आपण माहिती बघू प्रतिवादीस कोर्टा मार्फत समन्स ची बाजवणी.
(दाव्याची संपूर्ण प्रक्रिया ही दिवाणी प्रक्रिया संहिता (Civil Procedure Code) या प्रमाणे चालत असते. समन्स ची सर्व माहिती व तरदूदी या दिवाणी प्रक्रिया संहिता यामध्ये दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे दाव्याचे कामकाज होत असते.)
वादी ने दावा दाखल केला म्हणजे प्रतिवादीस त्या दाव्याचे समन्स पाठवले जाते. जर प्रतिवादीस समन्स ची लवकर बजावणी झाली तर दाव्याचे कामकाज लवकर चालू होनेस मदत होत असते. काही दाव्यात एक किवा अधिक प्रतिवादी असू शकतात अशा वेळेस सर्व प्रतिवादी यांना दाव्याचे समन्स पाठवले जाते. कोणताही दावा असला तरी त्याचे पुढील कामकाज हे प्रतिवादीला समन्स मिळाला व तो कोर्टात हजर झाला म्हणजे होत असते.
वादी जेव्हा कोर्टात दावा दाखल करत असतो तेव्हा त्याला वाटत असते की, सदर दाव्याचा लवकर न्यायनिर्णय लागावा. त्यामुळे दाव्याचे कामकाज लवकर व वेळेत चालणे महत्वाचे असते. त्यामुळे वेळेत प्रतिवादी यांना जास्त उशीर न होता समन्स मिळणे गरजेचे असते. त्यामुळे दाव्याचे कामकाज लवकर चालण्यास मदत होत असते. काही दाव्यात प्रतिवादी यांची संख्या जास्त असते व प्रतिवादी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात त्यामुळे त्यांना समन्स मिळनेस काही वेळ देखील लागू शकतो.
कोर्टा मार्फत बेलीफ यांचे द्वारे प्रतीवादी राहत असलेल्या पत्त्यावर प्रतिवादीस समन्स पाठवले जाते.
प्रतिवादी राहत असलेला पत्ता हा वादी दाखल करीत असलेल्या दाव्यात वादी नमूद करत असतो त्याप्रमाणे प्रतिवादी च्या नमूद पत्त्यावर बेलीफ यांचे मार्फत समन्स पाठवला जातो. त्यामुळे दावा दाखल करत असताना दाव्या मध्ये प्रतिवादी यांचे निट व संपूर्ण पत्ते काळजीपूर्वक नमूद करणे महत्वाचे व गरजेचे आहे.
प्रतिवादीला समन्स दिला म्हणजे बेलीफ सही घेतात व समन्स ची बजावणी होते. त्यात दिलेले असते की केस कोणी दाखल केलेली आहे. कोर्टात कधी हजर होणे याबाबत माहिती नमूद असते.
फौजदारी केस मधील समन्सची बजावणी ही पोलिसांमर्फत केली जाते.
बर्याच वेळा असे होते की, प्रतिवादी हा जाणून बुजून समन्स ची बजावणी न होणे कमी काही तरी युक्ति करून किवा दिलेल्या पत्त्यावर हजर न राहून समन्स ची बजावणी स्वत:ला होऊ देत नाही.
अशा वेळेस जर प्रतिवादीस समन्स ची बजावणी झाली नाही तर दावा लवकर पुढे चालू शकत नाही. त्यामुळे दावा पुढे चालवनेस अडचण होते. त्यावेळी समन्स ची बजावणी अन्य मार्गाने करावी लागते. जे अन्य मार्ग कायद्या मध्ये नमूद आहेत त्याप्रमाणे समन्स ची बजावणी होत असते.
जर प्रतिवादीला समन्स ची बजावणी झाली नाही. तर आशा वेळेस कोर्टात अर्ज दाखल करावा लागतो की, प्रतिवादी यांना पोस्टा द्वारे समन्स पाठवण्यात यावा. त्यामुळे पोस्टाने अचूक मार्गाने समन्स ची बजावणी होऊ शकते.
परंतु तरी जर प्रतिवादी जाणून बुजून काही युक्ति वापरुन समन्स ची बजावणी होऊ देत नसेल यामुळे समन्स ची बजावणी होत नाही. तसेच अपूर्ण पत्ता, प्रतिवादी घरी नसेल, घराला कुलूप असेल, दिलेल्या पत्त्यावर प्रतिवादी राहत नाहीत, परगावी गेलेत असे अनेक करणे राहू शकतात. व तसा रिपोर्ट कोर्टा समोर येतो.
प्रतिवादी चा शेवटचा तो राहत असलेला पत्ता माहीत असतो व त्यावर समन्स पाठवले जाते त्यामुळे समन्स ची बजावणी होत नाही. व आता प्रतिवादी कुठे राहतो ते माहीत नसते. त्यामुळे देखील समन्स ची बजावणी होत नाही. अशा वेळेस दिवाणी न्यायालयास, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 चे ऑर्डर 5 व रूल 20 अन्वये अधिकार आहेत की, कोर्ट अशा समन्स च्या बजावणी साठी त्या समन्स ची प्रत कोर्टाच्या नोटीस बोर्डावर लावतात. आणि एक प्रत प्रतिवादी च्या दरवाज्यावर चिटकवतात. याला मराठी कायद्याचा भाषेत डाकावून बजावणी असे म्हणतात.
एखादी कोर्टाच्या आदेशा मध्ये असे देखील नमूद असते की, त्या समन्स ची एक प्रत ग्रामपंच्यायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात यावी. यानंतर एखादी पर्याय वाटत असेल तो देखील कोर्ट करू शकते जसे स्थानिक वृत्तपत्रात जाहीर समन्स दिला जाऊ शकतो.
परंतु यासाठी वादीने कोर्टस हे दाखवून व पटवून देने महत्वाचे आहे की, प्रतिवादी कसा समन्स घेणेस टाळाटाळ करीत आहे त्यामुळे समन्स ची बजावणी केली पण ती झाली नाही व शक्य नाही. त्यासाठी वृत्तपत्रात जाहीर समन्स करण्यात यावे अशी विनंती करणे गरजेचे आहे.
वृत्तपत्रामधून सामनास प्रसिद्ध करते वेळी या गोष्टी महत्वाच्या आहेत की, वर्तमानपत्र हे दैनिक असावे. म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे असावे. तसेच ज्या ठिकाणी समन्स काढणे आहे म्हणजे प्रतिवादी राहत असेल किवा शेवटी राहिलेला असेल त्या ठिकाणचे ते स्थानिक वृत्तपत्र असावे व तेथे त्याचे वाटप होणे महत्वाचे आहे. प्रतिवादी शेवटी राहत असेल किवा काम करत असेल तेथील स्थानिक वृत्तपत्र जाहिरात देणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टींची पूर्तता की कोर्ट देखील मानते की, प्रतिवादीस समन्स ची बजावणी योग्य रित्या झालेली आहे.
जर जाहीर नोटीस प्रसिद्ध करून देखील प्रतिवादी दाखल दाव्याच्या कमी हजर झाला नाही तर प्रतिवादी विरूढ दाव्याचे कामकाज एकतर्फे चालणे कमी कोर्टा कडून आदेश केला जातो व दाव्याचे कामकाज पुढे चालत असते.
दाव्याचे कामकाज एकतर्फे कसे चालते व त्याबाबत कोर्टात या बाबत काय आदेश पारित केला जातो याची माहिती पुढील ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेली आहे.
दिवाणी दाव्यातील Ex Party Order व No Say Order म्हणजे काय ?
दिवाणी दावा कामकाज असे चालत असते
![]() |
Click here to see post |