जमीन भूधारणा पद्धती - भोगवटादार वर्ग - १ व वर्ग - २ जमीन म्हणजे काय असते ?

Adv.Saurabh Rajput
0

 



भोगवटादार वर्ग -1   वर्ग - 2  जमीन म्हणजे काय ? 

आज आपण माहिती बघू  भोगवटादार वर्ग -1  व वर्ग - 2  जमीन म्हणजे काय ?


  कोणतीही शेतजमीन ही दोन प्रकारची असते. एक असते भोगवटादार वर्ग -1 व  दुसरी असते भोगवटादार वर्ग - 2 जमीन.  इंग्रजी मध्ये याला Class I Land आणि Class II Land असे म्हणतात. ही जमीन धारणा पद्धत असते. 


आधी आपण बघू वर्ग - 2 जमीन म्हणजे काय ? 


पूर्वी च्या काळी इनाम किवा वतन म्हणून जमिनी दिल्या जात होत्या. पूर्वी एखादी कामाचा मोबदला म्हणून देखील अशा पद्धतीने जमिनी दिल्या जात होत्या. काही शेतकर्‍यांना कुळ वहिवाट कायद्याने जमिनी दिल्या गेल्यात आहेत. तसेच पुनर्वसन कायद्या अंतर्गत देखील जमिनी दिल्या गेलेल्या आहेत. या सर्व जमिनी भोगवटादार वर्ग - 2  मध्ये येतात. 


भोगवटादार वर्ग - 2 म्हणजे शासनाकडून काही विशेष कारणाने जमिनीच्या भोगवटाचे अधिकार दिले गेलेले असतात. म्हणून अशा जमिनी   विक्री किवा हस्तांतर करण्यासाठी शासनाची म्हणजेच संबधित महसूल खात्या कडून परवानगी घ्यावी लागते. आदिवासी यांची जमीन असेल तर त्यासाठी महसूल विभागातील विभागी आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागते. 


भोगवटादार वर्ग - 2 जमिनी या शासनाच्या मालकीच्या असतात परंतु शासनाने त्या जमिनी शेतकरी यांना वाटप करून दिलेल्या असतात. शासनाची पूर्व परवानगी न घेता या जमिनी  विक्री किवा हस्तांतर करता येत नाहीत. या जमिनी हस्तांतर करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते व त्यासाठी काही नजराण्याची रक्कम भरावी लागते. आणि संबधित महसूल खात्याकडून जमीन हस्तांतर करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर ती जमीन वर्ग - 1 मध्ये हस्तांनातर होऊ शकते किवा विक्री होऊ शकते. 


महामार्ग किवा कोणत्याही शासकीय प्रकल्पा साठी वर्ग - 2 जमीन हस्तांतर होत असेल तरी देखील खरेदी देतांना शासकीय परवानगी घेणे गरजेचे आहे. 


महाराष्ट्रा मधील जर कोणत्याही सरकारी प्रकल्पा साठी जमीन संपादन होणार असेल व ती जमीन वर्ग - 2 असेल किवा आदिवासी यांची असेल तर तर त्यांनी त्या जमिनीच्या संपादना बाबतचे नियम प्रशासनाकडून माहीत करून घ्यावे. 


जमीन वर्ग - 1 आहे की वर्ग - 2 आहे हे आपल्याला जमिनीचा 7/12 उतारा बघून समजून जाईल. 7/12 उतार्‍यावर वरच्या बाजूस जमिनीचा प्रकार म्हणजे जमीन वर्ग - 1 आहे का वर्ग - 2 आहे हे लिहिलेले असते.


जमीन जर वर्ग - 1 प्रकारची असेल तर ती जमीन हस्तांतर करणेसाठी शासनाची कोणतीही परवानगी घेणे गरजेचे नसते. फक्त ती जमीन विक्री करणेसाठी एखादी वेळेस शासनाच्या विभागाची NOC घ्यावी लागू शकते. म्हणजे ती जमीन महामार्गा लागत असेल तर म्हणजे सदर जमीन संपादन वगैरे नाही किवा होणार नाही यासाठी.  कोणतीही जमीन विक्री घेणे आधी हे बघून घेणे महत्वाचे असते की, ती जमीन भुधरणा पद्धती कोणती आहे. वर्ग - 1 आहे की वर्ग - 2 आहे. 


इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-


महसूल न्यायाधिकरण


महसूल अपील


महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी


मामलतदार कोर्ट अ‍ॅक्ट


वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..


स्थावर मिळकतीची वाटणी


Click Above To See Blog Post 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads