जमिनीची शासकीय मोजणी
बर्याच वेळा जमिनीची शासकीय मोजणी करावी लागते. याचे अनेक करणे आहेत ज्यामुळे जमिनीची शासकीय मोजणी करावी लागू शकते. जसे की, प्रत्यक्ष जमीन कमी भरणे, वाटणी मध्ये 7/12 उतार्यावरील क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्र भरणे. शेजारील शेतकर्यांकडून बांध कोरून अतिक्रमण केले जाने. नवीन शेतजमीन किवा प्लॉट विकत घेते वेळी मोजणी करावी लागू शकते. अशा अनेक करणांनासाठी जमिनीची शासकीय मोजणी करावी लागत असते. जमिनीचे मोजणीचे काम हे भूमी अभिलेख कार्यालया मार्फत केले जाते. भूमी अभिलेख कार्यालय हे तालुक्याच्या ठिकाणी असते.
जमीन मोजणीचा इतिहास : -
भारतात जमीनिंची सर्वात आधी मोजणी ही ब्रिटिश काळात करण्यात आलेली आहे. जमिनीच्या मोजणी सोबतच नदी, नाले, डोंगर, दर्या यांची नोंद व समुद्र सपाटी पासून ऊंची मोजण्यात आली व त्याचे रेकॉर्ड, अभिलेख देखील तयार करण्यात आहे.
ब्रिटिश काळात जेव्हा जमीन मोजण्यास सुरवात झाली. जमिनीची शास्त्र शुद्ध पद्धतीने मोजणी ही गुंठर या ब्रिटिश अधिकार्याने अमलात आणली. या अधिकार्याने शंखू साखळीचा उपयोग जमीन मोजणी साठी केला. शंखू साखळी ही साधारणत: 33 फुट लांब व 16 भागात विभागलेली असते. प्रत्येक भागाला आणा असे म्हटले जात होते. गुंठर या ब्रिटिश अधिकार्याच्या नावावरून गुंठे हे नाव पडलेले आहे. त्यामुळे जमीन मोजणीच्या एकका बाबत हा शब्द प्रचलित झालेला आहे. शंखू साखळी पद्धतीला गुंठर चेन असे देखील म्हटले जाऊ लागले.
40 गुंठ्याच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर त्या काळापासूनच म्हटले जाऊ लागले.
त्यानंतर पुढील जमीन मोजणीची पद्धत आहे प्लेन टेबल मोजणी पद्धत. शंखू पद्धती नंतर प्लेन टेबल पद्धतीने जमिनीची मोजणी केली जाऊ लागली. या पद्धतीने मोजणी करण्यास थोडा जास्त कालावधी लागत असतो. तसेच प्लेन टेबल हा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी उचलून न्यावा लागत असतो. उंच सखल जमिनीचा भाग किवा उंच झाडे अथवा गवत असेल तर या पद्धतीने मोजणी कण्यास अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळे या पद्धतीने जमीन मोजणीचा कालावधी जास्त लागत असतो.
त्यानंतर पुढील जमीन मोजणीची पद्धत आहे ई.टी.एस. मशीन.
![]() |
आता आपण बघू जमीन मोजणी साठी आताची असलेली सर्वात आधुनिक पद्धत. ती पद्धत आहे रोअर मशीन : -
हे उपकरण जमीन मोजणीचे आता पर्यन्त चे सर्वात आधुनिक उपकरण आहे. या उपकरणा मुळे जमीन मोजणीची अचूकता देखील वाढलेली आहे. रोअर हे GPS या तंत्रज्ञानावर आधारित आल्याने मोजणी ही उपग्रहाच्या मदतीने होत असते. ज्या ठिकाणी या उपकरणा द्वारे मोजणी करणे आहे तेथील आकाश हे मोकळे असावे लागते कारण उपग्रहणे सिग्नल या यंत्राला भेटल असतात आणि मोजणी ही होत असते. झाडे, खाली वर जागा, गावत अशी कोणतीही बाधा या यंत्राने मोजणी करतांना येत नाही. 2 हेक्टर पर्यन्त ची मोजणी हे उपकरण अर्धा तासात पूर्ण करू शकते. या उपकरणामुळे मोजणीच्या कामाला गती प्राप्त झालेली आहे. या उपकरणाचा अजून एक फायदा आहे की मोजणी केल्यानंतर जर कोणी मोजणीच्या खुणा काढून टाकल्यात किवा काही कारणाने नष्ट झाल्या. तरी या यंत्राने केलेल्या खुणा या GPS द्वारे परत दिसत असतात. कारण या खुणा अक्षांश आणि रेखांश ने अचूक घेतलेल्या आसतात. त्यामुळे पूर्वीच्या असलेल्या खुणा त्याच ठिकाणी पुन्हा दाखविता येतात. तसेच कोणी बांध जारी कोरला तरी GPS द्वारे ते दिसू शकते.
आपल्या देशात बर्याच ठिकाणी या उपकरणाचा वापर सुरू झालेला आहे. भविषात सर्वच ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयात या उपकरणाचा वापर लवकरच सुरू केला जाणार आहे.
इतर ब्लॉग पोस्ट :-
![]() |
Click Above To See Blog Post |
डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?
स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.
नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.
ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.
![]() |
Click Here To View Post |
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.
शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?
फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.
![]() |
Click Here To View Post |
इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-
महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी
वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..
![]() |
Click Above To See Blog Post |