बक्षीसपत्र (Gift Deed)

Adv.Saurabh Rajput
0

 
बक्षीसपत्र
( Gift Deed )

आज आपण माहिती बघू बक्षीसपत्र म्हणजे काय व ते कसे केले जाते. 


बक्षीसपत्र हे मालमत्ता हस्तांतरण  अधिनियम  1882  या  कायद्या नुसार होत असते. बक्षीसपत्र हा एक कायदेशीर दस्त असून एखादी स्वत:च्या मालकी हक्काची स्थावर किवा जंगम मिळकत हस्तांतर करण्याचा हा एक कायदेशीर मार्ग आहे. 


   नोंदणीकृत बक्षीसपत्र करावयाचे असल्यास त्याची नोंदणी ही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करावी लागते. त्यासाठी शासनाने निर्धारित केलेली नोंदणी फी व मुद्रांक शुल्क भरावे लागते.   बक्षीसपत्राने मालमत्ता  एका मालकाकडून दुसर्‍या मालकाकडे कायदेशीर हस्तांतरण होत असते. 


बक्षीसपत्र तयार केल्यानंतर ते लगेच अमलात येत असते. तथापि, मृत्यूपत्रात असे  होत नाही. याविरुद्ध  मृत्यूपत्र हे ज्याने मृत्यूपत्र केलेले आहे त्याच्या मृत्यू नंतर  ते  अमलात येत असते.  बक्षीसपत्र करून देणार्‍या  व्यक्तीस दाता असे म्हणतात आणि प्राप्तकर्त्याला डोणी असे म्हणतात. 


बक्षीसपत्रने स्वत:च्या मालकी हक्काची स्थावर किंवा जंगम (Movable किवा Immovable) मिळकत / मालमत्ता हस्तांतर करता येत असते. 


  बक्षीसपत्र करतांना महत्वाचे आहे की, जी मिळकत बक्षीसपत्र दिली जात आहे ती कोणत्याही मोबदल्या शिवाय दिली जाने महत्वाचे आहे. बक्षीसपत्रासाठी मोबदला नसतो. बक्षीसपत्रा मध्ये बक्षीस दिल्यानंतर बक्षीस घेणार याने ती मिळकत स्वीकारणे देखील महत्वाचे आहे. 


बक्षीसपत्र हे प्रभावी होण्यासाठी त्याची नोंदणी ही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे महत्वाचे आहे. 


बक्षीसपत्र कायदेशीर होण्यासाठी पुढील काही गोष्टी महत्वाच्या आहेत. 


I.  बक्षीसपत्र तयार करतांना बक्षीसपत्रामध्ये नमूद केलेली मालमत्ता ही अस्तीत्वात  असणे गरजेचे आहे. 


II.  जो व्यक्ती बक्षीसपत्र करून देत आहे तो त्या मिळकतीचा कायदेशीर  मालक असणे गरजेचे आहे. त्यानुसार त्याला ती मिळकत हस्तांतर करण्याचा  कायदेशीर अधिकार असावा. 


III. भेटवस्तू ही बिनामोबदला असणे गरजेचे आहे. 


 IV. भेटवस्तू ही स्वइच्छेने व कोणत्याही जबाबदारी शिवाय देणे गरजेचे असते. 


V. देणगीदाराने दिलेली मालमत्ता ही घेणार या व्यक्तीने  स्वीकारली पाहिजेल. 


बक्षीसपत्राचा दस्त : - 


बक्षीसपत्राचा दस्त तयार करण्यासाठी त्यात खालील  काही गोष्टी नमूद करणे महत्वाचे आहे. 


मोफत व इच्छेनुसार हस्तांतरण :- 


बक्षीसपत्रामध्ये नमूद केले पाहिजेल की, बक्षीस दिलेली  मिळकत ही स्वइच्छेने दिलेली आहे. बक्षीसपत्र स्वसंमतीने केलेले असून कोणाच्या दाबावाखाली केलेले नाही. 


देणार आणि घेणार यांचा तपशील  :- 


बक्षीसपत्रामध्ये बक्षीस घेणार व देणार यांचा संपूर्ण तपशील नमूद करावा. जसे त्यांचे नाव, वय, ते काय काम करतात, त्यांचा संपूर्ण पत्ता, ओळखीचा पुरावा हे नमूद करणे गरजेचे आहे. 


बक्षीस देणार व घेणार यांचे काय नाते आहे ते नमूद करावे. त्यानंतर बक्षीसपत्रा मध्ये हे देखील नमूद करणे गरजेचे आहे की, बक्षीस हे स्वत:च्या मर्जिणे देत असून कोणताही मोबदला न  घेता बक्षीस दिलेले आहे.  


ज्याला मिळकत बक्षीस दिलेली आहे त्याने भविषात त्या मिळकतीचा त्याच्या मार्जिणे उपभोग घ्यावा. त्याचा इच्छे नुसार तो मिळकत हस्तांतर करून शकतो व उपभोग करू शकतो. हे देखील नमूद करावे. 

मालमत्तेचा तपशील  :- 


बक्षीसपत्र देणार हा जे बक्षीस देत आहे त्या मिळकतीचे संपूर्ण वर्णन नमूद करणे गरजेचे आहे. तसेच बक्षीस देणार याला ती मिळकत कशी मिळालेली आहे. त्या मिळकतीचा पूर्व इतिहास देखील नमूद करावा. 


देणगीदारा कडून स्वीकृती   :- 


बक्षीसपत्र देणार याच्याकडून ज्याला मिळकत बक्षीस दिलेली आहे त्याने तिचा स्वीकार केलेला आहे हे देखील नमूद करणे गरजेचे आहे. 


साक्षीदार   :- 


बक्षीसपत्रा मध्ये दोन किवा त्यापेक्षा अधिक सज्ञान साक्षीदार नमूद करणे गरजेचे आहे. त्यांचे संपूर्ण नाव व पत्ते नमूद करावे. तसेच सोबत त्यांचा ओळखीचा पुरावा जोडावा. तसेच त्यांची  स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. 


त्यानंतर बक्षीसपत्राच्या दस्ता मध्ये जेथे बक्षीसपत्र केलेले आहे ते ठिकाण व तारीख नमूद करावी. 


दोन्ही पक्षकारांची माहिती जसे नाव, पत्ता, वय, मोबाइल नंबर व  आधार नंबर नमूद करावा. 


बक्षीसपत्राचा दस्त पूर्ण झाला. त्यावर सर्वांच्या स्वाक्षर्‍या झाल्यानंतर व   नोंदणी फी, मुद्रांक फी भरली की संपूर्ण आवश्यक दस्त सोबत जोडावे व बक्षीसपत्राचा दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणी करून घ्यावा. 


बक्षीसपत्र नोंदणी  करण्यासाठी आवशक कागदपत्रे   :-


बक्षीसपत्राचा मूळ दस्त. 


बक्षीस देणार आणि बक्षीस घेणार यांचा ओळखीचा पुरावा झेरॉक्स प्रत. जसे आधार कार्ड.  


मिळकत बक्षीस देणार याचे मालकी हक्का बाबतचे  कागदपत्रे जसे मिळकती उतारा वगैरे. 


 पासपोर्ट आकाराचे फोटो. 

 

साक्षीदार यांचा ओळख व  पत्ता  पुरावा झेरॉक्स प्रत.


इत्यादी कागदपत्रे बक्षीसपत्रासाठी महत्वाचे आहेत. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


हक्कसोडपत्र.


माहिती मृत्यूपत्रा विषयी.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads