मित्रांनो आपण आज माहिती बघणार आहोत सौदापावती म्हणजे काय ? तसेच स्थावर मिळकतीची सौदापावती कशी करतात ?
भविष्यात स्थावर मिळकत खरेदी विक्री करणेसाठीची चा करार म्हणजे सौदापावती करारनामा असतो. याला इंग्रजी मध्ये Agreement Of Sale असे म्हणतात. यालाच साठे खत असे देखील म्हणतात.
जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.
![]() |
Click Above To View Post |
आपण जेव्हा स्थावर (Immovable Property) मिळकत जसे शेती, घर, सदनिका (Flat) मिळकत विकत घेणार असतो त्यावेळी मिळकत मालक व मिळकत विकत घेणार यांच्यात ती मिळकत विक्री करणे व मिळकतीचे विक्री ने हस्तांतर होऊन ताबा देणे कमी आपसात अटी व शर्ती तसेच मोबदला ठरवला जातो. ठरलेला संपूर्ण मोबदला मालकास मिळाला म्हणजे मालक ती मिळकत विक्री घेणारास खरेदीखत नोंदणी करून खरेदीखताने विक्री करून मिळकत ताब्यात देऊन मिळकतीचे कायदेशीर हस्तांतरण करत असतो.
परंतु बर्याच वेळेस असे होते की, खरेदीचा ठरलेला व्यवहार लगेच पूर्ण करणे व होणे शक्य नसते. खरेदीचा संपूर्ण मोबदला मालकास देणे लगेच शक्य नसते. ठरलेला मोबदला आपण टप्प्या टप्प्या प्रमाणे देत असतो. त्यामुळे मिळकत विकत देणार व विकत घेणार यांचेत ती मिळकत विकत घेण्याबाबत मोबदला तसेच अटी व शर्ती ठरतात पण मिळकत लगेच खरेदी होऊन हस्तांतर होत नाही. काही रक्कम advance म्हणून देखील दिली जाते. अशा वेळेस आपला ठरलेला व झालेला व्यवहार, सौदा याला कायदेशीर महत्व प्राप्त होण्यासाठी व कागदोपत्री पुरावा म्हणून ठरलेल्या व्यवहारची आपसात ठरल्या प्रमाणे कायदेशीर सौदापावती करारनामा दस्त तयार करून घेऊन व नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.
आता स्थावर मिळकतीच्या किमतीत खूप वाढ झालेली आहे. तसेच व्यवहार करणेत फसवणूकी देखील वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या परिचित तज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन त्यांना सर्व कागदपत्रे दाखवून व त्यांचेकडून कायदेशीर सौदापावतीचा दस्त तयार करून घेऊन नोंदणी करून घेणे किवा नोटरी करून घेणे गरजेचे आहे. कारण आपण विकत घेत असलेल्या किवा विक्री करत असलेल्या स्थावर मिळकतीचा व्यवहार हा खूप मोठ्या रक्कमेचा असल्याने आपली मोठी फसवणूक देखील होऊ शकते.
इतर ब्लॉग पोस्ट :-
स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.
नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.
ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.
![]() |
Click Here To View Post |
(बरेच वेळा आपल्याला असे देखील वाटते की माला यातील माहिती आहे माझी फसवणूक होणार नाही. वकिलांकडे जाण्याची काही गरज नाही. परंतु तरी देखील सदर दस्त हा तज्ञ वकिलांकडून तयार करून घेणे हे महत्वाचे आहे. कारण आपल्याला ज्या कायदेशीर गोष्टी माहिती नसतील त्या वकिलांना माहीत असू शकतात. कारण त्यांच्याकडे कायदेशीर कामाचा व अश्या प्रकारच्या कामाचा अनुभव असतो. तसेच वकिलांकडून दस्त केल्यामुळे हा देखील फायदा होईल की, वकिलांना कोर्ट, केस यांचा चांगला अनुभव असल्यामुळे त्यांनी या प्रकारचा व्यवहार व त्यावरील पूर्वीच्या कोर्ट केसेस या आधीच बघितलेल्या व चालविलेल्या असू शकतात व त्यांचा कायदेशीर अभ्यास असतो. त्यामुळे त्यांना अनुभवा वरुन हे देखील माहिती असते की, यात भविषात वाद झाला तर काय वाद निर्माण होऊ शकतो ? तो वाद झाला तर कोर्टात आपला दस्त कसा टिकेल व आपण केस कशी जिंकू या प्रमाणे भविष्यातील विचार करूनच व अनुभवावरून वकील साहेब हे कायदेशीर दस्त तयार करत असतात. आपण दस्त तयार करतांना शक्यतो आजचा विचार करतो. परंतु तज्ञ वकील हे भविष्यातील विचार करून दस्त तयार करत असतात. त्यामुळे कोणताही दस्त हा फक्त एक फॉरमॅट व कॉपी पेस्ट नसतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. कारण दस्ता मध्ये काही महत्वाचा मुद्दा टाकणे राहून गेले किवा चुकीचा दस्त झाला तर भविष्यात त्याचा आपल्याला त्रास व खर्च देखील होऊ शकतो.)
लेखी व योग्य ती नोंदणी फी व मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदनिकृत किवा नोटरी पब्लिक यांचे समक्ष स्टॅम्प वर सौदापावती करून घेणे गरजेचे आहे. कारण या मुळे आपला ठरलेला व्यवहार हा कायदेशी होतो. व्यवहार (सौदा) झाल्या बाबत कायदेशीर पुरावा तयार होतो. हा एक करार होत असतो त्यामुळे हा सौदापावती करारनामा असतो. (त्यामुळे यास भारतीय करार कयदा देखील लागू होतो)
सौदापावती ही नोंदणी कार्यालयात नोंदवली तर ती नोंदनिकृत सौदापावती होत असते. त्यासाठी नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क रक्कम भरावी लागते.
जर आपसात झालेला व्यवहार हा काही कारणामुळे रद्द झाला तर आपण सौदापावती रद्द देखील करून घेऊ शकतो.
कोणत्याही एका पक्षाने सौदापावती नुसार ठरल्याप्रमाणे आपला भाग पूर्ण करनेस नकार दिला. आपला भाग पूर्ण केला नाही तर दूसरा पक्ष कोर्टात जाऊन केस दाखल करू शकतो. कोर्टाला दाखवले की समोरचा पक्ष त्याचा कराराचा भाग पूर्ण करत नाही आहे तर कोर्टाकडून त्या ठरलेल्या सौदापावती कराराची अमलबजावणी करून घेता येते. तसेच ज्याचे समोरील पक्षामुळे नुकसान झाले असेल त्याला नुकसानभरपाई देखील मिळू शकते. त्यामुळे नोंदनिकृत सौदापावतीला कायदेशीर रित्या खूप महत्व आहे.
सौदापावती करारनामा केल्याने व सौदापावती मध्ये ठरल्यानुसार मालकास ठरल्याप्रमाने मिळकत विक्री करावी लागते. तो दुसर्यास बेकायदेशीर त्या मिळकतीची परस्पर घेणार व्यक्तीचा हक्क डावलून बेकात्यदेशीर ती मिळकत विक्री करू शकत नाही.
सौदापावती करारनामा हा करार असल्याने व यास भारतीय करार कायदा लागू होतो. सौदापावती करार कायदेशीर होणे कमी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे सौदापावती करारनामा करते वेळी या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
जसे सौदापावती करार करणारे साज्ञान असावेत. व्यवहार करणार यांची मुक्त समंती असावा. मुक्त समंती म्हणजे त्यांच्यावर कोणताही दबाव, दडपण व धाक नसावा. त्यांना करार करण्यास कायद्याचे बंधन नसावे. करार करणार्या व्यक्ती या वेडसर नसाव्यात. त्यांना हे माहीत पाहिजेल की ते काय कृती करत आहेत. तसेच कोणताही करार हा बळजबरीने किवा धाकाने व फसवणुकीने नसावा. करार करण्यासाठी मोबदला हा देखील महत्वाची गोष्टी आहे. कोणताही करार हा फक्त कायदेशीर गोष्टीसाठीच करता येतो. अशा अनेक प्रकारच्या कायदेशीर गोष्टींची पूर्तता असावी लागते.
सौदापावतीमधील काही महतवचे मुद्दे :-
सौदापावती मध्ये लिहून देणार शक्यतो मालक असतो कारण तो मिळकत विक्री करत असतो. मालक लिहून देत असतो की, मी माझ्या मालकीची मिळकत तुम्हास विक्री करण्याचा सौदा करत आहे. लिहून घेणार हा मिळकत विकत घेणार असतो.
मिळकतीचे संपूर्ण नीट वर्णन तसेच मिळकतीच्या चतु:सीमा टाकाव्यात.
त्यानंनातर मिळकतीचा पूर्व इतिहास, महसूल नोंदी याबाबत माहिती लिहावी. मिळकतीचे पूर्व मालक कोण होते. मिळकत शेवट मालकास कशी प्राप्त झाली व मिळाली. मिळकती चा ताबा बाबत व मिळकतीच्या मालकास मिळकत विक्री करणेचा संपूर्ण हक्क व अधिकार आहे या बाबत नमूद करावे.
त्यांनातर महत्वाचा मुद्दा आहे मिळकतीची आपसात एकूण ठरलेली किम्मत. तसेच एकूण किमती पैकी आज रोजी किती रक्कम व कशी रक्कम देणार आहत, जसे चेक, रोख देत आहात की, बँक द्वारे देत आहात त्याचे वर्णन नीट लिहावे. त्यानंतर उर्वरित रक्कम कधी व कशी देणार आहेत. (रक्कम चेक ने तसेच बँकेने द्यावी कारण जास्त रक्कम देनेस अडचण येत नाही व रक्कम दिल्याबाबत पुरावा असतो. तसेच जास्त मोठी रक्कम रोख देणे कायदेशीर देखील नाही) उर्वरित संपूर्ण रक्कम दिली म्हणजे खरेदी कधी करणार. खरेदीची मुदत. उर्वरित रक्कम देण्याची मुदत. खरेदीचा खर्च कोण करणार आहे. खरेदी कमी लागणारे मुद्रांक शुल्क भरणा करणार आहेत या बाबत नमूद करावे.
तसेच मध्ये मध्ये जशी जशी खरेदीची रक्कम दिली म्हणजे त्याबाबत पावती घेऊन घ्यावी.
मिळकतीवर काही कर्ज बोजे तर नाही ना ? असेल तर ते खरेदिपूर्व कमी करून देणे. किवा कोण कमी करेल याबाबत.
त्यानंतर मिळकतीचा ताबा कधी दिला जाणार आहे ? आज का ? खरेदी च्या वेळी ? ते लिहावे. त्यांनातर जर बखळ प्लॉट मिळकत किवा शेत मिळकत असेल तर मिळकत कशी ताब्यात देणार आहेत ? आहे त्या परिस्थित ? का मोजणी वगैरे करून ? त्या बाबत लिहावे. मोजणी केली तर मोजणी सरकारी ? का खाजगी मोजणी करवयाची ? मोजणीचा खर्च कोण करणार आहे ? जसे मिळकत घेणर की देणार. का दोघे मिळून निम्मे निम्मे करणार आहेत. या गोष्टी नमूद असाव्यात.
प्लॉट व घर मिळकत असेल तर मिळकत एन.ए. (Non Agricultural) बाबत नमूद करावे. त्यानंतर सदर मिळकत भूसंपदन वगैरे नाही याबाबत लिहावे.
तसेच खरेदी साठी काही परवानगी लागणार असेल तर परवानगी कोण आणेल त्याबाबत व त्याच्या खर्चा बाबत लिहावे.
मिळकत शेतजमीन असेल तर त्या मिळकतीस रास्ता कोणता व कसा आहे हे नमूद करावे. हा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण या वरुण देखील भविष्यात भांडण होऊ शकते.
शेत मिळकती मध्ये विहीर असेल तर त्यावरील व पाण्यावरील हक्क, तसेच पाईपलिन असेल तर त्याबाबत काय ठरलेले आहे.
तसेच मिळकत विक्री करनेस घरातील सर्वांची परवानगी आहे ना याबाबत नमूद करावे. मिळकत स्वकष्टर्जित आहे की वडीलोपार्जित आहे याबाबत नमूद करावे. कारण मिळकत वडीलोपार्जित असेल तर घरातील इतर सदस्याची परवानगी लागू शकते. कारण त्यांनी काही हरकत घेलयास अडचण येऊ शकते. म्हणून असे असेल तर सर्व परवानगी घेऊन घेणे.
त्यानंतर मिळकतीचा टॅक्स खरेदी पूर्वीचा नील करणे नंतर खरेदिंनंतर नविन मालक टॅक्स भारतील याबाबत नमूद करावे. सौदापावती ही सर्व वाली वारस यांचेवर बंधनकारक राहील असे नमूद करून घ्यावे.
त्यानंतर मिळकतीवर काही कर्ज बोजे बाकी नाही. जर कर्ज बोजे बाकी असल्यास त्या बाबत काय ठरले आहे. खरेदी पूर्वी सर्व बोजे कमी करून देणे याबाबत नमूद करणे. तसेच सदर मिळकतीवर काही वाद वगैरे प्रलंबित नाही. मिळकत ही वादाचा विषय नाही. तसे काही निघल्यास त्याचे सर्व निवारण करून देण्याची जबाबदारी ही मालकाची आहे. त्यास खरेदी घेणार यांना तोशीष व झळ तसेस खर्च नाही लागणार याची जबाबदारी मिळकत मालक यांची आहे.
सौदपवती दस्त यात दोन किवा त्यापेक्षा जास्त सज्ञान व माहीतगार साक्षीदार नमूद करावेत.
बरेच लोक मिळकत ही कर्ज घेऊन खरेदी करत असतात. अशा वेळी आपण जर मिळकत कर्ज घेऊन विकत घेणार असू किवा ती मिळकत बँकेस गहन देऊन कर्ज घेऊन विकत घ्यायची असेल तर. सौदापावती करण्या अगोदर बँक यांचे अशी संपूर्ण चर्चा करून घ्यावी मगच सौदापावती करावी कारण कर्ज मंजूर होते की नाही तसेच सौदापावती मध्ये काही बादल किवा बँक सांगेल त्याप्रमाणे देखील करावी लागू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टी नीट बघून घ्याव्यात. आपल्याला त्या मिळकतीचा सर्च रीपोर्ट देखील काढावा लागू शकतो.
![]() |
Click Above To View Post |
आपण जी मिळकत विकत घेणार आहोत ती विकत घेणे आधी व सौदापावती करण्या आधी पुढील गोष्टी बघून खात्री करून घेणे महत्वाचे आहे.
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
![]() |
Click Above To View Post |
आपण जी मिळकत घेत आहोत ती मिळकत सौदा करण्याच्या आधी प्रत्यक्ष जाऊन नीट बघून घ्यावी.
सर्वात आधी मिळकतीचा उतारा बघून घेणे जसे 7/12, सिटी सर्वे, ग्रामपंच्यायत नमूना नंबर 8 जो उतारा असेल मिळकत प्रकारा नुसार तो बघून घ्यावा. उतारा हा चालूचा बघवा जास्त जुना नसावा. कारण जुना उतारा असेल तर त्यात बादल होऊ शकतो. ऑनलाइन डिजिटल उतारा काढला तरी चालेल.
त्यानंनातर बघून घ्यावे की, मिळकतीचे मालक कोण आहे ? आपण ज्यांचे कडून मिळकत घेत आहे तेच मिळकतीचे मालक आहेत ना ?
शेती चा 7/12 उतारा असेल तर बघून घ्यावे की इतर हक्कत तर कोणाचे नवे नाहीत ना. त्यानंतर बघून घ्यावे उतारा किवा मिळकत पत्रिकेवर काही बोजे वगैरे आहेत का ?
शेत मिळकत असेल तर उतार्यावर बघून घ्यावे जमीन वर्ग एक आहे की वर्ग 2. जर जमीन भोगवटादार वर्ग -1 असेल तर विक्रीस काही अडचण येत नाही. परंतु जमीन ही भोगवटादार वर्ग - 2 असेल तर योग्य ती नजराणा रक्कम सरकार दरबारी जमा करून विक्री ची परवानगी घेऊन मग त्या जमिनीची विक्री होत असते. त्यामुळे जमीन भोगवटादार वर्ग - 1 आहे की वर्ग - 2 आहे नीट तपासून बघून घ्यावे.
आपण बखळं प्लॉट मिळकत घेत असू तर त्या मिळकतीचा अंतिम मंजूर Lay Out बघून घ्यावा. त्यामुळे नेमका प्लॉट चा आकार, क्षेत्र, चतु:सीमा, प्लॉट ला किती रास्ते आहेत व रास्ता कोणत्या दिशेने आहे. हे समजून जाईल.
त्यानंतर आपण जी मिळकत विकत घेत आहोत तिचे जर सह मालक असतील तर तिचे सर्व सह मालक आपल्याला सौदापावती करून देत आहेत ना ? कारण ती मिळकत ते सर्व सह मालकच विक्री करून देऊ शकतात. त्यामधील फक्त एक मालक नाही ? या गोष्टीची खात्री करून घ्यावी.
काही मिळकती या लागत असल्याने त्यांचा उतारा एकच असतो व उतारा वर मालकांचे नवे असतात. अशा वेळी आपण कोणाकडून त्याची मिळकत घेत आहोत त्याचे नाव, क्षेत्र, मिळकत कोणत्या दिशेची आहे. त्याच्या चतु:सीमा बघून घ्याव्यात.
जी काही शेत मिळकत किवा प्लॉट मिळकत घरेदी घ्यावयाची आहे. तिच्या उतार्यावर अपक - म्हणजे अज्ञान पालन करणार म्हणून कोणी अज्ञान व्यक्तीचे नाव तर नाही ना हे देखील पाहून घ्यावे. कारण त्यावर अपक म्हणून अज्ञान इसमाचे नाव नमून असेल तर अशी मिळकत विक्री करणे कमी सक्षम कोर्टाची परवानगी देखील घ्यावी लागू शकते. किवा विक्री मधून येणारी काही रक्कम त्या अज्ञान व्यक्ती च्या नावे बँकेत FD करावी लागू शकते. या बाबत आपसात काय ठरते ते नीट बघून घ्यावे.
आपल्याला अजून काही शंका असतील तर उतार्या वरील नोंदी तपासून बघाव्यात. नोंदी आता ऑनलाइन देखील बघता येतात. त्याबाबत देखील माहिती मी ब्लॉग पोस्ट मध्ये या आधीच दिलेली आहे.
ऑनलाइन डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी कशा काढाव्यात ?
![]() |
Click Here To View Post |
मिळकत विकत घेणे आधी त्या मिळकतीचा वकिलांकडून सर्च घेऊन घेतला तरी तुम्हाला त्या मिळकती बाबत सर्व माहिती समजून जाईल.
त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट आहे की, बर्याच वेळेस आपण जी मिळकत विकत घेत आहोत तिचे अनेक मालक असतात. ते सर्व मालक एका व्यक्तीस ती मिळकत विक्री करणे कमी मुखत्यार पत्र करून देततात. त्यावेळी हे तपासून बघावे की मुखत्यार पत्र नोंदणीकृत तर आहे ना ? कारण जर मुखत्यार पत्र नोंदणीकृत असेल तरच त्यावरून खरेदीचा व्यवहार होऊ शकतो. जर ते नोंदणीकृत नसेल तर त्यावरून खरेदी करते वेळी अडचान निर्माण होईल व खरेदी होणार नाही. तसेच मुखत्यार पत्र जास्त जुने तर नाही ना ? कारण जास्त जुने मुखत्यार असेल तर त्यामधील सर्व मालक जीवंत तर आहेत ना ? ही खात्री करून घ्यावी कारण त्यामधील एखादी व्यक्ति जरी मृत झाली असेल तर ते मुखत्यार पत्र रद्द होत असते. म्हणून या बाबत नीट खात्री करून घ्यावी.
त्यानंतर आपण सौदापावती केल्यावर आपले वकील यांचे मार्फत मिळकत विक्री घेणने बाबत पेपर नोटीस देऊ शकतात. त्यामुळे कोणाची काही हरकत अडचण तर नाही न हे समजून तर जाईलच त्याबरोबर असे देखील दिसून येते की, तुम्ही (Bonafide Purchaser) प्रामाणिक विकत घेणार आहात.
त्यानंनातर आपण जी मिळकत घेत आहोत ती जर सदनिका किवा घर मिळकत असेल तर तिचे दस्त तपासून घ्यावे. जसे मिळकत बाधकाम परवानगी, Commencement व Completion सर्टिफिकेट, मिळकतीचा टॅक्स भरण्या बाबत पावत्या. जर Flat मिळकत असेल तर त्याची नोंदणी कोणत्या कायद्याने झालेली आहे त्याबाबत कागदपत्रे. जसे घोषणापत्र वगैरे. घोषणापत्र हा देखील एक महत्वाचा दस्त आहे. त्यावरून तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. जर मिळकत जुनी असेल तर पूर्व मालकांचे खरेदी विक्री चे कागदपत्रे बघून घ्यावेत. यावरून तुम्हाला बर्याच गोष्टी समजून जातील.
तुम्ही जर विकसित होत असलेली किवा भविषात विकसित होणारी फ्लॅट मिळकत खरेदी करणार असाल तर त्याबाबत मिळकतेचे मूळ मालक कोण आहेत ? बिल्डर व मालक यांचेत काय करार (Development Agreement) झालेले आहे. विविध शासकीय परवानगी या बाबत कागदपत्रे तुम्ही बघू शकतात. तसेच मिळकत Develop करणे कामी कोणाला आधिकारपत्र दिलेले आहे का त्याबाबत कागदपत्रे बघू शकतात. विविध संबंधीत कायद्या नुसार ही माहिती विकासकला खरेदी घेणार ग्राहकास देणे देखील बंधनकारक करनेत आलेले आहे व ही माहिती ऑनलाइन देखील उपलब्ध होऊ जाऊन शकते.
कधी कधी असे देखील होते की, जो व्यक्ती मिळकती चा व्यवहार करत आहे तो मिळकतीचा मालक नसतो. किवा कुटुंबातील व्यक्ती असू शकतो, अशा वेळेस आपल्या अटी व शर्ती काय ठरल्या आहेत त्या नीट ठरवून घ्याव्यात. मालकांना व्यवहार माहीत आहे ना याची खात्री करून घ्यावी. मालक यांचे बरबोबर चर्चा करून मगच मूळ मालक यांचे शी सौदा करावा कारण त्यांचा मिळकत विक्री करण्याचा अधिकार राहील. त्यामुळे देखील आपली फसवणूक होणार नाही.
मिळकतीचे एका पेक्षा अनेक मालक असतील व सर्व मिळून मिळकत विक्री करणार असतील तर सर्वांबरोबर चर्चा करणे व सौदापावती मध्ये सर्वांच्या सह्या घ्याव्यात म्हणजे आपला व्यवहार व्यवस्थित होईल.
कधी कधी असे देखील होते की पूर्वी सौदापावती चा दस्त कोणी केलेला असेल त्यावरून ते अजून दुसर्यासोबत सौदापावतीचा दस्त करून देतात. अशा वेळी मूळ मालकास याची माहिती नसल्याने हा व्यवहार बेकायदेशीर होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही मिळकत विकत घेत असताना किवा सौदापावती करून घेत असताना ती मूळ मालक यांचे कडूनच करून घेणे व आपण ज्याच्या बरोबर व्यवहार करत आहोत त्याला मिळकत विक्री करणे चा कायदेशीर हक्क व अधिकार आहे ना हे तपासून बघावे.
स्थावर मिळकतीची सौदापावती यासोबत पुढे दिलेले कागदपत्रे जोडावेत. हे सर्व कागदपत्रे पाहिजेच असे नाही. परंतु असल्यास चांगलेच आहे.
घेणार व देणार यांचे आधार झेरॉक्स, मिळकतीचा चालू उतारा, प्लॉट मिळकत असेटल तर Layout ची कॉपी. मिळकत मालकी हक्का बाबत अजून काही दस्त असेल तर तो जोडावा.
इतर ब्लॉग पोस्ट :-
शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.
![]() |
Click Here To View Post |
इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-
महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी
वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..
![]() |
Click Above To See Blog Post |