डिजिटल गाव चावडी
मित्रांनो आपण माहिती बघणार आहोत डिजिटल गाव चावडी बाबत.
पूर्वी गावात गाव चावडी वर गावातील महत्वाचे निर्णय घेतले जायचे. तसेच गावातील काही शेती, घर, प्लॉट याची विक्री, हक्कसोड तसेच काही व्यवहार असेल तर त्या बाबत गावात गाव चावडी वर नोटीस लावली जायची. कारण त्या व्यवहारची माहिती गावात सर्वांना व्हावी आणि त्यासंबधी कोणाची काही हरकत, तक्रार असेल तर त्यांना दिलेल्या मुदतीत तक्रार व हरकत घेता यावी.
आता सर्व काही कामे ऑनलाइन झालेली आहेत त्यामुळे शासनाची देखील बरेच कामे हे आता ऑनलाइन होत असतात. आता सर्वांकडे मोबाइल तसेच संगणक उपलब्ध आहे. त्यामुळे बरेच कामे हे आता ऑनलाइन होतात. महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचे देखील बरेच कामे हे ऑनलाइन होतात. त्यांनी देखील बर्याच सुविधा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आता गाव चावडी ही देखील डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
गावतील जे काही महसूल विभागाचे निर्णय कामे, खरेदी विक्री, हक्कासोड किवा मिळकतीचा जो काही कोणताही व्यवहार असेल तर तो झाल्या नंतर त्या बाबत ची फेरफार होण्या आधी महसूल विभाग त्या बाबतची नोटीस (विहित मुदतीत व कालावधी साठी) त्यांच्या वेबसाइट वर डिजिटल गाव चावडी यावर प्रसिद्ध करतात.
त्यामुळे त्या निर्णयाशी कोणाचा हक्क हितसंबंध असेल. कोणाचे नुकसान, फसवणूक होत असेल तर ते त्या साठी त्यांची हरकत संबंधीत महसूल अधिकारी जसे तलाठी, मंडल अधिकारी याचेकडे मुदती मध्ये दाखल करू शकतात.
हरकत अर्ज दाखल झाल्यावर सबंधित महसूल मंडळ अधिकारी संबंधितांना नोटीस काढतात आणि दिलेल्या तारखेला कागदपत्रे व पुरावे घेऊन येऊन सादर करणेस सांगतात व समोरील पार्टीला त्या तक्रार हरकत अर्जावर त्याचे म्हणणे द्यावे लागते. त्यानंनातर संबंधीत महसूल अधिकारी कागदपत्रे व पुरावे बघून न्यायनिर्णय देतात व मग त्यानुसार फेरफार मंजूर किवा नामंजूर होऊ शकते.
ज्या पार्टीला तो निर्णय मान्य नसेल ते वरच्या महसूल प्राधिकरनात जाऊ शकतात जसे तहसिलदार, प्रांत अधिकारी, त्यांनातर जिल्हाधिकारी तसेच त्या निर्णया विरुद्ध न्यायालयात देखील दाद मागू शकतात.
गावातील कोणत्याही आत्ताच नुकत्याच झालेल्या खरेदी, विक्री, हक्कसोड, किवा कोणत्याही नोंदनिकृत व्ययहारची माहिती आपण गावचावडी या महसूल विभागाच्या वेबसाइट वरुन गावचावडी येथून बघू शकतो त्यामुळे आपल्याला त्या व्यवहारची माहिती होऊ शकते.
आता आपण बघू यात की डिजिटल गावचावडी काशी बघवी ते.
सर्वात आधी आपण महसूल विभागाची पुढील वेबसाइट सुरू करून घ्यावी.
https://bhulekh.mahabhumi.gov.in/
आपण गूगल मध्ये Mahabhulekh असे देखील सर्च केले तरी आपल्याला ही वेबसाइट भेटून जाईल.
त्यानंतर महसूल विभाग यांची पुढील प्रमाणे वेबसाइट सुरू होऊन जाईल.
त्यानंतर (डिजिटल नोटीस बोर्ड) आपली चावडी यावर ok करावे. त्यांनातर पुढील प्रमाणे पेज सुरू होईल.
या वरील पेज वर गावाची माहिती जसे जिल्हा तालुका हे भरून घ्यावे आणि आपली चावडी पहा यावर ओके करावे.
आता आपल्याला आपल्या गावाची डिजिटल गाव चावडी आपल्याला दिसून जाईल.
याप्रमाणे तुम्ही आपल्या गावाची डिजिटल गाव चावडी बघू शकतात. यावर तुम्हाला हरकत नोंदवायची शेवटची तारीख देखील समजून जाईल. त्याप्रमाणे तुमची काही हरकत असेल तर ती तुम्ही नोंदउ शकतात.
डिजिटल गाव चावडी वर महसूल विभागणे अजून बर्याच काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या ऑनलाइन सुविधे मुळे आपल्याला फेरफार प्रकरणे ऑनलाइन ट्रॅकिंग करता येणार. त्यांची काय स्थिती आहे ते बघता येते. सध्या सातबारा व मिळकत पत्रिकेवरील नोंदी सांधर्भात सुविधा उपलब्ध आहे.
आपले प्रकरण नेमके कोणत्या टेबल वर किती दिवस रखडले याची माहिती ऑनलाइन मिळाल्याने त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे त्यामुळे भष्टाचार देखील कमी होईल व प्रलंबित प्रकरणे देखील लवकर निकाली लागतील.
(इतर महसूल विभागाच्या ऑनलाइन सुविधा जसे ऑनलाइन 7/12 उतारा, नमूना नंबर 8 उतारा, ऑनलाइन महसूल नोंदी ऑनलाइन कश्या काढाव्यात या बाबत इतर पोस्ट व माहिती मी या ब्लॉग मध्ये इतर पोस्ट मध्ये दिलेली आहे ती देखील माहिती तुम्ही या ब्लोग वरुन मिळउ शकतात.)
इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-
ऑनलाइन डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी कशा काढाव्यात ?
महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी
वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..
![]() |
Click Above To See Blog Post |