फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय काय कागदपत्रे बघावेत.

Adv.Saurabh Rajput
0


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय काय कागदपत्रे बघावेत. 


मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय काय कागदपत्रे बघावेत. आजकाल बरेच लोक नोकरी साठी तसेच जॉब साठी बाहेर गावाला मोठ्या शहरात जात असतात. तसेच बर्‍याच लोकांचे स्वप्न असते की स्वता:चा फ्लॅट असावा. तेव्हा लोक नवीन फ्लॅट खरेदी करत असतात. आज काल मिळकतींच्या किमती मध्ये देखील खूप वाढ  झालेले आहे त्यामुळे नवीन फ्लॅट घेतांना काळजीपूर्वक कागदपत्रे बघून किवा वकिलांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्फत  व्यवहार करणे महत्वाचे असते.


 बिल्डर कडून जेव्हा आपण फ्लॅट विकत घेत असतो तेव्हा सर्वात आधी आपण ज्या जागेवरील फ्लॅट घेत आहोत ती जागा कोणाच्या मालकीची आहे हे तपासून बघावे. त्यासाठी आपण त्या मिळकतीचे चालूचे प्रॉपर्टी कार्ड, 7/12 उतारा बघितला तर आपल्याला समजेल की जमिनीचा मालक कोण आहे.  ती जागा बिल्डर च्या नावाने किवा त्याच्या कंपांनीच्या नावाने तर आहे ना ? जमीन N.A. बद्दल माहिती समजेल. तसेच आपण उतार्‍या वरील जुन्या नोंदी तपासून बघितल्या तर आपल्याला बरीच माहिती समजू शकते. जुन्या नोंदी आपण संबधित महसूल कार्यालयात जाऊन किवा ऑनलाइन देखील तपासून बघू शकतो. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?

स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.

नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.

ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.

Click Here To View Post


जमिनीचा मालकी हक्क (Land Ownership) तपासण्यासाठी आपण त्या मिळकतीच्या प्रोपेर्टी कार्ड त्याच बरोबर त्या जमिनीचे मालकी हक्काचे कागदपत्रे तपासून बघावेत. जसे खरेदीखत, वगैरे. त्यामुळे आपल्याला समजू शकते की आपण ज्या बिल्डर कडून किवा कंपनी कडून फ्लॅट खरेदी करत आहोत ती जागा त्यांच्या मालकीची तर आहे ना ? त्यामुळे आपल्याला समजेल की बिल्डरला तो फ्लॅट विक्री करण्याचा अधिकार आहे तर आहे ना. 


त्यानंतर कधी कधी असे देखील होत असते की जमिनीचा मालक कोणी दूसरा व्यक्ती आहे आणि बिल्डर ने त्या व्यक्तीकडून ती जागा विकसित करणेसाठी करारनामा केलेला आहे. असे असेल तर ते कागदपत्रे तपासून घ्यावेत. त्यामुळे आपल्याला समजेल की बिल्डर ला काय काय अधिकार आहेत ?  व मिळकतीचा मालक कोण आहे. मिळकतीच्या मालकाने बिल्डर ला मुखत्यार पत्र करून दिलेले आहे का ? का विकसण करारनामा करून दिलेला आहे ? ही माहिती समजेल. 


त्यानंतर पुढे त्या मिळकतीचा सर्च रीपोर्ट काढलेला असेल तर तो तपासून बघवा. कारण सर्च मध्ये त्या मिळकतीचा पूर्ण इतिहास असतो. त्या मिळकतीचा शेवटी मालक कोण आहे ते समजते. तो मालक कसा झाला ? ही माहिती आपल्याला समजत असते. आपण मिळकतीचा सर्च बघितला तर आपल्याला त्या मिळकती विषयी बरीच माहिती समजून जाईल. सर्च रीपोर्ट हा बिल्डरकडे शक्यतो उपलब्ध असतोच. 


नाहीतर आपण देखील त्या मिळकतीचा वकिलांकडून सर्च रीपोर्ट काढून घेऊन शकतो. बँक देखील कर्ज देण्याच्या अगोदर त्या मिळकतीचा सर्च काढत असते व त्यानुसार कर्ज मंजूर करत असते. त्यामुळे बँकेस समजत असते की त्या मिळकतीचा मालक कोण आहे. त्याला ती मिळकत गहाण देण्याचा, विक्रीचा अधिकार तर आहे ना ? त्या मिळकतीवर काही कर्ज बोजे तर बाकी नाही ना ? ही सर्व माहिती बँकेस सर्च बघून समजत असते. 


त्यामुळे आपण देखील मिळकतीचा सर्च काढून घेतला तर मिळकतीची बरीच माहिती समजू शकते व आपली होणारी फसवणूक टळू शकते. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


स्थावर मिळकतीचा सर्च म्हणजे काय व तो कसा घ्यावा.


स्थावर मिळकतीचा सर्च घेणे.


७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


Click Here To View Post

आपण जर फ्लॅट मिळकत ही बँकेकडून कर्ज घेऊन विकत घेत असू तर बँक तर मिळकतीचा सर्च घेताच असते. तसेच बँक मिळकतीचे सर्व कागदपत्रे तपासून खात्री झाली तरच कर्ज मंजूर करत असते त्यामुळे आपला देखील फायदा होऊन जातो की मिळकतीचा सर्च घेतल्याने समजते की मिळकतीचे टायटल क्लेयर आहे. बंकेने कर्ज मंजूर केले म्हणजे मिळकत विकत घेण्यास काही अडचण नाही. 


त्यानंतर मंजूर Building Sanction  Plan बघवा.  Building Sanction Plan ने बिल्डरला ती बिल्डिंग बांधकाम करण्याची शासना कडून   परवानगी मिळालेली असते.  त्यामुळे आपल्याला हे देखील समजू शकते की बिल्डिंग किती मजली व कशी असेल. Building Sanction Plan हा शासना तर्फे मंजूर होत असतो. नगरपालिका, महानगरपालिका जे काही तेथील अधिकृत सरकारी कार्यालय असेल ते हा प्लॅन मजूर करत असतात. त्या प्लॅन वर सरकारी अभियातचा सही आणि शिक्का असेल. 


त्यानंतर बिल्डर चे रेरा प्रमाणपत्र तपासून बघावे, कारण जे काही Real Estate संबंधित मोठे प्रोजेक्टस असतात. जे त्या तरतुदीत बसत असतील त्यांना संबधित authority च्या ठिकाणी असतील तर बिल्डरला त्या नवीन प्रोजेक्ट ची परवानगी घेऊन Real Estate Regulatory Authority कडे नोंदणी करणे गरजेचे असते.  RERA (महाराष्ट्र स्थावर संपदा नियमक प्राधिकरण) ही  कायदेशीर अधिकृत बॉडी असून त्याचे स्थावर संपदा व त्याचे कामे यावर सर्व लक्ष वं  नियंत्रण  असते.  


जर ती मिळकत RERA मध्ये येत नसेल तर इतर कागदपत्रे जसे Building Sanction Plan वगैरे निट तपासून घ्यावेत. 


RERA च्या वेबसाइट वर आपल्याला त्या प्रोजेक्ट बाबत इतर माहिती देखील समजू शकते. तसेच त्या प्रोजेक्ट चे संबंधित कागदपत्रे देखील वेबसाइट वर असतात. ते आपण तपासून बघून खात्री करून घेऊ शकतो. 


त्या नंतर एखादी बिल्डर चा एखादी मोठा प्रोजेक्ट असेल आणि आपण तेथे फ्लॅट घेत असू तर त्या बिल्डर ने ज्या बँकेकडून त्या प्रोजेक्ट साठी कर्ज घेतलेले आहे ते कर्ज मंजूर प्रमाणपत्र बहितले तर आपल्या समजेल बँक सर्व कायदेशीर गोष्टी तपासून वं खात्री करूनच कर्ज मंजूर करत असते. त्यामुळे आपले काम सोपे होऊ शकते. 


आपण विकत घेत असलेली फ्लॅट मिळकत आपण ती एखादी जुन्या मालकाकडून घेत असू तर त्याबाबत जर फ्लॅट मिळकत असेल तर त्यांची संघटना तयार होऊन हाऊसिंग सोसायटी नोंदविली जाते. त्याचे शेअर सर्टिफिकेट असते. ते तपासून बघावे. अपार्टमेंट कायद्याने गोषणापत्र, Deed Of Declaration, Apparent Deed हे कागदपत्रे तपासून बघावे. 


 मित्रांनो मी तुम्हाला नवीन फ्लॅट मिळकत घेण्या विषयी  काही माहिती तर दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी तर समजल्या असतील. परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करत असतांना निट सर्व गोष्टी तपासून बघणे. त्यातील जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे तसेच वकिलांकडून कायदेशीर काम करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपली फसवणूक होत नाही.  


इतर  ब्लॉग पोस्ट :-


सौदापावती व करारनामा.


डिजिटल गाव चावडी


Click Above To See Blog Post 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads