त्याचे जास्त काही वाईट पण वाटत नाही. परंतु आपण जेव्हा जास्त मोठी रक्कम कोणास मदत म्हणून उसनवार देत असतो तेव्हा उसनवार पावती करून घेणे महत्वाचे असते, कारण त्यामुळे आपल्या व्यवहाराला कायदेशीर महत्व प्राप्त होते. आणि रक्कम परत मिळण्यास काही अडचण निर्माण झाल्यास आपण ती रक्कम कोर्टा कडून देखील कायदेशीर मार्गाने वसूल करून घेऊ शकतो. कारण लेखी उसनवार पावती केल्याने तो आपल्याजवळ पुरावा असतो.
कोणताही पैशांचा व्यवहार करतांना तो लेखी करावा व उसनवार रक्कम देतांना आपण कायदेशीर मार्गाने योग्य तो दस्त करून घ्यावा. कारण काही रक्कम वसूल करण्यास काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याजवळ तो लेखी पुरावा असतो.
आपली रक्कम भविष्यात वसूल झाली नाही तर आपल्याला खूप मनस्ताप होतो व आपणास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे उसनवार रक्कम देतो त्यावेळी योग्य तो कायदेशीर दस्त करून घ्यावा. कारण आपण आपले पैसे हे कष्ट करून कामावलेले असतात. त्यामुळे पैशांची देवाण घेवाण लेखी स्वरुपात करावी. कारण व्यवहार जर लक्षात नसेल तरी लेखी असल्याचा फयदा होत असतो व कोर्टातून कायदेशीर मार्गाने ती रक्कम वसूल करून घेता येते.
आपण उसनवार देत असलेली रक्कम ही जास्त असेल तर नेहमी ती रक्कम चेक द्वारे, बँक द्वारे किंवा ऑनलाइन मोबाइल द्वारे द्यावेत कारण तो आपल्या जवळ पैसे देल्याबाबत पुरावा देखील असतो. तसेच जास्त मोठी रक्कम रोख देणे किवा कोणताही पैश्यांचा मोठा व्यवहार रोख करणे हे बेकायदेशीर असते. बेंकेने किवा मोबाइल द्वारे पैसे दिलेले असेल तर ते कोर्टात सिद्ध करणे देखील सोपे जाते.
आपण ज्या व्यक्तीस उसनवार रक्कम देत असतो त्याच्याकडून उसनवार रक्कम देते वेळी एका कागदावर उसनवार पावती लिहून घ्यावी. त्याच्याच हस्ताक्षरात लिहिली तर चांगलेच. त्यात उसनवार रक्कम किती, केव्हा व कशी दिली. ती रक्कम परत कधी करणार आहे हे दोन किवा अधिक साक्षीदार यांचे समक्ष लिहून घ्यावे व साह्य घेऊन घ्याव्यात.
(उसनवार पावती करावीच ती गरजेची आहे. परंतु उसनवार पावती केलेली नसेल तर कमीत कमी उसनवार रक्कम परत घेणे कमी त्या समोरील व्यक्तीकडून त्याचा चेक तरी घेऊन घ्यावा. कारण तो तरी आपल्याकडे पुरावा राहील. व त्यावरून तरी केस दाखल करता येऊ शकते. नाही तर रक्कम वसूल करनेस जास्तच अडचण निर्माण होऊन शकते. )
उसनवार पावती आपण 100/- रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर लिहून घेऊन त्यास नोटरी करून घ्यावी. कारण नोटरी दस्त कोर्टात सिद्ध करणे सोपे असते व तो दस्त नोटरी नसेल तर तो कोर्टात सिद्ध करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. परंतु जर दस्त नोटरी नोंदणीकृत असेल तर समोरील व्यक्ती देखील तो दस्त नाकारू शकत नाही व आपल्याला देखील त्याचा फायदा होतो व तो एक पक्का पुरावा असतो. नोटरी केल्या मुळे त्या दस्ताला अधिक कायदेशीर महत्व प्रप्त होते. स्टॅम्प हा आपण कोणाच्या ही घेणार किवा देणार यांच्या नावाने घेऊ शकतो परंतु पैसे घेणार याचे नावाने घेतला तर चांगलेच.
उसनवार पावतीचा दस्त तयार करत असताना जो उसनवार रक्कम घेत असतो तो आपल्याला लिहून देत असतो त्यामुळे तो लिहून देणार असतो व पैसे देणार हा लिहून घेणार असतो.
सदर दस्ता मध्ये नमून करावे की, उसनवार रक्कम का लागत आहे ? त्यानंतर नमूद करावे की, किती रक्कम उसनवार देत आहोत. रक्कम कधी दिली. रक्कम कशी दिली. चेक ने, बँकेने, मोबाइल ने ऑनलाइन का रोख हे नमूद करावे. त्यानंतर नमूद करावे की, सदर व्यवहार हा सावकारी नाही कारण आपण चांगल्या मनाने एखाद्याला मदत व्हावी म्हणून उसनवार रक्कम देत असतो परंतु जर त्याने रक्कम परत दिली नाही तर आपल्यालाच व्यक्ती खोटे बोलून त्रास देत असतो असे देखील होऊ शकते.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याला उसनवार रक्कम देत आहोत त्याच्याकडून त्याच्या नावाचा व खात्याचा चेक सदर रक्कम परत करणे कमी घेऊन घ्यावा. त्यावर नाव, तारीख व रक्कम त्याच्याकडून भरून घेतले तर चांगलेच. सदर चेक बद्दल तुम्ही उसनवार पावती मध्ये देखील नमूद करून घेऊ शकतात, उसनवार पावती मध्ये नमूद करावे की सदर चेक हा उसनवार रक्कम परत करणे कमी दिलेला आहे. या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की कुठेही असे नमूद करू नये की सदर चेक हा Security म्हणून दिलेला आहे. कारण जर असे नमूद केले तर Negotiable Instrument Act, कलम 138 नुसार केस दाखल करतो त्यावेळी अडचण येते. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे. अशी अडचण आल्यास आपण दिवाणी दावा रक्कम वसूल होऊन मिळणे कमी दाखल करू शकतो परंतु त्यास थोडा जास्त वेळ देखील लागू शकतो.
आपली उसनवार रक्कम ही समोरच्या व्यक्ती ने वेळेत व ठरलेल्या मुदतीत परत नाही केली तर त्यास संपर्क करावा. त्यास त्या बाबत तोंडी, लेखी, फोन द्वारे रक्कम परत करणे बाबत व त्यासाठी चेक बँकेत सदर करणे बाबत कळवावे.
जर चेक बँकेत सदर करून देखील आपल्याला आपली रक्कम परत नाही भेटली व चेक बाऊन्स झाला (धनादेश अनादारीत झाला) तर कोर्टात केस दाखल कार्यापूर्वी आपल्याला समोरील व्यक्तिला कायदेशीर लेखी नोटीस पाठवावी लागते. नोटीस पाठवल्यावर 15 दिवस वाट बघवी की तो व्यक्ती आपले पैसे परत देतो का ? मग पैसे परत नाही केले तर आपण आपल्या वकिलां मार्फत एन.आय. Act चे कलम 138 अन्वये चेक बाऊन्स ची केस दाखल करू शकतो. चेक बाऊन्स ची केस दाखल करणे कमी मुदत व तारखा या महत्वाच्या असतात त्यात काही चूक झाली तर आपली केस देखील रद्द होऊ शकते त्यामुळे अश्या वेळेस आपल्या वकिलांशी संपर्कात राहणे व मुदतील चेक सदर करून मुदतीत नोटीस पाठवणे महत्वाची आहे. यात काही अडचण निर्माण झाली तर आपल्याला दिवाणी दावा रक्कम वसूल होणेसाठी दाखल करावी लागेल.
(चेक बाऊन्स ची केस दाखल करनेची माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेली आहे.)
![]() |
Click Here to See Post |
(न्यायल्यात कोणतीही केस दाखल करणे कमी मुदतीचा कायदा देखील असतो. जर मुदतीची बाधा आली तर त्याची आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. जर योग्य कारण असेल तर त्यात काही सूट देखील देण्यात आलेली आहे. म्हणून ही गोष्ट देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे की आपले कोनतेही कायदेशीर कामे जसे , धनादेश बँकेत मुदतीत सदर करणे, नोटीस पाठवणे, केस करणे वगैरे ही सर्व कामे जास्त वेळ न करता वेळेत व मुदतीत पूर्ण करावे. त्यामुळे त्याचा आपल्याला फयदाच होत असतो.)
कधी कधी असे देखील होते की आपण समोरील व्यक्ती कडून उसनवार पावती तर करून घेतो परंतु रक्कम परत घेणे कमी त्याच्याकडून त्याचा चेक घेत नाही. किवा तो चेक आपल्याला सापडत नाही किवा चेक बँकेत सदर करण्याची मुदत संपून जाते. आशा वेळे आपण त्या व्यक्ती विरूद्ध आपली उसनवार रक्कम वासूल होऊन मिळणे कमी दिवाणी रक्कम वसूली चा दावा दाखल करू शकतो.
उसनवार दिलेल्या रकमे पैकी काही रक्कम मिळाल्यास आपण भरणा पावती करून घ्यावी किवा त्या उसनवार पावतीवर लिहून सही घेऊन घ्यावी. व समोरील व्यक्तीने देखील त्याबाबत पावती घेऊन घ्यावी॰ तसेच आपला उसनवार व्यवहार पूर्ण झाल्यावर केलेली उसनवार पावती रद्द करून घ्यावी.
![]() |
Click Here To See Post |