8 "अ" उतारा म्हणजे काय व 8 "अ" उतारा ऑनलाइन कसा काढावा ?
आज आपण माहिती बघणार आहोत 8 "अ" उतारा म्हणजे काय व 8 "अ" उतारा ऑनलाइन कसा काढावा.
आपल्याला जमिनीचा 7/12 उतारा म्हणजे काय असतो हे तर आपल्याला माहित असेल, परंतु जमिनीचा 8 "अ" उतारा काय असतो हे बर्याच लोकांना माहीत नसते.
जमिनीच्या 7/12 उतार्या वरुन आपल्याला जमीन मालकाचे नाव, जमिनीचे एकूण क्षेत्र, जमीन कुठे आहे, जुन्या नोंदी, कर्ज बोजे असल्यास त्याची माहिती, तसेच पिके अश्या अनेक गोष्टींची माहिती मिळत असते.
8 "अ" उतार्या वरुण एकाच व्यक्तीची त्या गावात एकूण किती जमीन आहे ही माहिती एकाच ठिकाणी मिळत असते.
8 "अ" उतारा आपण ऑनलाइन देखील काढू शकतो. महसूल विभागणे बर्याच सेवा आता नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
आता आपण बघू 8 "अ" उतार्यावर काय काय माहिती असते.
8 "अ" उतार्यावर सर्वात वरती डाव्या कोपर्यात वर्ष असते.
उजव्या कोपर्यात तुम्ही ज्या दिवशी उतारा काढत आहेत ती तारीख दिसेल.
त्या नंतर खाली डाव्या बाजूला गावाचे नाव असते. मध्य भागी तालुका आणि उजव्या बाजूला जिल्ह्याचे नाव असते.
8 "अ" उतार्यात सात कॉलम असतात.
पहिलं कॉलम : -
गाव नमूना सहा मधील नोंद हा पहिलं रकाना असतो. त्यामध्ये खातेदारचा नोंद क्रमांक असतो. आणि क्षेत्र वैयक्तिक आहे का सामायिक आहे याची नोंदणी केलेली असते. त्यामुळे आपल्याला जमिनीची मालकी व्यक्तीगत आहे किवा सामायिक आहे हे कळते.
दूसरा कॉलम : -
या कॉलम किवा रकान्यात भुमपण क्रमांक आणि उपविभाग क्रमांक असतो. त्याच कॉलम मध्ये खातेदारचे नाव असते.
जर क्षेत्र सामायिक असेल तर सगळ्यांची नावे तेथे असतात.
या कॉलम मध्ये त्या व्यक्तीच्या नवे किती जमीन आणि कोठे कोठे आहे हे कळते.
तिसरा कॉलम : -
या कॉलम मध्ये त्या व्यक्तीच्या नावावर गावात एकूण किती क्षेत्र आहे हे आपल्याला कळते.
चौथा कॉलम : -
चौथा कॉलम हा आकारणी किवा जुडीचा असतो. या मध्ये प्रत्येक जमिनीवर किती कर लावलेला आहे हे आपल्याला कळते. हा कर रुपये आणि पैसे यात असतो. म्हणजे उदा. 10 रु. 55 पैसे.
पाचवा कॉलम : -
हा कॉलम दमला जमिनी वरील नुकसान असतो.
सहावा कॉलम : -
हा कॉलम दूमला जमिनी वरील नुकसान असतो. 6 (अ) मध्ये जिल्हा परिषदेने जमिनीवर किती कर लावलेला आहे हे समजते. 6 (ब) मध्ये ग्रामपंच्यायतीने किती कर लावलेला आहे हे समजते.
सातवा कॉलम : -
या कॉलम मध्ये एकूण करांची बेरीज केलेली असते. त्यातून त्या व्यक्तिला किती कर भरावा लागतो हे समजते.
सर्वात शेवटी व्यक्तीचे एकूण क्षेत्र आणि आकारणी दिलेली असते.
8 अ चा फायडा काय आहे. : -
एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या गटात असलेली एकूण जमीन समजते. हा उतारा प्रशासनाला कर गोळा करण्यास उपयुक्त असतो.
जमिनीची खरेदी विक्री करत असतांना जमीन घेणार्या माणसाला ती जमीन नेमकी कोणाच्या नावावर आहे हे कळते. त्यामुळे फसवणुकीला आळा बसतो.
आता आपण बघू 8 अ चा उतारा ऑनलाइन कसा काढावा. : -
महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांची पुढील वेबसाइट सुरू करा.
https://bhulekh.mahabhumi.gov.in
गुगल मध्ये महाभूलेख (Mahabhulekh) असे जरी सर्च केले तरी आपल्याला ही वरील वेबसाइट मिळून जाईल.
त्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाइट सुरू होऊन जाईल.
त्यानंतर आपला विभाग निवडून घ्यावा.
तदंनंतर 8 अ यावर Ok करून इतर माहिती भरून घ्यावी. व 8 अ पहा यावर ok करावे. आपल्याला 8 अ चा उतारा भेटून जाईल.
इतर ब्लॉग पोस्ट :-
जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार
![]() |
इतर ब्लॉग पोस्ट :-
डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?
स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.
नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.
ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.
![]() |
Click Here To View Post |
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.
शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?
फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.
![]() |
Click Here To View Post |
इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-
महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी
वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..
![]() |
Click Above To See Blog Post |