गाडी विक्री पावती व दस्त.

Adv.Saurabh Rajput
0

 गाडी विक्री पावती दस्त


    आपण जेव्हा एखादी जुनी गाडी खरेदी किवा विक्री करतो. त्यावेळी  सपूर्ण मोबदल्याची रक्कम मालकास लगेच देणे किवा गाडी लगेच हस्तांतर करून  नावावर करून घेणे शक्य होत नाही. त्यास काही अवधी  लागू शकतो. अशा वेळेस  योग्य त्या गैर न्यायिक स्टॅम्प पेपर वर गाडी विक्री पावतीचा दस्त  तयार करून घ्यावा. व तो नोटरी करून घ्यावा यामुळे होणारा व्यवहार हा लेखी व कायदेशीर होतो व एक पुरावा देखील तयार होत असतो. 


गाडी विक्री पावती करतांना जो गाडी विकत घेत आहे त्याने गाडीचे सर्व कागदपत्रे नीट तपासून घ्यावेत. जसे आर.सी. बुक. आर. सी. बुक वरील व इतर कागदपत्रे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड वरील मालकाचे नाव. तसेच  आर.सी. बुक वर काही कर्ज बोजे नमूद तर नाही ना ? विमा, PUC याबाबत कागदपत्रे बघून घ्यावेत. 


तसेच आजकाल शासनाच्या संबधित विभागाच्या  वेबसाइट किवा  Apps वर  वाहणाचे नोंदणीकृत नंबर या वरुण  मालकाचे नाव तपासता येऊ शकते.  ते आपण  पडताळून  बघू शकतो. (त्याबाबत दुसर्‍या ब्लॉग पोस्ट मध्ये  माहिती दिलेली आहे)

Click Here To See Post

त्यानंतर गाडी विकत घेणार व देणार यांच्यात काय अटी व शर्ती ठरल्या आहेत त्या व्यवस्थित गाडी विक्री पावती दस्तात नमूद करून घ्याव्यात. 


दस्ता मध्ये गाडीचे संपूर्ण वर्णन लिहावे, जसे रजि. नंबर, मॉडेल, गाडीचा कलर, गाडी  डिझेल की पेट्रोल वर चालणारी आहे. गाडीचा  चेसिस नंबर, इंजिन नंबर, गाडी प्रकार जसे माल वाहू वगैरे जे असेल ते नमूद करून घ्यावे.  पुढे गाडीच्या  विम्या  बाबत माहिती नमूद करून घ्यावी. ही सर्व माहिती तुम्हास आर.सी. बुक व गाडीचे इतर कागदपत्रे यावरून समजू शकते. 


  गाडीची एकूण किंमत काय ठरलेली आहे. त्यापैकी  आज किती रक्कम व कशी रक्कम देत आहोत ? उर्वरित रक्कम कधी देणार आहेत ? गाडी नावावर कधी करावी ? त्याचा खर्च कोण करणार आहे ? उर्वरित रक्कम देण्याची व गाडी नावावर हस्तांतर करून घेण्याची काय मुदत ठरलेली आहे ? या बाबत नमूद करावे. 


त्यानंनातर महत्वाचा मुद्दा हा आहे की,  मालक हे गाडी घेणार याला गाडी ताब्यात कधी देत आहेत ? त्या बाबत दस्ता मध्ये  नीट योग्य ती वेळ व तारीख नमूद करावी. जर  सौदापावती करणे पूर्वीच  गाडी ताब्यात दिलेली असेल तर त्या बाबत वेळ व तारीख नमूद करावी. गाडी घेणार याचे ताब्यात गाडी देण्या अगोदर गाडीची कायदेशीर जबाबदारी ही मालकाची होती व गाडी घेणार याला गाडी ताब्यात दिल्यापासून त्याची  जबाबदारी गाडी घेणार याची राहील हे नमूद करून घ्यावे. 


त्यानंतर गाडीचा विमा काढलेला आहे का ? असेल तर कोण कोणता विमा काढलेला आहे ? त्याची मुदत काय आहे ?  का मुदत संपलेली आहे ? जर मुदत संपलेली असेल तर आता नवीन विमा कोणास काढणे आहे. व  गाडी विकत घेल्यानंतर पुढील येणारा विमा हा नवीन मालक भरणार आहेत याबाबत लिहून घ्यावे. 


तसेच गाडी घेणार याने गाडीचा ताबा घेते वेळी हे देखील नीट तपासून घ्यावे की गाडी ताब्यात घेते वेळी विमा चालू आहे ना ? कारण गाडी ताब्यात घेतली म्हणजे गाडी ची जबाबदारी ही गाडी घेणार याच्यावर येत असते. 


गाडी चे सर्व मूळ कागदपत्रे दिले आहेत का ? नाहीतर कधी देणार आहे ? का आज रोजी झेरॉक्स कागदपत्रे दिलेले आहेत ते नमूद करावे.


जर गाडी फायनान्स वर घेतलेली असेल आणि फायनान्स कंपनीचे कर्ज  नील झालेले असेल तर त्याबाबत कागदपत्रे N.O.C. घेऊन घेणे. NOC मालक आणून देणार असेल तर  त्याबाबत आपल्यात ठरल्या प्रमाणे दसतात लिहून घ्यावे. 


त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो आपण बघू. 

कधी कधी असे होत असते की जो गाडी विक्री करत आहे त्याच्या गाडीवर फायनान्स कंपनीचे कर्ज बाकी असते. अशा वेळेस सर्वात प्रथम महत्वाचा मुद्दा येतो की, त्या गाडीची परस्पर विक्री करता येणार नाही. कारण गाडी वर कर्ज बाकी असेल तर गाडी चे मूळ मालक फायनान्स कंपनी असते. 


अशा वेळेस गाडी घ्यायची असेल तर फायनान्स कंपनी बरोबर चर्चा करून घ्यावी. त्यांची परवानगी घेऊन घ्यावी किवा कायदेशीर मार्गाने उर्वरित कर्ज गाडी घेणार याचे नावाने हस्तांतर करून घेण्या बाबत चर्चा करून घ्यावी.  


जर असे कर्ज फेडणे बाकी असलेले गाडी घेण्याचे निश्चित झाले तर, दस्ता मध्ये हे देखील नमूद करावे की, उर्वरित कर्जाचे हफ्ते परत फेड कोण व कसे करणार आहेत ? परत फेड केली नाही तर किवा फायनान्स कंपनीने जर वाहन जप्त केले तर ? होणार्‍या नुकसानीस कोण जबाबदार राहील ? याबाबत निट नमूद करून घ्यावे. 


दस्तात दोन किवा त्यापेक्षा जास्त सज्ञान साक्षीदार नमूद असावेत. शक्यतो व्यवहार करतांना मद्यस्थी असतील तर माहीतगार व दोघी पक्षाच्या ओळखीच्या व्यक्तीस मध्यस्थी करून घावे. ते देखील सदर व्यवहारस साक्षीदार होऊ शकतात. तसेच  दस्ता मध्ये असे देखील नमूद करू शकतात की, काही वाद निर्माण झाल्यास दोन माहीतगार किवा मध्यस्थी मार्फत वाद मिटवावा. कारण भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास लवकर व कमी वेळेत वाद मिटू शकतो. 


कधी कधी गाडी चे मूळ मालक हजर  नसताना व फक्त मूळ मालकाकडून सौदा किवा  स्टॅम्प  केलाला असताना त्यावर पुढे अनेक लोकं अजून बेकायदेशीर व्यवहार करून बेकायदेशीर पद्धतीने गाडी सौदा किवा  विक्री करतात. असे बेकायदेशीर व्यवहार देखील होत असतात.  त्यामुळे फसवणूक होऊ शकते. अशा वेळेस गाडी विक्री तर मूळ मालक हाच करून देऊ शकतो. त्यामुळे व्यवहार करतांना मूळ मालक कोण आहे ? हे नीट तपासून घेणे व मूळ मालक यांचेकडूनच व त्यांचे मार्फतच योग्य तो  कायदेशीर व्यवहार पूर्ण करावा. किंवा संमती  म्हणून दस्तावर मूळ मालकाची सही घेऊन घ्यावी. त्यामुळे व्यवहारा बाबत मूळ मालकास देखील माहिती राहील व त्याची संमती राहील.  नाहीतर आपला व्यवहार हा बेकायदेशीर होऊन अनेक गुंतागुंत वाढू शकते. 


ठरलेल्या मुदतीत व मालकास पूर्ण पैसे दिले म्हणजे RTO कार्यालयाकडून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून गाडी नावावर करून हस्तांतरण करून घ्यावी. 


आपण गाडी विक्री किवा जुनी गाडी खरेदी करणे चा व्यवहार हा कायदेशीर तसेच लेखी व नोटरी समक्ष केल्याने आपला व्यवहार हा कायदेशीर होतो. त्यामुळे दोन्ही पक्षास व व्यवहारास कायदेशीर सुरक्षितता प्राप्त होत असते. जर एखादी पक्षाने त्याचा भाग पूर्ण केला नाही किवा कोणाची काही फसवणूक झाली तर योग्य तो कायदेशीर दस्त आसल्याने आपण कोर्टात जाऊन  ठरलेल्या कराराची कोर्टामार्फत पुरतात करून घेऊ शकतो व  न्याय मिळवू शकतो. 


आपण जुनी गाडी खरेदी व विक्री कशी करावी या बाबत थोडक्यात माहिती बघितलेली आहे. त्यामुळे तुम्हास समजले असे की, जुनी गाडी खरेदी व विक्री करते वेळी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात व त्यामुळे होणारी फसवणूक देखील टाळू शकते. 


इतर ब्लॉग पोस्ट :-

सौदापावती करारनामा दस्त


उसनवार पावती दस्त

Click Here To See Post 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads