मोजणीची "क" प्रत म्हणजे काय असते ?

Adv.Saurabh Rajput
0

 


आज आपण माहिती बघू मोजणीची "क" प्रत म्हणजे काय असते ?  


आपण जेव्हा केव्हा  जमिनीची सरकारी मोजणी करतो तेव्हा  मोजणी झाल्यावर  जमिनीच्या ज्या काही हद्द व  सीमा आहेत त्या निश्चित करून घ्याव्या लागतात. जमीन कुठे आहे ?  जमिनीचे क्षेत्र किती आहे ?  हे संबधित शासकीय अधिकारी यांचेकडून निश्चित करून घेणे. त्याबाबतचा दाखला म्हणजे मोजणीची क प्रत असते.  क प्रत म्हणजे जमिनीची हद्द निश्चित करून देणारा कागद असतो. जमिनीची सरकारी मोजणी झाली की आपल्याला त्या बाबत क प्रत भेटत असते. क प्रत म्हणजे ही मोजणी शिट असते. 


 आपण जेव्हा एखादी प्लॉट किवा शेतजमीन विकत घेतो तेव्हा त्या जमिनीचे अनेक कागदपत्रे तपासून घेत असतो. जसे 7/12 उतारा, जुने फेरफार, जुने खरेदीखत, जुने मालकी हक्काचे कागदपत्रे हे सर्व कागदपत्रे तपासत असतांना जमिनीची क प्रत देखील  तपासून बघणे महत्वाचे आहे. कारण हा देखील  एक महत्वाचा कागद आहे. 


आपण जमीन विकत घेतांना क प्रत बघितली तर त्यामुळे आपल्याला जमिनीच्या हद्दी समजतात. आपल्याला समजते की, जेव्हढी जमीन कागदावर आहे तेव्हढीच जमीन आपल्याला मिळते आहे ना. त्यामुळे आपल्याला मिळकतीचा ताबा घेणे देखील सोयीचे होते. त्यासाठी  क प्रत ही महत्वाची आहे. 


जर एखादी मोठ्या गटातील आपण शेतजमीन विकत घेत असू तर या दस्तामुळे गटात नेमकी जमीन कुठे आहे हे  आपणास समजण्यास मदत होत असते. 


त्यामुळे कोणतीही जमीन विकत घेण्यापूर्वी त्या जमिनीची शासकीय मोजणी करून घ्यायची आणि जमिनीची क प्रत घेऊन घ्यावी. 


गट जर मोठा असेल तर त्या गटात आपले नेमके क्षेत्र कुठे आहे हे आपल्याला माहीत नसेल व त्या गटातील लोक देखील भांडण करत असतील त्या मुळे क प्रत दस्त असेल तर गटात जमिन नेमकी कुठे आहे हे समजण्यास मदत होईल.


हा दस्त जमिनीची सीमा निश्चित करून देतो आणि हद्द कायम करून देत असतो. याला क प्रत असे म्हणतात.  


जमिनीची शासकीय मोजणी केल्यावर जागेवर आपल्याला जमिनीच्या खुणा दाखविल्या जातात. मोजणी केल्याबाबत त्याच्या दोन प्रती तयार केल्या जातात. अ प्रत ही जागेवर तयार केली जाते. ब प्रत ही भूमी अभिलेख कार्यालयात तयार केली जाते.  ब प्रती वरुन क प्रत तयार केली जाते व ती आपल्याला दिली जाते. त्यासाठी विहित केलेली फी भरावी लागू शकते. 


 क प्रत शिट वर मोजणी बद्दल माहिती दिलेली असते. त्यावरून जमिनीची जी मोजणी झालेली आहे त्याची माहिती मिळत असते. 


क प्रत मोजणी शिट वर जमिनीचा मोजणीचा नकाशा असतो. मापे असतातत, ते आपण पट्टीने देखील मोजून बघू शकतो. 


मोजणी शिट वर सर्वात वरती लिहिलेले असते मोजणी चे कारण. म्हणजे अर्जदारणे मोजणी कशासाठी केलेली आहे. त्याचे कारण पुर्णपणे स्पष्ट लिहिलेले असते. मोजणी अर्ज तारीख असते. मिळकतीचे वर्णन असते. 


   त्यानंतर उजव्या बाजूला वर नगर भुमपन कार्यालय, तालुका, जिल्हा ही माहिती दिलेली असते. त्यानंतर आपण मोजणी कोणती केलेली आहे. साधी केलेली आहे का तातडीची, अती तातडीची केलेली आहे या मोजणी प्रकाराची माहिती दिलेली असते. 


मोजणी कोणती आहे पोट हिस्सा, का गटाची मोजणी आहे याबाबत माहिती दिलेली असते. 


त्यानंतर मोजणी नंबर दिलेला असतो. मोजणी दिनांक दिलेली असते. मोजणी समय हजर अर्जदार त्यांचे नाव असते.  त्यानंतर समजुतीच्या टिपा दिलेल्या असतात. नकाशा वाचता यावा यासाठी ही माहिती दिलेली असते. नकशितील विविध रेषा या बाबत माहिती दिलेली असते. त्यामुळे आपल्याला नकाशा समजण्यास मदत होत असते. 


 खाली मोजणी दिनांक, मोजणी करणार नाव व सही असते. ही माहिती असते. व मोजणीचा नकाशा या शिट वर असतो. 


इतर ब्लॉग पोस्ट :-
 



इतर ब्लॉग पोस्ट :-


मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.


Click Here To View Post

इतर ब्लॉग पोस्ट :-


जमिनीची शासकीय मोजणी


मोजणीची "क" प्रत म्हणजे काय


जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार


मोजणी अर्जाचा नमूना :






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads