जमिनीची शासकीय मोजणी कशी केली जाते ?

Adv.Saurabh Rajput
0


 जमिनीची शासकीय मोजणी कशी केली जाते ? 



प्रथम आपण बघू जमीन मोजणीची आवश्यकता का असते : -


   1)  जेवढी जमीन आपल्या मालकीची आहे तेवढी सर्व जमीन आपल्या ताब्यात आहे की नाही हे बघण्यासाठी. 


2) वडीलोपार्जित जमिनीत, वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीत किंवा विक्रीने तसेच अन्य मार्गाने हस्तांतरित होऊन मिळालेल्या जमिनीत हिस्से पडले असतील तर आपल्या वाट्याला आलेली जमीन ही रेकॉर्ड प्रमाणे प्रत्यक्ष ताब्यात आहे किंवा नाही हे बघण्यासाठी जमिनीची मोजणी करावी लागत असते. 


3) जमिनीची वाटणी झालेली नसेल तरी प्रत्यक्ष वहीवाटीतील जे हिस्से आहेत ते योग्य प्रमाणात आहे किवा नाही हे तपासून बघण्यासाठी देखील जमिनीची मोजणी करावी लागत असते. 


4)  शेतजमिनीतील एकत्रित बांध निश्चित होण्यासाठी. 


5) काही शेती बिगरशेती (N.A) करून घेण्याठी व त्यांचे एकत्रित बांध निश्चित होण्यासाठी जमिनीची मोजणी करावी लागत असते. 


6)  खातेफोड करून वाटणी करून घेण्यासाठी जमिनीची मोजणी करावी लागू शकते.    


8) एखादी जमीन खरेदी किवा विक्री केल्यास. खरेदीचे क्षेत्र निश्चित करून घेण्यासाठी मोजणी करावी लागू शकते. 


9) गावातील शिव, गायरान, रस्ते, सार्वजनिक ठिकाणची जमीनीवर अतिक्रमण झालेले असल्यास मोजणी करावी लागू शकते. 


10) वहीवटी मध्ये बदल झाला असेल किवा बांध सरकले गेले असतील तरी क्षेत्र निश्चित करण्यासाठी मोजणी करावी लागू शकते. 


जमीन मोजणीची प्रक्रिया : -


जमिनीची शासकीय मोजणी ही भूमी अभिलेख विभागा मार्फत केली जात असते. हे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी असते. जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीचा अर्ज दाखल करावा लागतो. 


अर्जात अर्जदारांचे संपूर्ण नाव व पत्ते तसेच  जमिनीचे वर्णन,  शेताच्या चतु:सीमा व गटाच्या चतु:सीमा नमूद कराव्या लागतात. अर्जात अर्जदारची तसेच  सहहिस्सेदार  व लगत मिळकतीचे मालक यांची माहिती असते. जसे नाव, पत्ते व  लगतच्या जमिनीचा पूर्ण तपशील नमूद करावा लागतो.  मोजणीचे कारण नमूद करावे लागते. मोजणी प्रकार जसे हद्द काम मोजणी आहे ? की वहीवाटी प्रमाणे क्षेत्र दर्शविण्यसाठी मोजणी  आहे ?  की अतिक्रमण मोजणी नकाशात दर्शवीनेसाठी आहे ?  का  पोट हिस्सा मोजणी आहे ? याची माहिती अर्जात नमूद करावी लागते. ज्या जमिनीची मोजणी करणे आहे तिचे वर्णन व शेताच्या चतु:सीमा व गटाच्या चतु:सीमा नमूद कराव्या लागतात.  मोजणीचा प्रकार जसे साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी जो काही मोजणीचा प्रकार असेल तो नमूद करावा लागते. हद्दी बद्दल किवा वहिवाटी बद्दल काय वाद असतेल तर ते  नमूद करावे लागते.  शेवटी अर्जावर दिनांक टाकून सर्व अर्जदारच्या सह्या किवा अंगठे लागतात.   मोजणी ची रक्कम चलन ने बँकेत भरल्या बाबत  त्याची पावती जोडावी लागते.  


  मोजणी प्रकारा नुसार मोजणीची जी  फी (चलन) भरावे  लगत असते. ते मोजणी प्रकारा नुसार किती फी लागेल याची माहिती आपल्याला भूमी अभिलेख यांचे सांकेतिक स्थळावरुन (वेबसाइट) वरुन, जमिनीची माहिती व मोजणी प्रकार तेथे नमूद करून समजू शकते. त्यानुसार विहित मोजणीची फी (चलन) भरावे लागते. 

मोजणी फी

Click Here To See  



आता आपण बघू अर्जसोबत काय काय कागदपत्रे जोडावे लागतात. 


  मोजणी अर्जासोबत विविध  कागदपत्रे दाखल करावे लागत असतात जसे, अर्जसोबत जी जमीन  मोजायची आहे तिचे मालक कोण कोण आहेत ? मोजणीचे क्षेत्र किती आहे ? यासाठी त्या मिळकतीचा चालू महिन्यातील डिजिटल किवा सही शिक्याचा  7/12 उतारा जोडावा. लागत च्या सर्व कब्जेदारांचे चालूचे  7/12 उतारे जोडवे.  अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडावी.  मोजणी प्रकारा नुसार जसे साधी मोजणी आहे का तातडीची मोजणी आहे. का अतितातडीची मोजणी आहे यानुसार त्याची लागणारी फी ची भरलेल्या चलना ची  पावती सोबत जोडावे लागते. जी जमीन मोजणी करणे आहे तिचा कच्चा नकाशा असेल तर तो सोबत जोडवा. गाव नकाशा हा ऑनलाइन देखील काढता येत असतो. 


अर्ज दाखल झाल्यानंनातर त्या अर्जाला कार्यालयामर्फत मोजणी क्रमांक दिला जातो. त्यानंतर त्या जमिनी बद्दल त्या कार्यालयात जे मूळ Records उपलब्ध आहेत जसे टिपण, फाळणी, नकाशे, जमीन एकत्रीकरण झालेली असेल तर त्याबाबत दस्त हे सर्व दस्त तपासून बघितले जातात व आवश्यक असलेले दस्त मोजणी अर्जा सोबत लावले जातात. मोजणी ही मूळ अभिलेख (रेकॉर्ड) च्या आधारे केली जात असते.  त्यानंतर हे सर्व प्रकरण मोजणी करणार्‍या भूकर मापकाकडे म्हणजेच सर्वेयर कडे दिले जात असते. 


मोजणी साठी प्राप्त झालेल्या अर्जा मध्ये  नमूद असलेल्या लगतच्या कब्जेधारक यांना व अर्जदार  यांना मोजणीची नोटीस पाठवली जाते. ही नोटीस किमान 15 दिवस अगोदर रजिष्टर पोस्टाने पाठवली जाते.  आणि त्यानुसार मोजणीची तारीख कळवली जाते. 


साधारणत: जून ते ऑगस्ट या महिन्यात मोजणीचे काम होत नाही कारण हे दिवस पावसाचे असतात. जमिनीवर चिखल असल्याने व शेकर्‍यांचे शेतात काम चालू असल्याने मोजणीसाठी अडचणी येत असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो मोजणीचे कामे होत नाही.  या कालावधी मध्ये या विभागाचे मोजणी व्यतिरिक्त  कार्यालयातील इतर कामे चालू असतात. जसे record बाबत वगैरे. इतर कलावधीत मोजणीचे कामे सर्वेयर मार्फत केले जातात. 


प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी मोजणी करण्यासाठी मोजणीदार,  सर्वेयर, त्यासाठी लागणारे मजूर त्यांचे मोजणी साहित्य घेऊन हजर राहतात. मोजणीसाठी लागणारा  चुना, हद्दीचे दगड, निशाणी हे सर्व अर्जदारला स्वता:ला त्याच्या स्व:खर्चाने आणावायचे असते. 


आजकालच्या सर्व मोजण्या या प्लेन टेबल व Electronic Total Station (ETS) या आधुनिक उपकरणाद्वारे केल्या जातात. प्रत्यक्ष मोजणीची लंबी रुंदी व बांधाचे माप न घेता प्लेन टेबल पद्धतीने मोजणी धारकला मोजणी नकाशा हा तंतोतंत वस्तुस्थिती नुसार तयार करून देण्यात येतो. जमीन वर खाली, ओबडधोबड, नाल्याची असली तरी जमिनीचे निश्चित आकारमान काढले जाते. 

Electronic Total Station (ETS) मोजणी चे उपकरण 

जमीन मोजणी करणारे सर्वेयर हे सर्वात आधी मोजणी करण्या अगोदर जमिनीची पाहणी करतात. प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे ? जुने मोजणीचे खुने वगैरे याबाबत माहितीत घेतात.  अर्जदारस व लगत धारक, उपस्थितांना या बाबत विचारणा करतात.  प्रत्यक्ष वहीवटीप्रमाणे हद्द लक्षात यावी म्हणून खुणा ठेवल्या जातात. 


मोजणी च्या वेळी अनेक वेळा जो शेतकरी अर्ज दाखल करतो त्याच्या लगतचे शेतकरी हे मोजणी वेळी उपस्थित राहत नाहीत. एखादी वेळेस अतिक्रम झाले असेल तर संबधित व्यक्ती ही मोजणी वेळी मुद्दाम उपस्थतीत राहत नाही. एखादी व्यक्ती मोजणी च्या वेळी गैरहजर राहिली तर त्याच्या अनउपस्थित मोजणी करता येते. तथापि, मोजणी करण्या अगोदर त्याला नोटीस पाठवली गेलेली पाहिजेल. त्यांनी ती नोटीस घेणेस नकार दिलेला असेल तरी मोजणी केली जात असते. 


मोजणी होते वेळी प्लेन टेबल वर मोजणीच्या खुणा होत असतात. झालेली मोजणी ही आधीच्या मूळ रेकॉर्ड सोबत पडताळून बघितली जाते. जमिनीची मोजणी झाली की लगेच हद्दीच्या खुणा करून घेणे महत्वाचे आहे. मोजणी झाल्यावर अर्जदार व संबधितांच्या सह्या देखील घेतल्या जातात. एखादी व्यक्तीने जबाब न दिल्यास त्याने जबाब नाही दिला असा पंचनामा केला जातो. 


अशा प्रकारे जमिनीची मोजणी केली जाते. जमिनीच्या मोजणी प्रमाणे प्रत्यक्ष हद्द दाखविल्या जातात.  त्यांनातर मोजणी नकाशाच्या दोन प्रती तयार केल्या जातात. हे मोजणी शिट असते. यालाच मोजणीची "क" प्रत असे देखील म्हणतात. यावर अर्जदारचे नाव असते. मिळकतीचे वर्णन नमूद असते. मोजणीचे कारण नमूद असते. मोजणीचा नकाशा असतो.  सर्वेयर चे नाव. आजू बाजू च्या दिशा दाखविल्या जातात. दिनांक, तसेच नकाशाचे स्केल व सही शिक्का असतो. अजून काही महत्वाचा तपशील असेल तर तो लिहिला जात असतो. जर वहीवाटी ची हद्द आणि रेषे प्रमाणे येणारी हद्द मोजणी प्रमाणे वेगवेगळी असेल तर अशी वहीवतीची हद्द नकाशात तुटक पद्धतीने दाखविली जाते. रेकॉर्ड प्रमाणे येणारी हद्द ही सरळ रेषेने दाखलविली जाते. या मध्ये अतिक्रमणाचे क्षेत्र हे एखादी विशिष्ट रंगाने दाखवले जाऊ शकते.


अशा प्रकारे मोजणी अर्ज दाखल झाल्यावर त्याची सर्व कारवाई होऊन मोजणी केली जाते आणि अर्जदारचा अर्ज निकाली काढला जातो. त्यार अर्जदारस मोजणी नकाशाची एक प्रत दिली जाते. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


मोजणीची "क" प्रत म्हणजे काय


मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार


मोजणी अर्जाचा नमूना :

Click Above To See Blog Post 


मोजणी अर्जाचा नमूना : आपण इथून मोजणी अर्ज डाऊनलोड  करू शकतात. 

---------------------------------------

---------------------------------------


आता आपण बघू...

 मोजणी बाबत आपणास अधिक माहिती व्हावी यासाठी पुढील गोष्टी  लक्षात घेणे गरजेचे आहे. 


*१ हेक्टर = १०००० चौ. मी.*

*१ एकर = ४० गुंठे.*

*१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट*

*१ हेक्टर = २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे*

*१ आर = १ गुंठा*

*१ हेक्टर = १०० आर*

*१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट*

*१ चौ. मी. = १०.७६ चौ फुट*

---------------------------------

---------------------------------

1 फुट = 12 इंच, 

1 इंच = 2.54 सेंटीमीटर 

1 सेंटीमीटर =  10 मिली मीटर. 

---------------------------------

---------------------------------

आपण जेव्हा शेतजमिनीची व प्लॉटची मोजणी,  वाटणी किवा विक्री तसेच सौदापावती  करत असतो त्यावेळी आपल्याला या वरील गोष्टी ची माहिती हवी. ही माहिती तुम्हाला असल्यास तुम्हाला हे कामकाज करणे सोपे जाईल व चूक होणार नाही.  

---------------------------------

---------------------------------


चौरस मीटर मधील क्षेत्र चौरस फुटा मध्ये कसे रूपांतर करतात. ? 

चौरस मीटर मधील असलेली क्षेत्र चौरस फुटा मध्ये रूपांतर करणे साठी सोपी पद्धत आहे. 

1  मीटर = 3.28 फुट 

1 चौरस मीटर = 10.76 चौरस फुट. 

चौरस मीटर चे चौरस फुट काढण्यासाठी चौरस मीटर सख्येला [10.76] ने गुणवे. 

उदा. आपल्या ला जर 65 चौरस मीटर चे जर चौरस फुट मध्ये रूपांतर करायचे असेल तर 65 X 10.76 = 699.4 चौरस फुट. 

---------------------------------

---------------------------------


चौरस फुटामधील क्षेत्र चौरस मीटर मध्ये करणे 

आपल्याला  चौरस फुटचे जर चौरस मीटर मध्ये रूपांतर करावयाचे असेल तर त्या संखेला 10.76 ने भाग द्यावा. त्यासाठी आपण पुढील उदाहरण बघू. 

उदा. 1000 चौरस फुट = 100 / 10.76 = 92.93 चौरस मीटर. 

---------------------------------

---------------------------------


एकादी शेत किवा प्लॉट  मिळकत आपल्याला माहिती म्हणून स्वता: हून टेप ने मोजणी करून घेणे असेल तर ती मोजणी कशी करावी याची माहिती आपण बघू . 

(मोजणीचे क्षेत्र जास्त मोठे नसेल तर आपण या पद्धतीने स्वता:हून खात्री करून घेणे साठी मोजणी करून बघू शकतात.)

 

प्रथम आपण मोजणीचे  क्षेत्र हे टेप द्वारे फुट मध्ये लंबी व रुंदी मोजून घ्यावी. त्यानंतर आपल्याला त्या जागेचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल. जर  मोजणी क्षेत्राचा आकार हा आयताकार असेल व प्लॉट ची किवा जमिनीची दोन्ही बाजूची लंबी व दोन्ही बाजूची रुंदी  समान असेल तर. आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे लंबी X रुंदी = क्षेत्रफळ. 


आता आपल्याला आपण टेप ने मोजणी केलेले क्षेत्र हे लंबी X रुंदी करावे लागेल = आपल्याला प्लॉट चे किंवा जमिनीचे एकूण किती क्षेत्रफळ आहे हे या पद्धतीने मोजणी केल्याने समजून जाईल. 


(जर आपण प्लॉट ची मोजणी करत असाल तर प्रथम त्या प्लॉट चा लेआऊट बघून घ्यावा कारण त्यामुळे तुम्हाला त्या प्लॉटचा नेमका आकार किती आहे.  त्याची लंबी व रुंदी किती आहे हे  समजून जाईल. तसेच प्लॉट चा रस्ता कोणत्या बाजूने आहे हे समजेल. इतर लागत प्लॉट चे क्षेत्र किती आहे हे देखील समजण्यास मदत होईल. बाजूला कोणते प्लॉट आहेत व प्लॉट च्या चतु:सीमा देखील समजतील.  त्यामुळे  त्या प्लॉट ची मोजणी करणे सोपे जाईल. शेताची मोजणी करणे असेल तर उतार्‍यावरील क्षेत्र निट बघून घावे. गाव नकाशा बघून घ्यावा. ती प्रत आपल्याला ऑनलाइन देखील मिळू शकते. जुना मोजणी नकाशा असेल तर तो बघून घ्यावा.) 


शेतजमिनी चे क्षेत्र हे आपण फुटात मोजले असेल तर त्याला आता आपल्याला एकर मध्ये करून घावे लागेल. ( कोणते ही क्षेत्राचे रूपांतर करणेसाठी तुम्ही सूत्राचा वापर करू शकतात व त्यामध्ये किमती टाकून क्षेत्राचे रूपांतर करू शकतात. किवा जास्त वेळ नसेल तर ऑनलाइन गूगल ची मदत घेऊ शकतात. 


1 एकर = 43560 चौरस फुट. 


लंबी X रुंदी = ---------- / (भगिले) 43560 केले तर आपले फुटा मधील  क्षेत्र हे  एकर मध्ये रूपांतर होऊन जाईल. 


---------------------------------------

---------------------------------------


आता आपण बघू जर प्लॉट किवा शेत जमीनी चे चारही दिशेचे क्षेत्र जर  समान नसेल तर त्याची मोजणी करून क्षेत्र कसे काढावे. जर प्लॉट किवा शेत जमिनीचे चारही बाजूचे क्षेत्र समान नसेल तर मोजणी करून क्षेत्र काढणे ही एक थोडी आव्हघड गोष्ट आहे. परंतु त्या बाबत आपण ठोक्यात माहिती बघू. 


अशा वेळेस चारही बाजूचे क्षेत्र हे मोजून घ्यावे लागते. त्यानंतर एक बाजूची लंबी आणि दुयर्‍या बाजूची लंबी याची बेरीज करून आणि त्याला 2 ने भाग देऊन सरासरी लंबी व सरासरी रुंदी काढून घ्यावी लागते. 


त्यानंनंतर त्या मोजणी केलेल्या जागेचे आपल्याला एकूण क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल त्यासाठी लंबी X रुंदी = एकूण क्षेत्रफळ निघेल. आता आपल्याला त्या क्षेत्राचे समान दोन भाग करणे असतील तर त्याला 2 ने भाग द्यावा. किवा जितके भाग करणे असतील त्या संखेने आपण त्याला भाग देऊ शकतो.  


( जेव्हा दोघी बाजूंची लंबी आणि रुंदी समान नसेल तेव्हा ते क्षेत्र मोजणे  व क्षेत्रफळ काढणे  थोडे कठीण काम असते. तसेच त्याची वाटणी देखील करणे कठीण काम असते. त्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप पुन्हा पुन्हा करून बघून  खात्री करून घ्यावी लागते. त्याची थोडी अवघड पद्धतात आहे. मी वरील दिलेल्या माहितीने तुम्हाला फक्त अंदाज येईल की मोजणी कशी केली जाते व प्लॉट ची विभागणी कशी केली जाते. वरील माहिती मी फक्त तुम्हाला माहिती साठी दिलेली आहे. तुम्हाला त्यामुळे एक अंदाजित माहिती मिळेल. तुम्हाला जरी खाजगी किवा कोणतीही मोजणी करणे असेल तर तुम्हाला त्यामधील तज्ञ माणूस लागेल.)


जमिनीचा जसा आकार असेल त्याप्रमाणे गणितीय सूत्राचा वापर आपल्याला क्षेत्रफळ काढणेसाठी करावा लागेल. जसे त्रिकोणी प्लॉट असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्राचा वापर आपल्याला करावा लागेल. प्लॉट आयत व त्रिकोणाकर असेल तर आयताचे क्षेत्रफळ काढून मग आपण त्रिकोणी भागाचे काढू शकतो. 


( स्वतहून मोजणी करणे आणि क्षेत्रफळ काढणे बाबत माहिती मी तुम्हाला फक्त मोजणी बाबत माहीती व्हावी म्हणून दिलेली आहे. परंतु तुम्हाला काही कायदेशीर कामासाठी मोजणी करणे असेल तर तुम्हाला सरकारी मोजणीच करावी लागेल. तसेच जमिनीची  खाजगी जरी मोजणी करणे असेल तर ती तज्ञ इसमकडून करून घ्यावी. कारण जे या क्षेत्रातील  तज्ञ असतात त्यांना याची संपूर्ण माहिती व अनुभव असतो. ते आपले मोजणीचे काम अचूक पद्धतीने करून देऊ शकतात.) 


इतर ब्लॉग पोस्ट :-


मोजणीची "क" प्रत म्हणजे काय


जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार


मोजणी अर्जाचा नमूना :


इतर ब्लॉग पोस्ट :-


मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.


Click Here To View Post

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads