कोर्ट फी स्टॅम्प ड्युटी (न्यायलाईन शुल्क) ऑनलाइन कसे भरावे.

Adv.Saurabh Rajput
0


कोर्ट फी स्टॅम्प ड्युटी (न्यायलाईन शुल्क) ऑनलाइन  कसे भरावे. 


मित्रांनो आपण माहिती बघणार आहोत कोर्ट फी स्टॅम्प ड्युटी (न्यायलाईन शुल्क) ऑनलाइन कसे भरावे... 

कोर्ट फी स्टॅम्प चलन हे न्यायालयात दिवाणी किवा ठराविक फौजदारी केस दाखल करण्या पूर्वी तसेच उच्चा न्यायालतील केस करण्यासाठी  वकिलांना काढावे लागत असते, व सदर चलन हे दाखल करत असलेल्या केस सोबत जोडावे लागत असते. 

 (सदर संकेत स्थळवरून आपण जिल्हा न्यायालय, JMFC तालूका न्यायालय, तसेच उच्च न्यायालयासाठी ची कोर्ट फी स्टॅम्प ड्यूटी काढू शकतो.)

सर्वात आधी आपण न्यायालयाचे हे पुढील संकेतस्थळ आपल्या संगणकावर किवा मोबाइल वर Google chrome वर चालू करावे.


त्या नंतर पुढील प्रमाणे Website सुरू होईल. 


या मध्ये आपल्या केस  संदर्भात माहिती भरावी, जसे पक्षकारचे नाव, कोर्टाचे नाव वगैरे, जर दिवाणी केस असेल तर सीनियर डिविजन कोर्ट निवडावे आणि फौजदारी केस असेल तर जूनियर डिविजन ऑप्शन निवडावे. सदर माहीती भरली की आपला मोबाइल नंबर टाकावा आणि Generate OTP या वर Ok करावे. मग जो मोबाइल नंबर आपण टाकलेला आहे त्यावर वर 
OTP येईल- आणि तो टाकून verify यावर ok करावे. त्यानंतर पुढील ऑनलाइन पेमेंट चे पेज सुरू होईल.  तसेच आपल्या मोबाइल 
नंबर वर एक चलन चा नंबर मेसेज येईल. तो नंबर आपल्याला चलन डाऊनलोड करणे कमी महत्वाचा आहे. 


यावर आपण ज्या प्रमाणे पेमेंट करणार आहोत ते ऑप्शन सिलेक्ट करावे व Agree वर Ok करून Proceed to payment यावर Ok करून ऑनलाइन पेमेंट पूर्ण करावे. 

ऑनलाइन पेमेंट Success झाल्यावर आपोआप स्क्रीन वर चलन Generate होईल ते डाऊनलोड करून प्रिंट काढून घायावी. 

जर चलन Generate झाले नाही किवा आपल्याला परत चलन डाऊनलोड करावयाचे असेल तर पुढील सकेतीस्तळ उघडावे 


त्यानंतर पुढील वेबसाइट चालू होईल.

त्यानंतर सर्च चलन यावर Ok करावे मग पुढील पेज चालू होईल. 

या मध्ये आपल्या मोबाइल मध्ये जो चलन चा नंबर आलेला आहे तो टाकावा आणि चलन ची इतर माहिती भरावी मग चलन डाऊनलोड चे ऑप्शन येईल तिथून चलन डाऊनलोड करून घ्यावे. 

(केस दाखल झाल्यावर चलन न्यायालया द्वारे ऑनलाइन Deface केले जाते, म्हणजेच तपासले जाते. त्यानंतर त्या चलन वर गोल सर्कल मध्ये Chalan Deface असे नाव येते. त्यामुळे सदर चलन खरे आहे हे न्यायालयास समजते व सदर चलन एकदाच वापरले जाऊ शकते.)



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads