Equity Mortgage आणि Register Mortgage काय असते ?

Adv.Saurabh Rajput
0



आपण माहिती बघू Equity Mortgage आणि Register Mortgage काय असते ? 


जेव्हा एखादी ग्राहक स्थावर मिळकत खरेदी करत असतो त्यासाठी बर्‍याच वेळा बँकेकडून कर्ज घेतले जात असते. 


 बँक ज्या ग्राहकास गृह कर्ज देत आहेत त्यासाठी ग्राहकाची स्थावर मिळकत गहाण ठेऊन ग्राहकास कर्ज दिले जात असते.   बँक ग्राहकास हे   कर्ज  Secure Loan च्या स्वरुपात देत असते. ग्राहकाची स्थावर  मिळकत बँकेकडे गहाण  असल्याने हे Secure Loan  होत असते. 


गहाण म्हणजे मिळकतीवर बँकेचा कर्जाचा बोजा चढवला जात असतो. जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही तर बँक त्या  गहाण  मिळकतीची विक्री करून ग्राहकास दिलेल्या कर्जाची कायदेशीर मार्गाने  कर्जाची दिलेली रक्कम वसूल करू शकते. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


( SERFESAI ACT) कर्ज वसूली ची कारवाई.


 SARFESAI Act ची माहिती.


Click Here To See Post 





गहाणाचे चे अनेक प्रकार आहेत त्यापैकी आपण बघणार आहोत  Equity Mortgage व  Register Mortgage म्हणजे काय असते.  हे दोन्ही स्थावर  मिळकत गहाण  करण्याचे  कायदेशीर प्रकार आहेत. 


जेव्हा आपण एखादी बँकेकडून मिळकत गहाण  ठेऊन गृह कर्ज घेत असतो त्या वेळी बँक कर्जदारासोबत करार करत असते आणि  ग्राहकाची स्थावर मिळकत गहाण  ठेवून ग्राहकास कर्ज देत असते. 


बँक कर्जदारची मिळकत  Equity Mortgage किवा Register Mortgage करत असते आणि ग्राहकास कर्ज देत असते.


काही बँका  Register Mortgage न करता मिळकत Equity Mortgage करत असतात. तसेच काही फायनान्स कंपन्या देखील मिळकत गहाण  ठेऊन कर्ज देण्यासाठी मिळकत Equity Mortgage करत असतात. 


आता आपण बघू  Equity Mortgage किवा Register Mortgage या मध्ये काय फरक आहे. 



इक्विटेबल मॉर्गेज (Equitable Mortgage) म्हणजे नेमके काय ?

 

मालमता हस्तांतरण अधिनियम,1882 चे कलम 58 मध्ये गहाण व्यवहारासंबंधी (Mortgage) तरतुदी आहेत. यातील खंड (एफ) मध्ये डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने कर्जव्यवहार करण्याच्या तरतुदी आहेत. त्यानुसार कर्ज घेणार व्यक्ती संबंधित मिळकतीचे हक्कलेख कर्ज देणा-याकडे निक्षेपित (जमा) करुन (By way of Depositing of Title Deeds) कर्जाची रक्कम प्रतिभूतीत (Secure) करु शकते. ही कार्यवाही केवळ राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे रवून दिलेल्या शहरांमध्ये करता येते. या पध्दतीला इक्विटेबल मार्गेज किंवा Mortgage by way of depositing of title deeds असे संबोधले जाते.


Equity Mortgage : -


जेव्हा बंकेकडून गृह कर्ज मंजूर  केले जाते तेव्हा बँक Loan Agreement करत असते. त्या दस्ता नुसारच Equity Mortgage होत असते. बँकेचे कर्जाचे अनेक कागदपत्रे असतात जसे Loan Agreement, Indemnity Bond वगैरे.  हे दस्त  योग्य त्या Stamp Paper वर  केले जात असतात व नोटरी देखील केले जात असतात. 


Equity Mortgage साठी Register Mortgage पेक्षा खर्च आणि वेळ पण कमी लागत असतो. कारण या गहाण खताची नोंदणी कार्यालयत नोंदणी करावी लागत नाही. त्यामुळे यासाठी स्टॅम्प देखील कमी लागत असतो. 


Equity Mortgage मध्ये मिळकतीचे मूळ मालकी हक्काचे दस्त जसे मूळ (Original) खरेदीखत वगैरे सर्व दस्त हे बँकेकडे जमा करावे लागत असतात. त्यानंतर हे गहाण (Mortgage) तयार होत असते. 


Equity Mortgage मध्ये कर्जदारणे कर्जाची परत फेड केल्यानंतर बँक ग्राहकास गहाण  ठेवलेल्या मिळकतीचे संपूर्ण मूळ कागदपत्रे परत करून देत असते. आणि ग्राहकास No Dues दाखला देत असते. 


Equity Mortgage मध्ये फक्त करारनामा होतो व मिळकतीचे मूळ मालकी हक्काचे कागदपत्रे बँकेकडे जमा करावे लागत असतात. हे गहाणखत दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयत नोंदणी करण्याची गरज  नसते. मिळकतीचा ताबा देखील मालकडे असतो. 


Equity Mortgage ची प्रक्रिया थोडी सोपी प्रक्रिया असते. त्यामुळे बर्‍याच बँका Equity Mortgage देखील करत असतात. Equity Mortgage मध्ये  गहाण खत नोंदणी करण्याची गरज नसते  व स्टॅम्प ड्यूटि देखील जास्त लागत नसते. त्यामुळे हे गहाणखत करण्यास  खर्च व वेळ कमी लागत असतो. अशा प्रकारचे गहाण खत रद्द करण्याची  प्रक्रिया देखील थोडी सोपी आहे. 


Equity Mortgage मध्ये थोडा धोका देखील असू शकते. कारण Equity Mortgage मध्ये काही लोक मूळ दस्त हरवले आहे असे  खोटे सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुसरे कर्ज काढून घेऊ शकतात.  परंतु असे करणे आव्हघड  असून हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे कोणतीही बँक कर्ज देणयच्या आधी सर्व तपस करून. सर्व मूळ व इतर कागदपत्रे तपासून तसेच मिळकतीचा सर्च घेऊन सर्व खात्री करूनच कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करत असते. 


जेव्हा एखादी व्यक्तिला एखादी स्थावर मिळकत खरेदी करणे असेल  तेव्हा त्या व्यक्तीने त्या  मिळकतीचे सर्व मूळ दस्त बघणे महत्वाचे  व गरजेचे आहे. कारण मिळकतीच्या मालकाकडे मिळकतीचे मूळ दस्त उपलब्ध नसतील तर त्याचा असा देखील अर्थ होऊ शकतो की त्या व्यक्तीने त्या मिळकतीवर  Equity Mortgage ने काही कर्ज तर घेतलेले नाही. 


  Register Mortgage : - 


Register Mortgage हे  दुय्यम निबंधक कार्यालयात  नोंदणी  करावे लागत असते. त्यासाठी नोंदणी फी व स्टॅम्प ड्यूटि  भरावी लागते. त्यामुळे यासाठी खर्च व वेळ देखील जास्त लागत असतो. 


 आपण नोंदणी कार्यालयात ज्याप्रमाणे खरेदीखत करत असतो त्याचप्रमाणे नोंदणी कार्यालयात Register Mortgage Deed  नोंदणी करावी लागत असते. त्यालाच Register Mortgage Deed  असे म्हटले जाते.  


Register Mortgage मध्ये मिळकतीचे मूळ दस्त ग्राहकडे राहतात. परंतु काही बँका मूळ दस्त देखील जमा करत असतात. 


काही ज्या जुन्या मिळकती आहेत किवा ग्रामीण भागातील मिळकती आहे त्यांचा नमूना नंबर 8 चा उतरा असतो. त्यांचे जास्त दस्त एखादी वेळेस उपलब्ध नसतात. काही मालकी हक्काचे कागदपत्रे हरवलेले असू शकतात किवा उपलब्ध नसतात. अशा वेळेस बँक ग्राहकास त्या मिळकतीवर कर्ज देण्यासाठी ती मिळकत Register Mortgage करत असते. कारण हे सुरक्षित गहाण खत असते. 


Register Mortgage मध्ये मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवर (उतार्‍यावर) बँकेचा कर्जाचा बोजा चढवला जात असतो. 


Register Mortgage मध्ये कर्जाची परतफेड झाल्यानंतर बँक त्याचा दस्त जसे Memorandum Of Release (नजर गहाण खत रद्द दस्त)  तयार करून देत असते. आणि  या नुसार पुन्हा गहाण  ठेवलेल्या मिळकतीचे गाहणखत रद्द करावे लागत असते  आणि त्यानंतर मिळकतीच्या उतार्‍यावरील  कर्जाचा बोजा हा कमी होत असतो. यासाठी देखील थोडाफार खर्च व वेळ लागत असतो. 


Register Mortgage केल्याचे काही फायदे आहेत. जसे त्या मिळकतीच्या उतार्‍यावर कर्जाचा बोजा चढवला जात असतो. त्यामुळे कोणी देखील त्या मिळकतीचा उतारा काढला तर त्यावर कर्जाचा बोजा हा नमूद असतो. त्यामुळे कोणाला पण लावर समजून शकते की,  संबधित मिळकत बँकेकडे गहाण असून त्या मिळकतीवर कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे कोणाचा त्या मिळकतीशी व्यवहार असेल तर फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे Register Mortgage सुरक्षित समजले जात असते व यात फसवणूक होण्याचा धोका देखील कमी असतो. 


बँक जेव्हा ग्राहकास गृह कर्ज देत असते व मिळकत गहाण  ठेवत असते त्यावेळी बर्‍याच बँका नजर गहाण  खत तयार करत असतात व त्याची  नोंदणी कार्यालयात नोंदणी करत असतात. 


नजर गहाण खत म्हणजे बँक मिळकत गहाण करतात व मिळकतीवर कर्जाचा बोजा चढविला जातो. परंतु त्या मिळकतीचा ताबा हा कर्जदारकडेच असतो. यालाच नजर गहाण खत असे म्हटले जाते. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


जमिनीची शासकीय मोजणी


मोजणीची "क" प्रत म्हणजे काय


जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार


मोजणी अर्जाचा नमूना :


इतर ब्लॉग पोस्ट :-


मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.


Click Here To View Post

इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-


महसूल अपील


महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी


मामलतदार कोर्ट अ‍ॅक्ट


वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..


स्थावर मिळकतीची वाटणी


डिजिटल गाव चावडी

Click Above To See Blog Post 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads