स्थावर मिळकतीचा सर्च घेणे / स्थावर मिळतीचा शोध घेणे.

Adv.Saurabh Rajput
0


 मिळकतीचा सर्च म्हणजे काय याची माहिती आपण आधी च्या ब्लॉग पोस्ट मध्ये बघितलेली आहे. 

स्थावर मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 

Click Here To See Post 



आता आपण बघू मिळकतीचा सर्च कसा घेतला जातो ? 


 मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? हे आपण पहिल्या ब्लॉग पोस्ट मध्ये बघितले आहे. थोडक्यात मिळकतीचा सर्च म्हणजे त्या स्थावर  मिळकरतीचे सर्व कागदपत्रे तपासणे. मिळकतीच्या पहिल्या व जुन्या मालका पासून मिळकत कशी हस्तांतर होत गेली. ? आता मिळकतीचा मालक कोण आहे ? ती मिळकत त्याला कशी भेटली. ?  त्याला ती स्थावर  मिळकत विक्री करण्याचा, गहाण देण्याचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे ना ? या सर्व गोष्टी तपासून घेऊन त्या बाबतचे Legal Opinion देणे म्हणजे स्थावर मिळकतीचा सर्च घेणे होय. 


    या पोस्ट मध्ये आपण माहिती बघू मिळकतीचा सर्च कसा घेतात. 


कोणतीही स्थावर मिळकत विकत घेणे पूर्वी वकिलांकडून त्या मिळकतीचा सर्च घेऊन घेणे कधीही चांगले असते. कारण त्यामुळे फसवणूक टळू शकते. 


कोणाहिती बँक गृह कर्ज देण्या पूर्वी सर्व कायदेशीर गोष्टी व  कागदपत्रे तपासून बघते. त्यासाठी त्या मिळकतीचा वकिलांकडून सर्च रिपोर्ट काढला जातो. त्यानंतर त्या मिळकतीवर कर्ज मंजूर केले जाते. 


आपण ज्या मिळकतीचा सर्च घेत आहोत ती बखळ प्लॉट मिळकत आहे. ? का बांधीव घर मिळकत आहे. ? का फ्लॅट मिळकत आहे. ? का ती मिळकत भविषात मिळकत विकसित होत आहे. ? त्यानुसार आपल्याला सर्च घ्यावा लागतो व कागदपत्रे तपासवे लागतात. मिळकत प्रकारा नुसार वेगवेगळे कागदपत्रे असतात. ते तपासवे लागतात आणि सर्च घ्यावा लागतो


सर्च घेणे साठी त्या मिळकतीचे सर्व कागदपत्रे तपासून बघावे लागतात. जर मिळकतीचे  बांधकाम झालेले असेल तर ते कायदेशीर आहे ना ? हे तपासवे लागते. त्यासाठी त्या बाबतचे कागदपत्रे तपासवे लागतात. 


मिळकतीचा 7/12 उतारा, जुने उतारे तपासावे लागतात, मिळकतपत्रिका उतारे तपासावे लागतात. मिळकत सिटी सर्वे हद्दीतील असेल तर जुने व नवे  सिटी सर्वे उतारे तपासावे लागतात. 


जी स्थावर मिळकत असेल ती कोणत्या स्थानिक प्रशासनाच्या हद्दीत येते त्यानुसार त्या मिळकतीचे कागदपत्रे असतात ते कागदपत्रे तपासून बघावे लागतात. जसे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण भागातील गावातील मिळकत असेल तर ग्रामपंच्यायत यानुसार बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हे तपासून बघावे.  जर ग्रामपंच्यात  हद्दीतील  गावठानातील मिळकत असेल तरच त्यास ग्रा.पं. परवानगी देऊ शकते. मालक मिळकतीचा  Tax भरत असले बाबत पावती, पाणी पट्टी, घर पट्टी या बाबत पावती. , लाइट बिल हे तपासून बघावे लागते. कारण यामुळे खात्री होऊ शकते  की मालक कोण आहे. 


कोणतीची स्थावर मिळकत ही कायदेशीर अनेक मार्गाने हस्तांतर होत असते. जसे खरेदी विक्री ने, वारसाने, बक्षीसपत्राने, कोणत्याही कायदेशीर मागर्गाने मिळकत हस्तांतर झाली म्हणजे त्याबाबत नोंदणी कार्यालयत, महसूल कार्यालयात किवा संबधित कार्यालयात त्याची नोंद होते. त्याची Index II  तयार होते. तसेच फेरफार होऊन त्याबाबत नोंद मंजूर केली जाते. 7/12 उतार्‍यावर काही बदल झाला तर त्याची नोंद होते. या नोंदी उतार्‍यावर देखल असतात. त्या सर्व नोंदी, इंडेक्स - II या संबधित कार्यालयात किवा महसूल,  तहसील कार्यालय, रेकॉर्ड रूम ला जाऊन किवा संबधित जे कार्यलय असतील जसे नोंदणी कार्यालयात जाऊन अर्ज देऊन, फी भरून काढावे लागतात व सर्व जुने अभिलेख तपासवे लागतात. परंतु आता सर्व कामे ऑनलाइन झाल्याने ही सुविधा आता ऑनलाइन देखील उपलब्ध आहे. ही माहिती तपासून बघिल्याने मिळकतीचा इतिहास समजत असतो झालेल्या व्यवहारची खात्री देखील होत असते.  त्यामुळे  मिळकतीचे जुने झालेले व्यवहार व नोंदी या क्रॉस चेक करून खात्री करावी लागते. 


मिळकतीवर काही बोजा वगैरे तर नाही ना ? हे तपासून बघावे लागते. पहिले काही बोजा असेल व तो नील झाला असेल त्या बाबत नमूद करावे लागते. 


सर्वात आधी मिळकत कोणाच्या मालकीची होती. त्यांनातर ती वारस यांना काशी प्राप्त झाली. त्यानंतर त्या मिळकतीचे त्यांनी काय केली, वाटणी, विक्री, बक्षीस, हक्कसोड, का परत पुन्हा पुढे वारस यांना हस्तांतर झाले. ही सर्व माहिती सर्च घेऊन बघवी लागते. 


त्यांतर मिळकत एन.ए. Non Agricultural कधी झाली हे बघावे लागते. मिळकत बिल्डर ला विकसीत करणे कमी दिलेली असेल तर मिळकत मालक यांचे सोबत काय करारनामा झालेला आहे. बिल्डर ला काय अधिकार आहे. बिल्डर ला मिळकत विक्री बाबत काय अधिकार आहे. बिल्डर ला कोणते फ्लॅट विक्री करनेचे अधिकार आहेत ?  बिल्डर ला Power Of Attorney करून दिलेले आहे का ? बिल्डर ला मुळात हे हक्क कसे व कोणत्या दासटणे मिळाले आहेत  ही सर्व माहिती तपासावी लागते. 


त्यानंतर जमीत कोणता झोन वगैरे तर नाही ना ? नगर रचना विभाग (Town Planning) चे कागदपत्रे जसे मंजूर नकाशा. नकाशा कोणत्या कारणासाठी मंजूर आहे जसे Residential का Commercial साठी मंजूर आहे हे तपासवे. 


 जर मिळकतीच्या जवळ पास विमानतळ, आर्मी कॅम्प वगैरे काही असेल तर मिळकतीत काही झोन वगैरे तर नाही ना ? हे तपासून बघावे लागते. त्यासाठी संबधित विभागाची NOC आहे ना ? हे तपासून बघावे लागते. 


त्यानंतर मिळकतीचा मोजणी नकाशा व ले आऊट (अंतिम मंजूर आराखडा) तपासून बघवा लागतो. त्यामुळे मिळकतीच्या चतु:सीमा समजतात. मिळकतीच्या आजू बाजू कोण आहे ते समजते. मिळकतीस रास्ता कोणता. प्लॉट चा नेमका आकार कसा आहे. क्षेत्र काय आहे ? हे सर्व  Lay Our बघून समजते. 


मिळकतीचे कागदपत्रे जसे 1) Commencement Certificate, 2) Building Permission, Plan  3) Completion Certificate, 4)  Layout Of land,  5) Building Floor Plan, / Plan Blue Print. हे सर्व कागदपत्रे तपासून बघावे लागतात. तसेच वेळो वेळी चे कागदपत्रे, परवानगी बाबतचे कागदपत्रे तपासवे लागतात. संस्थे कडून प्लॉट घेतलेला असेल तर त्याचे Allotment letter तपासून बघावे. 


जर फ्लॅट मिळकत असेल तर त्यांची संघटना तयार होऊन हाऊसिंग सोसायटी नोंदविली जाते. त्याचे शेअर सर्टिफिकेट असते. ते तपासून बघावे. अपार्टमेंट कायद्याने गोषणापत्र, Deed Of Declaration, Apparent Deed हे कागदपत्रे तपासून बघावे लागतात. 


मिळकतीचे काही कागदपत्रे हे मूळ दस्त आहेत ते  आरिजिनल तपासून बघावे लागतात. जसे Title Deed चे कागदपत्रे. खरेदीखत. किवा मिळकत ज्या दस्ताने हस्तांतर झालेली आहे ते जास्त. जसे मृत्यू पत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड जे काही जास्त असतील ते मूळ दस्त तपासून बघावेत. कारण जर हे मूळ दस्त उपलब्ध नसतील तर याचा असा देखील अर्थ होऊ शकतो की ते गहाण देऊन कर्ज तर घेतलेले नाही ना ? ते कोणाकडे गहाण तर नाहीत ना ? त्यामुळे हे मूळ दस्त बघणे गरजेचे असते. सर्व नोंदणी झालेल्या व्यवहारांची तपासून घेऊन शहानिशा करावी लागते. 


कधी कधी असे होऊ शकते की मूळ मालका कडून मूळ दस्त हरवलेले आहेत त्या वेळी मालकाने ते कागदपत्रे सापडविण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे व पोलिस तक्रार देणे गरजेचे आहे. त्यानंतर जाहीर  पेपर नोटीस द्यावी लागते. कारण त्यावर कोणाची काही हरकत असेल तर ती येऊ शकते.  ही सर्व पूर्तता करावी लागते. कारण ही सर्व पूर्तता केल्याने जी बँक मिळकत गहाण ठेवणार आहे किवा जो कोणी ती मिळकत विकत घेत आहे. ते खरे आहेत आहेत (Bonafide) आहेत हा असतो. त्यामुळे भविषात काही अडचण निर्माण झाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. व कायद्याने देखील या सर्व गोष्टी करणे महत्वाचे आहे. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.


Click Here To View Post

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads