गाहाणखत (Mortgage Deed).

Adv.Saurabh Rajput
0

 




मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत गहाणखत म्हणजे काय व त्याचे कोणकोणते व किती प्रकार आहेत. 


आपण जेव्हा नोंदनिकृत गहाणखत करत असतो तेव्हा आपल्या खलील कायद्यान विषयी माहिती असणे गरचेजे आहे. 


1. संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882.

2. नोंदणी अधिनियम 1908.

3.  मुद्रांक अधिनियम 1958. 


वरील कायद्या नुसार गहाणखत तयार केले जात असते व ते नोंदणीकृत केले जात असते. 


गहाण खत म्हणजे काय ? 


 गहाण खत  (Mortgage Deed) ची तरदूद ही मालमत्ता हस्तांतरण अधींनियमच्या कलम 58 मध्ये दिलेले आहे. 


Section 58 in The Transfer Of Property Act, 1882

58. “Mortgage”, “mortgagor”, “mortgagee”, “mortgage-money” and “mortgage-deed” defined.—


   जेव्हा एखादी व्यक्तिला पैशांची आवशकता भासत असते तेव्हा तो व्यक्ती बँकेकडून कर्ज घेत असतो. अशा वेळी बँके द्वारे त्या व्यक्तिला त्याची स्थावर मालमत्ता गहाण ठेऊन कर्जाची रक्कम व्याज आकारून  दिली जात असते. (जे कर्ज सिक्युर असते त्यासाठी बँक मिळकत गहाण ठेवत असते. उदा. जसे गृह कर्ज घेण्यासाठी.)  त्यासाठी  गहाणखताचा दस्त तयार केला जात असतो. 


मिळकत जसे जमीन, घर,  शेत जमीन, स्थावर मालमत्ता इ.  गहाण ठेऊन नोंदणीकृत गहाणखत करून त्यावर रक्कम (कर्ज) घेतले  जात असते  व ती रक्कम मुदतीत परत करावी लागते.  त्यालाच गहाणखत असे म्हटले जात असते. 


जेव्हा  गहाणखताची दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात नोंदणी केली जात असते  त्यालाच नोंदणीकृत गहाणखत असे म्हटले जाते. 


गहाणखत हे शक्यतो जेव्हा बँकेकडून गृह कर्ज घेतले जात असते तेव्हा बँक मिळकत गहाण करत असते.  बँक जेव्हा सिक्युर कर्ज देत असते तेव्हा मिळकत गहाण ठेवली जात असते व कर्ज दिले जात असते. 


Equity Mortgage आणि Register Mortgage यातील फरक.

Click above to see post


बँक जेव्हा मिळकत गहाण ठेवत असते तेव्हा बँकेस कायदेशीर अधिकार प्राप्त होत असतो की, कर्ज घेणार ग्राहकणे (Borrower) ने जर घेतलेल्या कर्जाची परत फेड केली नाही तर बँक गहाण ठेवलेल्या मिळकतीची कायदेशीर मार्गाने विक्री करू शकते व त्यातून दिलेल्या कर्जाची वसूली करू शकते. 


Section 67 in The Transfer Of Property Act, 1882

67. Right to fore-closure or sale.—

In the absence of a contract to the contrary, the mortgagee has, at any time after the mortgage-money has become due to him, and before a decree has been made for the redemption of the mortgaged property, or the mortgage-money has been paid or deposited as hereinafter provided, a right to obtain from the Court a decree that the mortgagor shall be absolutely debarred of his right to redeem the property, or a decree that the property be sold. A suit to obtain a decree that a mortgagor shall be absolutely debarred of his right to redeem the mortgaged property is called a suit for foreclosure.Nothing in this section shall be deemed—
(a)to authorise any mortgagee other than a mortgagee by conditional sale or a mortgagee under an anomalous mortgage by the terms of which he is entitled to foreclose, to institute a suit for foreclosure, or an usufructuary mortgagee as such or a mortgagee by conditional sale as such to institute a suit for sale; or
(b)to authorise a mortgagor who holds the mortgagee’s rights as his trustee or legal representative, and who may sue for a sale of the property, to institute a suit for foreclosure; or
(c)to authorise the mortgagee of a railway, canal, or other work in the maintenance of which the public are interested, to institute a suit for foreclosure or sale; or
(d)to authorise a person interested in part only of the mortgage-money to institute a suit relating only to a corresponding part of the mortgaged property, unless the mortgagees have, with the consent of the mortgagor, severed their interests under the mortgage.
जे गृह कर्ज (सिक्युर) कर्ज असते त्या कर्जाची वसूली ही SARFESAI कायद्या प्रमाणे होत असते. 

SARFAI ACT माहिती.

SARFESAI ACT कर्ज वसूली

Click above to see post


गहाण खताचे अनेक  प्रकार आहेत. अनेक प्रकार कोणते आहेत ते आता आपण बघू.  

 

1. साधे किंवा नजर गहाण खत. -

2. इंग्लिश गहाण खत. 

3. उपभोग्य गहाण खत. 

4. सशर्त विक्री द्वारे केलेले गहाण खत. 

5. हक्क लेख निक्षेपाद्वारे केलेले गहाण खत. 

6. विषम गहाण खत. 


वरील आपल्या देशात होणारे 6 कॉमन कायदेशीर गहाणखताचे प्रकार आहेत. यांची माहिती पुढील प्रमाणे मराठी व इंग्रजी मध्ये दिलेली आहे. 


1. साधे किंवा नजर गहाण खत. -


साधे व नजर गहाणखत यामध्ये आपल्या मालमत्तेचा कब्जा न देता स्वता:ला बांधून घेणे होय. तसेच एखादी विशिष्ट कारणासाठी साठी  आपण गहाणखत तयार करत आहोत हे नमूद करावे लागते. 


साधे व नजर गहाणखत म्हणजे मालमत्तेचा कब्जा न देता मिळकत गहाण ठेवणे होय. असे गहाणखत केले व ते नोंदणीकृत केले की,  मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवर, उतार्‍यावर कर्जाच्या रक्कमेचा बोजा चढवला जात असतो.  मिळकतीचा कब्जा दिला जात नाही तो पुर्णपणे मालकाकडे राहत असतो.  या मध्ये मिळकतीचा कब्जा दिला जात नसतो. 


1.     Simple Mortgage : -    


In this Mortgage, the possession of the Mortgaged Property is not delivered to the mortgagee. However, the Mortgagor legally binds themselves to repay the mortgage money, in return for which the mortgagee agrees to have them the right to sell off the property to earn their money back in case the fail to repay. 


2. इंग्लिश गहाण खत. -


इंग्लिश गहाणखत यामध्ये गहाण ठेवण्यात आलेली स्थावर मालमत्ता जो कर्ज देत आहे त्याच्या ताब्यात देऊन कर्जाची रक्कम घेतली जाते. म्हणजेच त्या स्थावर मिळकतीचा कब्जा कर्ज देणार्‍यास दिला जात असतो. 

 

 2. English Mortgage. -


    Where the mortgagor binds himself to repay the mortgage - money on a certain date, and transfers the mortgaged property absolutely to the mortgagee, bu subject to a proviso that the will re-transfer it to eh mortgagor upon payment of the mortgage-money as agreed, the transaction is called an English mortgage.  


3.  उपभोग्य गहाण खत. : -


उपभोग्य गहाणखत यामध्ये ताब्यात देण्यात आलेली स्थावर मालमत्ता किवा जमीन त्यामधून मिळणारे भाडे व उत्पन्न तसेच मिळणारा फायदा हे रकमेवरील व्याजासाठी करण्यात यावा असे नमूद केले जात असते. 


3.   Usufructuary Mortgage : -


 In this mortgage, the mortgagee grants the possession of the property to the mortgagee until the repayment of mortgage money and allows them to receive the profits earned from it (in the form of rent, etc.) in return, the mortgagee agrees to appropriate the same instated of interest or in payment of the mortgage - money. 


4. सशर्त विक्री द्वारे केलेले गहाण खत. 


सशर्त गहाणखत यामध्ये आपल्या मालमत्तेची तात्पुरती विक्री करून घेतलेली  रक्कम फेडण्यास कसूर केल्यास करण्यात आलेली विक्री आवादीत राहील अशी शर्त अट नमूद करणे होय. 


 4. Mortgage by Conditional Sale. : -


 A mortgage by conditional sale is when the mortgagor sells the property to the mortgagee on the condition that the sale will become absolute if there is a default of repayment. Also, on the repayment of the money, the sale will become void and mortgagee will transfer the property back to the mortgagor. 


 5.  हक्क लेख निक्षेपाद्वारे केलेले गहाण खत. : -


अशा अन्य कोणत्याही नगरात एखादी स्थावर मालमत्तेवर गहाण ठेवण्याच्या उद्देशाने त्यासंबंधीचे हक्कलेख त्याच्या अभिकार्‍याकडे सुपूर्त करते तेव्हा त्या व्यवहारास हक्कलेख निक्षेपद्वारे केलेले गहाण खत होय.  


   (यालाच Equity Mortgage असे देखील म्हटले जाते असते.)  


5. Mortgage by Deposit of Title Deeds :-


      In this mortgage, the Mortgagee provides their documents of title to the immovable property to the mortgagor, with intent to create security on the same.  


इक्विटेबल मॉर्गेज (Equitable Mortgage) म्हणजे नेमके काय ? 

 

    मालमता हस्तांतरण अधिनियम,1882 चे कलम 58 मध्ये गहाण व्यवहारासंबंधी (Mortgage) तरतुदी आहेत. यातील खंड (एफ) मध्ये डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने कर्जव्यवहार करण्याच्या तरतुदी आहेत. त्यानुसार कर्ज घेणार व्यक्ती संबंधित मिळकतीचे हक्कलेख कर्ज देणा-याकडे निक्षेपित (जमा) करुन (By way of Depositing of Title Deeds) कर्जाची रक्कम प्रतिभूतीत (Secure) करु शकते. ही कार्यवाही केवळ राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे रवून दिलेल्या शहरांमध्ये करता येते. या पध्दतीला इक्विटेबल मार्गेज किंवा Mortgage by way of depositing of title deeds असे संबोधले जाते.


6. विषम गहाण खत. : -


विषम गहाणखत हे इतर नमूद केलेल्या गहाणखता पेक्षा समांतर नसेल व ते वेगळे म्हणजेच विषम असल्यास त्यास विषम गहाणखत असे म्हणतात. 


6. Anomalous Mortgage . : -


A mortgage that doesn't come under any of the above mentioned mortgage types is an Anomalous Mortgage. 


गहाण खताचा भंग : -


गहाण खताचा भंग म्हणजेच रक्कमेची मुदतीत परत फेड झालेली नसेल आशा वेळेस गहाण खता मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार कायदेशीर मार्गाने विक्री करून कर्ज वसूल करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. 


नोंदनिकृत गहाण खात :- 


नोंदनिकृत गहाणखत हा एक कायदेशीर  दस्त असून हा दस्त दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात नोंदनी करता येत असतो. हे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी असते. गहाणखताची नोंदणी अधिकार क्षेत्र म्हणजेच मिळकत जेथे स्थित आहे तेथे नोंदणी करता येत असते. या कार्यालयाला आपण सब रजिस्टरार कार्यालय असे देखील म्हटले जाते.  


गहाणखत म्हणजे काय तर थोडक्यात आपल्या मिळकतीवर कर्जाचा बोजा चढवणे होय. गहाण खताच्या प्रकारा नुसार कर्जाची परत फेड झाली म्हणजे तो बोजा कमी करता येत असतो. 


Redemption of Mortgage : - 

Limitation to file a suit for redemption is 30 years under Article 61(a) of the Limitation Act, 1963 from the date when the right to redeem accrues. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


Equity Mortgage आणि Registered Mortgage काय असते ?


इक्वीटेबल मॉर्गेज संदर्भात नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंग.

Click above to see post

इतर ब्लॉग पोस्ट :-


जमिनीची शासकीय मोजणी


मोजणीची "क" प्रत म्हणजे काय


जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार


मोजणी अर्जाचा नमूना :


इतर ब्लॉग पोस्ट :-


मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.


Click Here To View Post

इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-


महसूल अपील


महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी


मामलतदार कोर्ट अ‍ॅक्ट


वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..


स्थावर मिळकतीची वाटणी


डिजिटल गाव चावडी

Click Above To See Blog Post 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads